
Central Railway Mega Block: मुंबई लोकलचं (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Central Railway12 Hours Mega Block: जर तुम्ही मंगळवारी 8 सप्टेंबरला रेल्वेने प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात मोठा मेगा ब्लॉक घेतला जाणार असल्याने रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत होईल. प्रवासाला निघण्याआधी एकदा वेळापत्रक नक्की तपासून बघा..
हा मेगा ब्लॉक जळगाव-शिरसोली-म्हसावद या अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर असणार आहे. सकाळी 6 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत म्हणजे तब्बल 12 तास हा ब्लॉक राहील. त्यामुळे वाहतूकीवर 12 तास परिणाम होईल. रेल्वे प्रशासनाने सांगितलं आहे की, या ब्लॉक दरम्यान रेल्वे रुळावर स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंग प्रणाली बसवण्याचं काम केलं.
रेल्वेचा प्रवास जास्त सुरक्षित आणि जलद व्हावा यासाठी हे काम गरजेचं आहे. पण या कामासाठी दोन्ही ट्रॅक बंद ठेवावे लागणार आहेत, त्यामुळे गाड्यांच्या वेळा बदलल्या आहेत. त्यामुळे काही गाड्या पूर्णपणे रद्द केल्या जातील. या ब्लॉकमुळे रोज प्रवास करणाऱ्या लोकांचे खूप हाल होतील. तीन महत्त्वाच्या मेमू गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या. Central Railway Mega Block:
पालिका शिक्षकांवर कामाचा ताण; बीएलओ, एसआयआरनंतर आता प्रशिक्षणाचा नवा बोजा
याचा फटका फक्त लोकल प्रवाशांनाच नाही तर लांब पल्ल्याच्या गाड्यांना पण बसणार आहे. अमृत भारत एक्सप्रेस सारख्या अनेक मोठ्या गाड्या वेगवेगळ्या स्टेशनवर 2 ते 3 तास थांबवून ठेवल्या जाणार आहेत. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केलं आहे की त्यांनी या बदलाची नोंद घ्यावी आणि त्यानुसार आपल्या प्रवासाचं प्लॅनिंग करावं.
शिक्षणमंत्र्याच्या अधिकाराला कात्री? तुकड्यांना मान्यतेचे अधिकार सचिव, शिक्षण आयुक्तांकडे
विशेष करून सकाळी प्रवास करणाऱ्यांनी गाडी आहे की नाही, वेळ बदलली आहे का हे तपासूनच घराबाहेर पडावं.रेल्वेचं हे काम जरी प्रवाशांसाठी त्रासदायक असलं तरी भविष्यात सुरक्षित प्रवासासाठी हे गरजेचं आहे. त्यामुळे एक दिवसाचा त्रास सहन करावा लागेल. रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा रेल्वे चौकशी केंद्रावर तुम्ही नवीन वेळापत्रक बघू शकता.