
अनधिकृत वखारीवर कारवाईची मागणी
ज्या भूखंडावर ही आग लागली, त्याच्या लगतच निवासी इमारती आणि झोपडपट्टी आहे. आगीच्या ज्वाला उंचावर उठत असल्याने ही आग शेजारील इमारतींपर्यंत पोहोचते की काय, या भीतीने स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती.
Panvel Fire News: पनवेलमध्ये २४ तासांत आगीच्या २८ घटना; अग्निशमन दलाची दिवसभर धावपळ!
या दुर्घटनेनंतर परिसरातील अनधिकृत बांधकामांचा आणि वखारींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. “या अनधिकृत जागेला नेमका कोणाचा आशीर्वाद आहे?” असा संतप्त सवाल आता स्थानिक विचारत आहेत. या घटनेवर प्रतिक्रिया देताना स्थानिक भाजप नगरसेवक गणेश सकपाळ यांनी प्रशासनावर निशाणा साधला.
“महानगरपालिका आणि सिडको प्रशासनाने अशा अनधिकृत भूखंडांवर तात्काळ कठोर कारवाई केली पाहिजे. आगीच्या ज्वाला लगतच्या इमारती व झोपडपट्टीपर्यंत पोहोचल्या असत्या तर मोठी जीवितहानी झाली असती. भविष्यात असा एखादा मोठा अपघात घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, संबंधित अधिकाऱ्यांकडून घटनेची सखोल चौकशी सुरू आहे.
पनवेलमध्ये २४ तासांत आगीच्या २८ घटना
पनवेल महानगरपालिका हद्दीसह परिसरात गेल्या २४ तासांत आगीच्या तब्बल २८ घटनांची नोंद झाली आहे. पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत विविध ठिकाणांहून आगीबाबतचे कॉल प्राप्त झाले. या घटनांमध्ये कचरा, गवत, झाडे तसेच इमारती आणि इतर ठिकाणी आग लागल्याच्या प्रकारांचा समावेश आहे.
Ans: घणसोली येथील दत्तनगर परिसरात लाकडाच्या वखारीला आग लागल्याची घटना घडली आहे.
Ans: अनधिकृत बांधकामांचा आणि वखारींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. "या अनधिकृत जागेला नेमका कोणाचा आशीर्वाद आहे?" असा संतप्त सवाल आता स्थानिक विचारत आहेत.