
Shrirampur Clash News: दिवाळीत फटाक्यांवरून तुफान राडा! दोन गटांत दगडफेक, लाकडी दांड्यांनी मारहाण अन् कार पेटवली...
इतकेच नव्हे तर एका चारचाकी कारची तोडफोड करून ती पेटवून देण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली व दहशतीचे वातावरण निर्माण झाले. याप्रकरणी शहर पोलिसांनी परस्परविरोधी दोन गुन्हे दाखल करत एकूण आठ जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास गोंधवणी रोडवरील दत्त मंदिर परिसरामध्ये हा प्रकार घडला. पहिल्या घटनेतील फिर्यादी व त्याचे मित्र दिवाळीचे फटाके फोडून गोंधवणी गावातून आपल्या घरी परतत होते. याच दरम्यान दशमेश चौकाकडून गोंधवणी रोडच्या दिशेने भरधाव आलेली एक कार मंदिरासमोरील रस्त्यालगत ठेवलेल्या सिमेंटच्या गोण्यांना धडकली. कारमधील तरुणांना समजावून सांगत असतानाच मोसीन मुश्ताक शेख, अरबाज शेख, अल्तमश शेख यांच्यासह अन्य पाच ते सहा जण तिथे आले आणि त्यांनी फिर्यादी व त्याच्या मित्रांना लाकडी दांड्यांनी मारहाण करत रस्त्यावरील दगड उचलून दगडफेक केली.
याच घटनेशी संबंधित दुसऱ्या बाजूच्या फिर्यादीचा मुलगा आणि भाचा कार घेऊन फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडले होते. एज्युकेशन शाळेसमोर मंदिराजवळ त्यांची कार सिमेंटच्या गोण्यांना धडकल्याने कारचा बंपर तुटला आणि गाडी रस्त्याच्या मध्यभागी थांबली. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या तेजस मोरे, अनिकेत डफळ, राजू चव्हाण यांच्यासह १५ ते २० जणांच्या झुंडीने कारवर दगडफेक करून तिचे नुकसान केले. फिर्यादी व त्यांचे नातेवाईक मध्यस्थी करण्यासाठी गेले असता त्यांच्यावरही हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात फिर्यादीचा भाऊ अल्तमश शेख जखमी झाला. त्यानंतर रोषातून ती कार पेटवून देण्यात आली.
या गंभीर प्रकरणाची दखल घेत शहर पोलिसांनी तातडीने कारवाई केली. पहिल्या गुन्ह्यात श्रीकांत पोपट गावडे (रा. भैरवनाथनगर), अनिकेत रवींद्र डफळ (रा. नॉर्दन ब्रँच), तेजस राजू मोरे (रा. आदर्शनगर), साहिल दत्तात्रेय पाटेकर (रा. प्रभाग सात) आणि राज जवाहर चव्हाण (रा. गोंधवणी रोड, आंबेडकर कॉलनी) या पाच जणांना अटक करण्यात आली. तर दुसऱ्या गुन्ह्यात अरबाज अन्वर शेख, मोसीन मुश्ताक शेख आणि अरबाज रफिक देशमुख (तिघेही रा. काझीबाबा रोड, श्रीरामपूर) या तिघांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित फरार आरोपींचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.
Ans: श्रीरामपूरमधील गोंधवणी रोडवरील दत्त मंदिर परिसरात ही घटना घडली.
Ans: दिवाळीचे फटाके फोडणे आणि भरधाव कारचा धक्का रस्त्यावरील सिमेंटच्या गोण्यांना लागल्याने हा वाद विकोपाला गेला.
Ans: पोलिसांनी परस्परविरोधी दोन गुन्हे दाखल करून एकूण आठ आरोपींना अटक केली आहे.