
Municipal Election Voting, Maharashtra Municipal Election 2026
Maharashtra Municipal Election 2026: राज्यभरात महापालिका निवडणुकांसाठी आज मतदान पार पडत आहे. पण अनेक मतदान केंद्रातील मतदारांनी मतदानावेळी लावण्यात आलेली शाई काही मिनिटात पुसली जात असल्याचा आरोप केला आहे. यावरून राज्यात मोठ्या गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. निवडणूक आयोगाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या आरोपांवर राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली आहे. (Maharashtra Municipal Election 2026)
राज्यात २०११ पासून मार्कर पेन वापरला जात आहे. ही शाई एकदा सुकल्यानंतर ती पुसता येत नाही. केंद्रीय निवडणूक आयोग जी शाई वापरते तीच ही शाई आहे. दुसरी कोणतीही नाही. एकाद्या मतदाराने दोनदा मतदान करू नये आणि यासाठी ही शाई वापरली जाते. पण जर असा दुसऱ्यांदा मतदान कऱण्यासाठी आला तर त्याच्यावर पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे आहे. पण याच निवडणुकांमध्ये अशा प्रकारचे संभ्रम पसरवणे हे चुकीचे आहे. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठीही याच शाईचा वापर करण्यात आला होता. पण शाई एकदा सुकली ती लवकर पुसली जात नाही. आम्ही एकाच कंपनीचे मार्कर पेन वापरत आहोत.
BMC Election 2026 : “मतदानासाठी वापरण्यात आलेली शाई पुसली जाते…”, निवडणूक आयोगाने स्पष्टच सांगितलं…
साध्या हॅंडवॉश किंवा सॅनिटायझरनेही ही शाई पुसली जात असल्याचा सवाल विचारला असता आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले की, हे चुकीचे आहे. आमच्या कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी मतदान केलं आहे त्यांच्याही बोटाला शाई लावली आहे. पण त्यांच्या बोटाची शाई पुसली गेली नाही. (BMC Election 2026)
दुबार मतदारांची नावे अदयापही यादीत आहेत, यावर बोलताना दिनेश वाघमारे म्हणाले की, “दुबार मतदारांची पूर्ण ओळख पटल्याशिवाय त्यांना मतदान करून दिले जात नाही. अशा दुबार मतदारांना दोन ओळखपत्रे मागितली जातात. पूर्ण तपासणी केल्याशिवाय दुबार मतदारांना मतदान करु दिले जात नाही. पण त्यानंतरही मतदान कक्षात मतदान प्रतिनीधी आहेत. उमेदवारांचे प्रतिनिधीही मतदान केंद्रावर उभे आहेत. त्यामुळे दुसऱ्यांदा मतदान कऱण्यासाठी आला तर त्याला मतदान करू दिले जात नाही. पण याच निवडणुकीत शाईबाबत फेक नॅरेटिव्ह पसरवले जात आहे. निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाला मदत करत असल्याचा आरोप होत आहे. यावर बोलताने ते म्हणाे की, ” सत्ताधाऱ्यांना मतद करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
निवडणूक आयोग निष्पक्षपणे काम करत आहे. आयोग कोणाच्याही बाजूने काम करत नाही, सर्व गोष्टींची आयोगाकडून दखल घेतली जात आहे. मतदांरांनी त्यांच्या नावांबाबत स्वत: दखल घेतली पाहिजे आहे. असंही वाघमारे यांनी स्पष्ट केलं आहे.