
मुरुड–जंजिरा : सध्या शाळांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे अनेक पालक आपल्या मुलांना छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्यांची सफर घडवत आहेत. तसेच अनेक पर्यटकांची पाऊल गडकिल्ल्यांकडे वळाली आहेत. मात्र आता पर्यटकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुरुड जंजिरा किल्ला येत्या काहीच दिवसांमध्ये बंद होणार आहे.
मुरुड जंजिरा किल्ला हा जलदुर्ग आहे. स्थापत्यकलेचा अत्यंत उत्कृष्ट नमुना असलेला हा किल्ला पाहण्यासाठी अनेकजण येत असतात. अरबी समुद्रामध्ये असलेला हा जलदुर्ग असल्यामुळे पर्यटकांची संख्या मोठी असते. आणि किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी समुद्रातून नावेने जावे लागते. सध्या राज्यामध्ये अनेक ठिकाणी पाऊसाच्या धारा कोसळत आहेत. त्यामुळे पर्यटन विभागाने मुरुड जंजिरा किल्ला बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
मेरिटाईम बोर्ड आणि पुरातत्व विभागाने मुरुड जंजिरा किल्ल्याच्या पर्यटनाबाबत निर्णय घेतलेला आहे. विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 26 मे पासून मुरुड जंजिरा किल्ला बंद करण्यात येणार आहे. मुरुड जंजिरा किल्ला हा साडेतीनशे वर्षापूर्वी समुद्राच्या मध्ये बांधलेला जलदुर्ग आहे. कोकण किनारपट्टीवरील पाच जलदुर्गापैकी एक जंजिरा आहे. जलदुर्ग असल्यामुळे कोणतीही घटना टाळण्यासाठी सुरक्षितेतसाठी पावसाळ्यामध्ये जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात येतो. यंदा 26 तारखेपासून जंजिरा किल्ला बंद असणार आहे. त्यामुळे पाहण्याचा प्लॅन करत असाल तर 26 तारखेपूर्वी जंजिरा पाहण्याचा प्लॅन करावा.