Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navarashtra Speical: कर्नाळ्याच्या वनराईत ‘स्वर्गीय नर्तकाचे’ राजेशाही आगमन; पक्षीवैभवात लक्षणीय वाढ

स्थानिक ग्रामस्थांच्या मते, यावर्षी कर्नाळा अभयारण्य आणि लगतच्या जंगल परिसरात पक्ष्यांची संख्या आणि विविधता गेल्या काही वर्षांच्या तुलनेत अधिक आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 20, 2026 | 02:35 AM
Navarashtra Speical: कर्नाळ्याच्या वनराईत ‘स्वर्गीय नर्तकाचे’ राजेशाही आगमन; पक्षीवैभवात लक्षणीय वाढ
Follow Us
Follow Us:

‘स्वर्गीय नर्तका’ला पाहण्यासाठी पक्षीप्रेमींची पावले कर्नाळ्याकडे
दरवर्षी स्थलांतरित पक्ष्यांचा मुक्काम कर्नाळा अभयारण्यात
लक्षणीयरीत्या वाढला स्वर्गीय नर्तका’चा वावर

सुनयना सोनवणे/ पुणे:  कर्नाळा पक्षी अभयारण्य आणि परिसरातील हिरवीगार वनराई सध्या एका अलौकिक सौंदर्याच्या साक्षीदार ठरत आहे. निसर्गाच्या कुंचल्यातून जणू काही पांढरी शुभ्र लाट साकारावी, असा देखणा ‘इंडियन पॅराडाईज फ्लायकॅचर’ अर्थातच ‘स्वर्गीय नर्तक’ यंदा मोठ्या संख्येने या भागात दाखल झाला आहे. आपल्या मखमली शुभ्र-पांढऱ्या आणि तपकिरी छटेच्या लांबसडक शेपटीसह, निळसर तुऱ्याने सजलेला हा पक्षी पाहण्यासाठी पक्षीप्रेमींची पावले  कर्नाळ्याकडे वळत आहेत. पुणे मुंबई महामार्गालगत आणि दोन्ही शहरापासून जवळ असल्यामुळे येथे पर्यटक, पक्षीप्रेमी मोठ्या संख्येने भेट देतात. दरवर्षी स्थलांतरित पक्ष्यांचा मुक्काम कर्नाळा अभयारण्यात असतो; मात्र यंदाचे दृश्य काहीसे वेगळे आणि अधिक सुखावह असल्याचे चित्र आहे.

कर्नाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या कल्हे गावाच्या शिवारात ‘स्वर्गीय नर्तका’चा वावर लक्षणीयरीत्या वाढला आहे. झाडांच्या फांद्यांवर विसावलेला किंवा हवेत लहरी घेत उडणारा हा पक्षी पाहताना जणू स्वर्गीय सौंदर्य पृथ्वीवर अवतरल्याचा भास होतो. नुकतेच या भागात या पक्ष्याची नयनरम्य दृश्ये वन्यजीव छायाचित्रकार विवेक आंबेरकर यांनी टिपली आहेत. त्यांनी ‘नवराष्ट्र’शी बोलताना सांगितले की, “एखाद्या पांढऱ्या शुभ्र फितीप्रमाणे हवेत लहरी घेत उडणारा हा पक्षी पाहणे, हा केवळ निसर्गदर्शन नसून ध्यानाचा अनुभव असतो. कल्हे गावाजवळ ज्या पद्धतीने या पक्ष्यांचे दर्शन होत आहे, ते पाहता निसर्गप्रेमी, छायाचित्रकार आणि पक्षी अभ्यासकांसाठी ही मोठी पर्वणी आहे.”

मेवाडचे शूर राजपूत राजा महाराणा प्रताप यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 19 जानेवारीचा इतिहास

स्थानिक ग्रामस्थांच्या मते, यावर्षी कर्नाळा अभयारण्य आणि लगतच्या जंगल परिसरात पक्ष्यांची संख्या आणि विविधता गेल्या काही वर्षांच्या तुलनेत अधिक आहे. केवळ ‘स्वर्गीय नर्तक’च नव्हे, तर अनेक दुर्मिळ पक्षी यंदा मोठ्या संख्येने दर्शन देत आहेत. वाढलेली वनराई, जंगलातील शांत वातावरण आणि मानवी हस्तक्षेपात झालेली घट यामुळे या पक्ष्यांचा मुक्काम अधिक सुरक्षित व सुखकर झाल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे.

कर्नाळ्याच्या वनराईत सध्या सुरू असलेला हा पक्षीवैभवाचा उत्सव निसर्ग संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करणारा ठरत असून, भविष्यातही या जैवविविधतेचे जतन व्हावे, अशी अपेक्षा निसर्गप्रेमींमधून व्यक्त केली जात आहे.

ॲमेझॉनच्या काळजात काय दडलंय? हजारो वर्षे जगापासून लपलेल्या ‘त्या’ जमातीचा उलगडा

या स्वर्गपक्षाविषयी थोडक्यात….
हा जंगलातील सर्वात देखण्या पक्ष्यांपैकी एक मानला जातो. नर पक्ष्याची लांब, रेशमी शेपटी आणि पांढरा अथवा तांबूस-तपकिरी रंग त्याची खास ओळख आहे, तर मादीचा रंग तुलनेने साधा असतो. डोळ्याभोवती दिसणारी निळसर कडा हे आणखी एक वैशिष्ट्य आहे. हा पक्षी दाट जंगल, पानगळीची वनराई, बागा असलेल्या भागात आढळतो. कीटकभक्षी असलेला स्वर्गपक्षी हवेत उडणारे कीटक अचूकतेने टिपतो. एप्रिल ते जुलैदरम्यान याचा प्रजननकाळ असतो. सध्या हा पक्षी ‘धोक्यात नसलेला’ असला तरी जंगलतोड आणि अधिवास नष्ट होणे यामुळे काही भागांत त्यांची संख्या कमी होत आहे.

 

Web Title: Indian paradise flycatcher bird arrived in large numbers in forests of karnala

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • birds
  • navarashtra special
  • pune news
  • Tourism news

संबंधित बातम्या

पुण्यातील वाकड चौकातून आता रस्ता ओलांडता येणार; मेट्रो 60 मीटरचा पादचारी पूल बांधणार
1

पुण्यातील वाकड चौकातून आता रस्ता ओलांडता येणार; मेट्रो 60 मीटरचा पादचारी पूल बांधणार

आईच्या मृत्यूच्या धक्क्याने तरुणाने उचलल टोकाच पाऊल; गळफास घेऊन संपवलं जीवन
2

आईच्या मृत्यूच्या धक्क्याने तरुणाने उचलल टोकाच पाऊल; गळफास घेऊन संपवलं जीवन

International Day Of The Tropics : पृथ्वीच्या संतुलनाची गुरुकिल्ली असलेल्या उष्णकटिबंधीय प्रदेशांचे अस्तित्व धोक्यात; वाचा सविस्तर
3

International Day Of The Tropics : पृथ्वीच्या संतुलनाची गुरुकिल्ली असलेल्या उष्णकटिबंधीय प्रदेशांचे अस्तित्व धोक्यात; वाचा सविस्तर

National Statistics Day 2026: राष्ट्र उभारणीत आकडेवारीचे महत्त्व काय? प्रा. प्रशांत चंद्र महालनोबिस यांच्या जयंतीनिमित्त विशेष लेख
4

National Statistics Day 2026: राष्ट्र उभारणीत आकडेवारीचे महत्त्व काय? प्रा. प्रशांत चंद्र महालनोबिस यांच्या जयंतीनिमित्त विशेष लेख

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.