Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik Onion Farmers: नाफेडची कांदा खरेदी केवळ कागदावरच! मनमाड, नांदगावात खरेदी केंद्रच नसल्याने शेतकरी संतप्त

कांदा खरेदीच्या मुद्यावरून शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील मंत्री व लोकप्रतिनिधींची बैठक होवून त्यात सोमवारपासून नाफेड व एनसीएफने प्रत्यक्ष बाजार समितीत जावून शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करावी असा निर्णय घेण्यात आला व तशा सुचना दोन्ही यंत्रणांना देण्यात आल्या होत्या

  • By anuradha sagar
Updated On: Jun 09, 2026 | 06:15 PM
Nashik News, Onion Farmers, NAFED, NCCF, Manmad

Nashik News, Onion Farmers, NAFED, NCCF, Manmad

Follow Us
Follow Us:

Nashik Onion Farmers: शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांकडून नाफेड कांदा खरेदी करीत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेत शासनाने सोमवार (दि.८) पासून बाजार समितीत कांदा खरेदीचे आदेश नाफेड व एनसीएफला दिलेले असताना प्रत्यक्षात मात्र जिल्ह्यातील अनेक ठिकाणी कांदा खरेदीची कोणतीही हालचाल नाफेडकडून दिसून आली नाही तर मनमाड, नांदगाव या ठिकाणी केंद्रच नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे शासनाचे आदेश व नाफेडची खरेदी कागदावरच असल्याचे पहिल्याच दिवशी दिसून आली.

कांदा खरेदीच्या मुद्यावरून शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील मंत्री व लोकप्रतिनिधींची बैठक होवून त्यात सोमवारपासून नाफेड व एनसीएफने प्रत्यक्ष बाजार समितीत जावून शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करावी असा निर्णय घेण्यात आला व तशा सुचना दोन्ही यंत्रणांना देण्यात आल्या होत्या. कांदा खरेदीत हेळसांड केल्यास मोक्कान्वये कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला. त्यामुळे सोमवारच्या खरेदीकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागून होते.

गिरीष महाजनांच्या वक्तव्यावरुन हर्षवर्धन सपकाळ आक्रमक; मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी

प्रत्यक्षात सोळापैकी मोजक्याच केंद्रावर कांदा खरेदीसाठी नाफेडचे प्रतिनिधी आले, मात्र खरेदी होऊ शकलेली नाही. येवला येथे मोठ्या प्रमाणात शेतकरी कांदा घेवून आले, परंतु खरेदी केंद्रावर काहीच हालचाल न दिसल्याने उत्पादकांनी खासगी व्यापाऱ्यांना कांदा विक्री केली तर मनमाड, नांदगावला खरेदी केंद्रच नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.

केवळ १.५५ टन खरेदी

मागील वर्षी ४५ दिवसांत उद्दिष्ट पूर्ण झाले नसल्याने कांदा खरेदी नाफेड अन् एनसीसीएफला गुंडाळावी लागली होती. यंदा सोमवारपासून पुढच्या २३ दिवसांत दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट साध्य करणे नाफेड़, एनसीसीएफ अन् बाजार समित्यांसाठी आव्हानात्मक आहे; कारण ‘नाफेड’ने सुरू केलेल्या १८ केंद्रांवर आजतागायत फक्त १.५५ मे. टन कांदा खरेदी झाला आहे.

Nashik Politics: नाशिक विधान परिषद निवडणुकीतील बंडखोरीचा तिढा कायम; गोकुळ गीते यांच्या भूमिकेकडे लक्ष

 

मजुरीचा खर्च ‘नाफेड’च करणार

खरेदी केलेला कांदा गोदामापर्यंत पोहोचविण्यासाठी वाहतूक आणि मजुरीचा खर्च ‘नाफेड’च करणार आहे. जिल्हाधिका-यांनी तसे निर्देश दिले आहे. नाफेड दोन लाख टन मेट्रिक टन कांदा खरेदी करील, गेल्या अनेक वर्षापासून बाजार समितीच्या माध्यमातून कांदा खरेदी करावा, अशी मागणी शेतकऱ्याकडून सातत्याने होत होती. नाफेडने में महिन्यात १८ केंद्रांवर १५८० च्या भावाने कांदा खरेदी सुरू केली; परंतु तिला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे बाजार समितीत तरी नाफेडच्या केंद्रांवर कांदा खरेदी वाढावी यासाठी प्रयत्न करावे लागतील.

 

 

Web Title: Nafeds onion procurement remains only on paper

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 06:15 PM

Topics:  

  • Nashik News
  • onion farmers

संबंधित बातम्या

नाशिक प्रकरणात ‘टीसीएस’ मलेशियाचा थेट संबंध, झाकीर नाईक, ‘एमआयएम’ नेत्यांची चौकशी करावी, संजय निरुपम यांची मागणी
1

नाशिक प्रकरणात ‘टीसीएस’ मलेशियाचा थेट संबंध, झाकीर नाईक, ‘एमआयएम’ नेत्यांची चौकशी करावी, संजय निरुपम यांची मागणी

Nashik Kumbh Mela : भाविकांसाठी मोठी तयारी! सिंहस्थात दररोज ४५०० बस धावणार, वाहतुकीचा मास्टर प्लॅन तयार
2

Nashik Kumbh Mela : भाविकांसाठी मोठी तयारी! सिंहस्थात दररोज ४५०० बस धावणार, वाहतुकीचा मास्टर प्लॅन तयार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.