Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रशासकीय कामकाज थेट बारमधून? दारुच्या घोटासह पेपर्सवर सह्या, धक्कादायक व्हिडिओ आला समोर

Nagpur beer bar administrative file : नागपूरमधील एका बारमध्ये प्रशासकीय फाईल समोर ठेवून काम सुरु असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे टीका केली जात आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jul 28, 2025 | 04:24 PM
Nagpur beer bar administrative file checking with Alcohol Video viral

Nagpur beer bar administrative file checking with Alcohol Video viral

Follow Us
Close
Follow Us:

Nagpur beer bar administrative file : नागपूर : राज्यामध्ये सध्या राजकीय नेत्यांचे अनेक प्रताप समोर य़ेत आहेत. यामध्ये आता प्रशासकीय अधिकारी देखील काही मागे राहिले नाहीत. उपराजधानी असलेल्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहर असलेल्या नागपूरमधील धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. नागपूरमधील एका बारमध्ये प्रशासकीय फाईल समोर ठेवून काम सुरु असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे आता प्रशासकीय कामाकाजासाठी बारचा वापर होत असल्याचे भयान वास्तव समोर आले आहे.

नागपूरमधील मनिषनगरमधील हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ आहे. दुपारच्या सुमारास बिअर बारमध्ये दारुचे घोट घेत आणि प्रशासकीय फाईल समोर ठेवून सह्या केल्या जात असल्याचे दिसून येत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये बारमध्ये एका टेबलवर तीन माणसं बसली आहेत. त्यातील एक जण प्रशासकीय फाईल पडताळत असल्याचे दिसून येत आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा रविवारचा असून सुट्टीच्या दिवशी बिअर बारमधून शासन कारभार सुरु असल्याची टीका आता समाजमाध्यमांवर केली जात आहे. या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र शासनाच्या फायलींचा गठ्ठा घेऊन बारमध्ये बसलेले लोक दिसत आहेत. हे लोक नक्की अधिकारी आहेत का आणि कोणत्या विभागाचे अधिकारी आहे असे प्रश्न आता निर्माण होत आहे. त्याचबरोबर हे लोक दारुचे घोट घेत फाईलींवर सह्या देखील करत आहेत. त्यामुळे दारुच्या नशेमध्ये कोणत्या फाईलीवर सह्या करण्यात आला आहे हा देखील मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रशासनाच्या कामकाजावर मोठे प्रश्नचिन्ह

नागपूरच्या प्रसिद्ध बारमधील हा व्हिडिओ असून दिवसाढवळ्या दारु रिचवली जात आहे. येताना तीन लोकांची सोबत फाईलचा गठ्ठा आणला होता. त्यानंतर दारुची ऑर्डर देत हा फाईल्सचा गठ्ठा चाळला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामुळे प्रशासकीय कार्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच समाज माध्यमांवरुन अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी देखील केली जात आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

नागपूरमधील व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी पुढाकार घेत कारवाईला सुरुवात केली आहे. बिअर बारमधील सीसीटीव्ही फुटेज हे पोलिसांकडून तपासले जात आहे. याचा तपास पूर्ण झाल्यानंतर बिअरबारमध्ये कोणते अधिकारी होते आणि नशेमध्ये त्यांनी कोणत्या फाईंलवर सह्या केल्या आहेत याची माहिती समोर येऊ शकेल. यानंतर सरकार आणि पोलीस कोणती कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Web Title: Nagpur beer bar administrative file checking with alcohol video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2025 | 04:24 PM

Topics:  

  • Nagpur Crime
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Nagpur Export 2025 : अमेरिका ठरली नागपूरची सर्वात मोठी निर्यात बाजारपेठ! तब्बल ‘इतक्या’ कोटींची निर्यात होते परदेशात 
1

Nagpur Export 2025 : अमेरिका ठरली नागपूरची सर्वात मोठी निर्यात बाजारपेठ! तब्बल ‘इतक्या’ कोटींची निर्यात होते परदेशात 

Nagpur Crime: फोनवर बोलण्यावरून वाद, पतीने 19 वर्षीय पत्नीची गळा दाबून हत्या, आजारपण सांगून लपवला खून
2

Nagpur Crime: फोनवर बोलण्यावरून वाद, पतीने 19 वर्षीय पत्नीची गळा दाबून हत्या, आजारपण सांगून लपवला खून

डिजिटल अरेस्टच्या नावावर दोघांना गंडा; तब्बल दोन कोटींची केली फसवणूक
3

डिजिटल अरेस्टच्या नावावर दोघांना गंडा; तब्बल दोन कोटींची केली फसवणूक

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आखाडा सज्ज; भाजप, काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांमध्ये संघर्ष
4

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आखाडा सज्ज; भाजप, काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांमध्ये संघर्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.