Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News: आता संरक्षण व एरोस्पेस उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून नागपूरची नवी ओळख, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर येथे विस्तारित होत असलेल्या सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस प्रकल्पास मिहान मधील 223 एकर भूखंडाचे हस्तांतरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 23, 2025 | 08:59 PM
आता संरक्षण व एरोस्पेस उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून नागपूरची नवी ओळख, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आता संरक्षण व एरोस्पेस उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून नागपूरची नवी ओळख, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर हे देशाच्या औद्योगिक नकाशावर वेगाने प्रगती करणारे शहर असून, आता ते संरक्षण व एरोस्पेस उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून नव्या ओळखीने उदयास येत आहे. भारतातील अग्रगण्य औद्योगिक समूह सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस आपला विस्तार नागपूर येथे करत आहे. या अत्याधुनिक संरक्षण व एरोस्पेस उत्पादन प्रकल्पासाठी मिहान तर्फे 223 एकर भूखंडाचे हस्तांतरण अटी व शर्तीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

रामगिरी निवासस्थानी आयोजित विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलर कंपनीचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल यांना मिहान प्रकल्पातील जमिनीचे हस्तांतरण करण्यात आले. या प्रसंगी सोलर ग्रुपचे संचालक मनीष नुवाल, राघव नुवाल, वरिष्ठ अधिकारी जे. एफ. साळवे, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक व जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, वरिष्ठ व्यवस्थापक गौरव उपश्याम आणि संजय इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Ratnagiri News : वाशिष्ठी नदीपात्रात मृत माशांचा खच; औद्योगिक क्षेत्रातील जलवाहिनी फुटल्याने प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

या प्रकल्पामुळे नागपूरला देशातील अग्रगण्य संरक्षण व एरोस्पेस उत्पादन केंद्र म्हणून ओळख मिळणार असल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले. “हा प्रकल्प महाराष्ट्राच्या ‘मेक इन इंडिया’, ‘आत्मनिर्भर भारत’ आणि औद्योगिक प्रगतीच्या उद्दिष्टांना गती देणारा ठरेल,” असे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्र शासनाने अंमलात आणलेल्या गुंतवणूकदार-अनुकूल धोरणांवर आणि उद्योगविश्वाच्या वाढत्या विश्वासावर ही यशोगाथा शिक्कामोर्तब करते, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस कंपनी भारतभरात सुमारे 12,080 कोटींची गुंतवणूक करीत असून, त्यातील 680 कोटींचा प्रकल्प नागपूरच्या मिहान विशेष आर्थिक क्षेत्रात उभारला जाणार आहे. या प्रकल्पामुळे सुमारे 400 प्रत्यक्ष रोजगार आणि 1,000 अप्रत्यक्ष रोजगारांच्या संधी निर्माण होतील.

या गुंतवणुकीमुळे नागपूरला आंतरराष्ट्रीय दर्जाचे संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून मान्यता मिळेल. तसेच विदर्भाच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळेल. महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (MADC) यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा प्रकल्प साकारत असून, राज्याला संरक्षण उत्पादन क्षेत्रात अग्रस्थान मिळवून देण्यासाठी हा उपक्रम मोलाचा ठरेल.

या निमित्ताने बोलताना डॉ. विपीन इटनकर, सहव्यवस्थापकीय संचालक, एमएडीसी म्हणाले, “मिहान प्रकल्पाचे ध्येय म्हणजे विविध उद्योजकांना गुंतवणुकीसाठी आकर्षित करणे, प्रादेशिक रोजगारनिर्मिती वाढवणे आणि महाराष्ट्राला संरक्षण, एरोस्पेस व उत्पादन क्षेत्रात अव्वल स्थान मिळवून देणे हेच आहे.”

या नव्या टप्प्यामुळे नागपूर आता केवळ शैक्षणिक व आरोग्य केंद्र म्हणूनच नव्हे, तर भारताच्या संरक्षण व एरोस्पेस उद्योगाचे हृदयस्थळ म्हणूनही उदयास येत आहे.

Web Title: 223 acres of land transfer in expanding solar defense and aerospace project devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2025 | 08:59 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Nagpur

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: “विकसित महाराष्ट्राचा मसुदा हा…”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे भाष्य
1

Devendra Fadnavis: “विकसित महाराष्ट्राचा मसुदा हा…”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे भाष्य

नवीन नागपूरच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांचे निर्देश; रस्ते बाह्यवळण मार्गाला जोडणार, मालमत्ता व्यवस्थापनासाठी कंपनी स्थापणार
2

नवीन नागपूरच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांचे निर्देश; रस्ते बाह्यवळण मार्गाला जोडणार, मालमत्ता व्यवस्थापनासाठी कंपनी स्थापणार

आईने ‘यकृत’ देऊन वाचविले मुलीचे प्राण; CM Relief Fund मधून मिळाला ‘आर्थिक आधार’
3

आईने ‘यकृत’ देऊन वाचविले मुलीचे प्राण; CM Relief Fund मधून मिळाला ‘आर्थिक आधार’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.