उपराजधानी नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपूरमध्ये उड्डाण पुलाच्या निर्माणासाठी खोदकाम सुरू असताना मजुरांना मानवी सांगाडा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मानवी हाडांचा सांगाडा सापडल्याने मजुरांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथील सक्करदरा भागातील बेसा पावर हाऊसजवळ उड्डाणपुलाच्या कामासाठी खोदकाम सुरू कऱण्यात आले. शुक्रवारी मजूर खोदकाम करत असतान अचानक मानवी हाडांचा सांगाडा आढळून आला. त्यानंतर मजुरांनी तात्काळ पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
पोलिसांच्या फॉरेन्सिक पथकाच्या माध्यमातून सांगाडे प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. प्रयोगशाळेत हे सांगाडे किती वर्ष जुने आहेत. महिलांचे आहेत की पुरूषांचे याबाबत तपासणी कऱण्यात येईल. अशी माहिती समोर आली आहे.