Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhandara News: जनगणनेत OBC कॉलम नाही म्हणून माहिती देण्यास नकार; लाखनी नगरपंचायतीची नोटीस

भंडाऱ्यातील लाखनी येथे जनगणनेत OBC साठी स्वतंत्र कॉलम नसल्याने नागरिकाने माहिती देण्यास नकार दिल्यानंतर नगरपंचायतीने नोटीस बजावली आहे. या प्रकरणामुळे OBC समाजात नाराजी पसरली असून, जनगणनेच्या कामावर जात असताना एका शिक्षकाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचीही घटना समोर आली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 10, 2026 | 04:11 PM
Bhandara (फोटो सौजन्य: social media)

Bhandara (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • OBC साठी स्वतंत्र कॉलम नसल्याने नागरिकाचा जनगणनेला विरोध
  • लाखनी नगरपंचायतीकडून नागरिकाला सरकारी कामात अडथळ्याची नोटीस
  • जनगणनेच्या कामावर जात असताना शिक्षकाचा हृदयविकाराने मृत्यू
भंडारा: सध्या राज्यभरात जनगणनेचे काम सुरू असून विविध ठिकाणी सरकारी कर्मचारी घरोघरी जाऊन माहिती संकलित करत आहेत. मात्र, भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथे जनगणनेदरम्यान एक वेगळाच वाद समोर आला आहे. जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम नसल्याचा मुद्दा उपस्थित करत उमेश सिंगनजुडे यांनी माहिती देण्यास नकार दिला. यानंतर लाखनी नगरपंचायतीने त्यांना नोटीस बजावली आहे.

जनगणनेला विरोध, नागरिकाला नोटीस

सध्या सुरू असलेल्या Census 2027 प्रक्रियेदरम्यान अनेक ठिकाणी विरोधाच्या घटना समोर येत आहेत. लाखनी येथील उमेश सिंगनजुडे यांनी “ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम का नाही?” असा सवाल उपस्थित करत माहिती देण्यास नकार दिला होता. त्यानंतर लाखनी नगरपंचायतीने त्यांना 1948 च्या जनगणना कायद्यातील कलम 8 आणि 11 अंतर्गत नोटीस बजावली आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. भंडारा जिल्ह्यात जनगणनेविरोधातील कारवाईची ही पहिलीच घटना असल्याने याबाबत विविध स्तरांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.

छत्रपती संभाजीनगर हादरलं! 19 वर्षीय मुलाने झोपेतच वडिलांच्या डोक्यात दांडा घालून केली हत्या

‘आधी OBC कॉलम द्या, मग जनगणना करा’

नगरपंचायतीकडून आलेल्या नोटिशीवर प्रतिक्रिया देताना उमेश सिंगनजुडे यांनी, “जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम नमूद करावा आणि त्यानंतरच जनगणना प्रक्रिया राबवावी,” अशी भूमिका मांडली. या प्रकरणामुळे ओबीसी समाजात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, लाखनी नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनी याबाबत अधिक बोलण्यास टाळाटाळ केली.

जनगणनेच्या कामावर जाताना शिक्षकाचा मृत्यू

दरम्यान, अनेक ठिकाणी जनगणनेचे काम शिक्षकांकडूनही करून घेतले जात आहे. अशातच अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यात करजगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक प्रदीप गणोरकर (वय 50) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. शनिवारी सकाळी जनगणनेच्या कामासाठी घराबाहेर पडताना त्यांना छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शिक्षक वर्गातून हळहळ व्यक्त केली जात असून, त्यांच्या कुटुंबाला मदत करण्याची मागणी होत आहे.

Jalna Crime: संतापजनक! वडिलांच्या मित्राकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; चार महिन्यांची गर्भवती

💡

Frequently Asked Questions

  • Que: नागरिकाने जनगणनेला विरोध का केला?

    Ans: जनगणनेत OBC साठी स्वतंत्र कॉलम नसल्याने नागरिकाने माहिती देण्यास नकार दिला.

  • Que: नगरपंचायतीने कोणती कारवाई केली?

    Ans: सरकारी कामात अडथळा आणल्याचा ठपका ठेवत संबंधित नागरिकाला नोटीस बजावली.

  • Que: शिक्षकाच्या मृत्यूची घटना कशी घडली?

    Ans: जनगणनेच्या कामासाठी जात असताना शिक्षक प्रदीप गणोरकर यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला.

Web Title: Bhandara crime refusal to provide information due to the absence of an obc column in the census notice issued to lakhni nagar panchayat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 04:11 PM

Topics:  

  • Bhandara
  • bhandara news
  • News

संबंधित बातम्या

भंडारा-गोंदिया विधानपरिषद निवडणुकीचे वातावरण तापले; राजकीय खेळींचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’
1

भंडारा-गोंदिया विधानपरिषद निवडणुकीचे वातावरण तापले; राजकीय खेळींचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.