Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Ladki Bahin Yojana बंद होणार….’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत सांगितले स्पष्टचं

Ladki Bahin Yojana News: लाडकी बहीण योजने बद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे विधान केले आहे. तर मंत्री आदिती तटकरे यांनी महिलांची ई-केवायसी बद्दल अपडेट दिले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 10, 2025 | 06:09 PM
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत सांगितले स्पष्टचं (Photo Credit- X)

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विधानसभेत सांगितले स्पष्टचं (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • लाडकी बहीण योजनेबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे मोठे विधान
  • ई-केवायसी प्रक्रियेबद्दल आदिती तटकरे यांची माहिती
  • जाणून घ्या काय म्हणाले ते…
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Marathi News: राज्यातील लाखो महिलांसाठी आधार ठरलेली ‘लाडकी बहीण योजना’ (Ladki Bahin Yojana) ही सरकारची लोकोपयोगी आणि जनकल्याणकारी योजना असून, ती कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. विधानसभा सदस्य सुनील प्रभू, जयंत पाटील, नानाभाऊ पटोले, हारून शेख यांनी या योजनेसंदर्भात लक्षवेधी सूचनेद्वारे विचारणा केली होती, त्यावर उत्तर देताना शिंदे बोलत होते.

‘योजना कमी करणे किंवा बंद करणे तर दूरच!’

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, योजना सुरू करताना शासनाने सकारात्मक भावनेने निर्णय घेतला होता. आचारसंहितेच्या काळातही लाभार्थींना अडथळा येऊ नये म्हणून आगाऊ निधीही उपलब्ध करून देण्यात आला होता. “लाभार्थी बहिणींनी सरकारच्या कामावर विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणात जनादेश दिला आहे. त्यामुळे ही योजना कमी करणे किंवा बंद करणे तर दूरच, आम्ही ज्या-ज्या घोषणा केल्या आहेत, त्या योग्य वेळी पूर्ण केल्या जातील.” ‘लाडकी बहीण योजना’ राज्यातील महिलांसाठी मोठा आधार असून, तिचा विस्तार आणि लाभ सातत्याने सुरू राहील.

हे देखील वाचा: Ladki Bahin KYC: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! ई-केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ; आता ‘या’ तारखेपर्यंत असणार अंतिम मुदत

ई-केवायसी प्रक्रियेत मोठी प्रगती: मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ‘लाडकी बहीण योजने’च्या लाभार्थींच्या अचूक प्रमाणीकरणासाठी सुरू असलेल्या ई-केवायसी (e-KYC) प्रक्रियेतील प्रगतीची माहिती दिली. योजनेसाठी एकूण २ कोटी ६३ लाख ८३ हजार ५८९ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी २ कोटी ४३ लाख ८२ हजार ९३६ अर्ज पात्रतेनुसार ग्राह्य धरण्यात आले. लाभार्थ्यांचे अचूक प्रमाणीकरण करण्यासाठी सुरू असलेल्या ई-केवायसी प्रक्रियेत मोठी प्रगती झाली असून, आतापर्यंत १ कोटी ७४ लाखांहून अधिक महिलांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे. ई-केवायसीची अंतिम मुदत ३१ डिसेंबर आहे.

अपात्र लाभार्थींवर कारवाई

लाभार्थ्यांच्या सखोल पडताळणीतून समोर आलेले महत्त्वाचे मुद्दे:

  • शासकीय कर्मचारी: सुमारे ८ हजार शासकीय कर्मचारी (मुख्यतः आरोग्य व इतर सरकारी यंत्रणांमधील) अपात्र असूनही त्यांनी घेतलेल्या रकमेची रिकव्हरी प्रक्रिया मागील ५-६ महिन्यांपासून सुरू आहे, जी पुढील दोन महिन्यांत पूर्ण होईल.
  • बँक खाती: सुमारे १२ ते १४ हजार महिलांच्या नावावर पुरुषांची बँक खाती (वडील, भाऊ किंवा पती यांची खाती) जोडलेली असल्याचे दिसून आले. विभागाने अशा प्रकरणांचे सखोल परीक्षण करून कोणतीही पात्र महिला लाभापासून वंचित राहणार नाही, याची खात्री केली आहे.
हे देखील वाचा: CIDCO Housing Price: हक्काचं घर घेणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! सिडकोच्या घरांच्या दरात कपात?

Web Title: Deputy chief minister eknath shindes big statement in the legislative assembly about the ladki bahin scheme

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2025 | 06:09 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Maharashtra Winter Session

संबंधित बातम्या

Satara News: “आडवे आले तर सोडणार नाही, हिशोब चोख ठेवतो”; साताऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांनवर तुफान हल्ला
1

Satara News: “आडवे आले तर सोडणार नाही, हिशोब चोख ठेवतो”; साताऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांनवर तुफान हल्ला

Satara News : सामान्यांच्या घशाला कोरड अन् मंत्र्यांसाठी लाखो लिटर पाण्याचा अपव्यय
2

Satara News : सामान्यांच्या घशाला कोरड अन् मंत्र्यांसाठी लाखो लिटर पाण्याचा अपव्यय

महिला आरक्षण विधेयक भाजपचे राजकीय षडयंत्र, मतदारसंघाच्या पुनर्रचनेचा पक्षीय अजेंडा; विनायक राऊतांचा आरोप
3

महिला आरक्षण विधेयक भाजपचे राजकीय षडयंत्र, मतदारसंघाच्या पुनर्रचनेचा पक्षीय अजेंडा; विनायक राऊतांचा आरोप

Maharashtra Politics: ‘शिंदे वज्रमूठ’ की महायुतीत नवा भूकंप? साताऱ्यात शिंदे गटाचा भव्य मेळावा
4

Maharashtra Politics: ‘शिंदे वज्रमूठ’ की महायुतीत नवा भूकंप? साताऱ्यात शिंदे गटाचा भव्य मेळावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.