Devendra Fadanvis: मतदान संपताच फडणवीस तडकाफडकी सरसंघचालकांच्या भेटीला; जाणून घ्या अंदर की बात...
नागपूर: राज्यात विधानसभा निवडणूक अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचली आहे. आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर मतदान पूर्ण झाल्यानंतर अनेक कंपन्यांचे एक्झिट पोल समोर आलेले आहेत. त्यातील बऱ्याच एक्झिट पोलमध्ये महायुतीला पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान निवडणुकीची रणधुमाळी संपताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तातडीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात गेल्याचे समजते आहे. त्या ठिकाणी त्यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतल्याचे समजते आहे.
राज्यात आज 288 जागांसाठी मतदान पूर्ण झाले आहे. मतदारांनी उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद केले आहे. 23 तारखेला राज्याची सत्ता कोणाच्या हातात जाणार हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपताच नागपूरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिल्याचे समजते आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संघ मुख्यालयाला भेट दिल्याचे समोर येत आहे. या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतल्याचे समजते आहे. दोघांच्या भेटीत काय चर्चा झाली आहे हे समोर येऊ शकलेले नाही. दरम्यान मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सरसंघचालकांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे.
राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. ही लढत अत्यंत चुरशीची असणार आहे. दोन्ही बाजूने अत्यंत तगडा असा प्रचार करण्यात आला आहे. दरम्यान मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चाणक्य एक्झिट पोल समोर आले आहेत. चाणक्य एक्झिट पोलनुसार राज्यात महायुतीचे की महाविकास आघाडीचे सरकार येणार याबाबतचे काही अंदाज समोर आले आहेत.
चाणक्य एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येत असल्याचे दिसून येत आहे. या विधानसभा निवडणुकीत महायुतीला 150 ते 160 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला 130 ते 138 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. तर 6 ते 8 जागांवर अपक्ष उमेदवार जिंकण्याची शक्यता आहे, हा अंदाज चाणक्य एक्झिट पोलने दिलेला आहे.
पीपल्स पल्सच्या एक्झिट पोलनुसार राज्यात पुन्हा एकदा महयुतीचे सरकार येताना दिसत आहे. महाविकास आघाडीला सत्ता स्थापन करण्यात अपयश दिसत आहे. पीपल्स प्लसच्या अंदाजानुसार राज्यात महायुतील 182 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडी शंभरी देखील पार करू शकत नाही असे चित्र पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीला विधानसभेत केवळ 97 जागा मिळतील असा अंदाज पीपल्स पल्सने व्यक्त केला आहे. त्यामुळे एक्झिट पोल हे केवळ अंदाज असले तरी हे अंदाज महाविकास आघाडीचे टेंशन वाढवणारे असल्याचे पाहायला मिळत आहे.