Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis : ‘अमृत-2’ची सर्व कामं मार्च 2027 पर्यंत पूर्ण करा, कुचराई करणाऱ्यांवर कारवाई,’ मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा आदेश

Devendra Fadnavis : नागपूर शहरातील ‘अमृत-2’ योजनेच्या कामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. सर्व कामे मार्च 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देत रस्ते पुनर्भरणात कुचराई करणाऱ्या अधिकारी-कंत्राटदारांवर कारवाईचा इशारा दिला.

  • By विवेक
Updated On: Sep 19, 2026 | 09:03 PM
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Follow Us
Follow Us:
  • ‘अमृत-2’अंतर्गत नागपुरातील सर्व कामे मार्च 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश.
  • रस्ते खोदकामानंतर पुनर्भरण करताना वैज्ञानिक पद्धतीचा वापर करण्याचे आदेश.
  • पोहरा नदी पुनरुज्जीवनासाठी जयताळा येथे 10 आणि चिखली येथे 35 एमएलडी क्षमतेचे STP उभारले जाणार.
 

Devendra Fadnavis : नागपूर शहरातील विकासकामांना आता वेग देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ‘अमृत-2’ योजनेअंतर्गत सुरू असलेली सर्व कामे मार्च 2027 पर्यंत गतीने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करा, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना दिले.

रामगिरी शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत नागपूरमधील ‘अमृत-2’ योजनेची कामे, रस्ते खोदकाम, त्यानंतर होणारे पुनर्भरण आणि पोहरा नदीचे प्रदूषण निर्मूलन व पुनरुज्जीवन या विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीला आमदार प्रवीण दटके, स्थायी समिती सभापती शिवाणी दाणी, महापालिका आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

‘अमृत-2’च्या कामांसाठी शहरातील अनेक ठिकाणी रस्ते खोदण्यात आले आहेत. मात्र, खोदकामानंतर रस्त्यांची व्यवस्थित डागडुजी न झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी बैठकीत मांडण्यात आल्या. पावसाळ्यात नागरिकांना झालेल्या त्रासाचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला.

पेडगावच्या शेतकरी भगिनींच्या जिद्दीला सलाम! भांडवल उभारण्यासाठी बैलगाडी शर्यतीत स्टॉल; जिद्द पाहून अधिकारीही प्रभावित

यावर फडणवीस यांनी रस्त्यांच्या पुनर्भरणाच्या कामात कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असं स्पष्ट केलं. विशेषतः सिमेंटच्या रस्त्यांवरील कामं करताना वैज्ञानिक आणि शास्त्रीय पद्धतीचा काटेकोरपणे वापर करावा, असे निर्देश त्यांनी दिले. भविष्यात रस्ते खोदकाम आणि पुनर्भरणासाठी सर्व संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेऊन एक सर्वसमावेशक धोरण तयार करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी आणि कंत्राटदारांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.

दरम्यान, पोहरा नदीच्या प्रदूषणाचा प्रश्नही बैठकीत चर्चेत आला. महापालिका आयुक्त डॉ. इटनकर यांनी या प्रकल्पाबाबत सादरीकरण केलं. नदीचं प्रदूषण कमी करण्यासाठी विविध ठिकाणी सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांट उभारण्यात येणार आहेत.

जयताळा येथे 10 एमएलडी आणि चिखली येथे 35 एमएलडी क्षमतेचे एसटीपी उभारण्याची योजना आहे. याशिवाय चिंचभवन, बीडीपेठ आणि सोमलवाडा येथे पंपिंग स्टेशन उभारण्यात येणार असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

आता ‘अमृत-2’च्या कामांना ठरलेल्या मुदतीत पूर्ण करण्याचं आव्हान प्रशासनासमोर आहे. रस्ते खोदकामामुळे होणारा नागरिकांचा त्रास कमी करण्यासोबतच पोहरा नदी पुनरुज्जीवनाचा प्रकल्पही वेळेत पूर्ण करण्यावर प्रशासनाला भर द्यावा लागणार आहे.

अन्नातील भेसळीवर थेट वार! तुकाराम मुंढेंच्या कडक शिस्तीला पुण्याच्या गणेश मंडळांची अनोखी साथ

Web Title: Nagpur amrut 2 project march 2027 cm devendra fadnavis pohara river rejuvenation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2026 | 09:03 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Maharashtra Government
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Nagpur News : व्यापाऱ्यांनी जावे तरी कुठे? रोख व्यवहारांवरील बंदी, वाढते बँकिंग शुल्क, डिजिटल पेमेंटचा खर्च
1

Nagpur News : व्यापाऱ्यांनी जावे तरी कुठे? रोख व्यवहारांवरील बंदी, वाढते बँकिंग शुल्क, डिजिटल पेमेंटचा खर्च

राज्य सरकारची मोठी घोषणा; ‘या’ व्यावसायिकांना मिळणार 20-22 हजारांचं आर्थिक अनुदान?
2

राज्य सरकारची मोठी घोषणा; ‘या’ व्यावसायिकांना मिळणार 20-22 हजारांचं आर्थिक अनुदान?

‘आश्वासनांचं गाजर अन् पोलिसांची स्थानबद्धता!’ सारथी, बार्टी, महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचा सरकारवर घणाघात
3

‘आश्वासनांचं गाजर अन् पोलिसांची स्थानबद्धता!’ सारथी, बार्टी, महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचा सरकारवर घणाघात

Devendra Fadnavis : शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, फडणवीसांचा मोठा निर्णय; ‘या’ तारखेनंतर दुष्काळी परिस्थितीचे पंचनामे करणार!
4

Devendra Fadnavis : शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, फडणवीसांचा मोठा निर्णय; ‘या’ तारखेनंतर दुष्काळी परिस्थितीचे पंचनामे करणार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.