Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: चंद्रपुरात भेसळखोरांवर FDA चा दणका! १० आस्थापनांचे परवाने निलंबित, ५१ दुकानांना सुधारणा नोटीस

चंद्रपूर जिल्ह्यातील ९२ आस्थापनांची तपासणी करून १७० अन्ननमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. तपासणीत अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या दृष्टीने गंभीर त्रुटी आढळलेल्या ५१ आस्थापनांना सुधारणा नोटीस बजावण्यात आल्या.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 06, 2026 | 01:50 PM
Chandrapur News: चंद्रपुरात भेसळखोरांवर FDA चा दणका! १० आस्थापनांचे परवाने निलंबित, ५१ दुकानांना सुधारणा नोटीस

Chandrapur News: चंद्रपुरात भेसळखोरांवर FDA चा दणका! १० आस्थापनांचे परवाने निलंबित, ५१ दुकानांना सुधारणा नोटीस

Follow Us
Follow Us:
  • अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम राबविली
  • ५१ आस्थापनांना सुधारणा नोटीस
  • १० आस्थापनांचे परवाने अथवा नोंदणी प्रमाणपत्रे निलंबित
चंद्रपूर: सणासुदीच्या काळात बाजारपेठेत अन्नपदार्थांची मागणी वाढत असल्याने भेसळखोरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम राबविली आहे. या मोहिमेदरम्यान ९२ आस्थापनांची तपासणी करून १७० अन्ननमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. तपासणीत अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या दृष्टीने गंभीर त्रुटी आढळल्याने ५१ आस्थापनांना सुधारणा नोटीस बजावण्यात आल्या, तर १० आस्थापनांचे परवाने अथवा नोंदणी प्रमाणपत्रे निलंबित करण्यात आली.

Pune Pitbull Attack: सोसायटीत सायकल चालवताना निष्पाप मुलावर जीवघेणा प्रसंग, परिसरात भीतीचे वातावरण

विशेष म्हणजे, भेसळ किंवा अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत संशय निर्माण झाल्याने तब्बल ३६ लाख रुपये किमतीचा ८ हजार ९८८ किलो अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या साठ्यामध्ये खाद्यतेल, खवा, मिरची पावडर, हळद पावडर, धने पावडर, विविध मसाले, गूळ, शेंगदाणे आणि चहा पावडर आदी अन्नपदार्थांचा समावेश आहे. सणासुदीच्या काळात नागरिकांकडून मिठाई, फराळाचे साहित्य, खाद्यतेल आणि मसाल्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. या संधीचा फायदा घेऊन काही व्यावसायिकांकडून निकृष्ट दर्जाचे किंवा भेसळयुक्त पदार्थ विकले जाण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने तपासणी मोहीम तीव्र केली आहे.  (फोटो सौजन्य – AI Created) 

सात महिन्यांत ३१६ नमुन्यांची तपासणी

१ एप्रिल ते ३१ ऑक्टोबर २०२६ या सात महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील विविध अन्न आस्थापनांमधून ३१६ अन्ननमुने घेऊन विश्लेषणासाठी पाठविण्यात आले. त्यापैकी २१० नमुने प्रमाणित घोषित झाले आहेत, तर ९६ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. तीन नमुने कमी दर्जाचे, पाच नमुने मिध्याछाप, तर दोन नमुने असुरक्षित असल्याचे निष्पन्न झाले आहे. यापैकी आठ प्रकरणांमध्ये न्यायनिर्णयासाठी सहआयुक्त, नागपूर यांच्याकडे खटले दाखल करण्यात आले असून उर्वरित प्रकरणांत पुढील कार्यवाही सुरू आहे. या सात महिन्यांत जिल्ह्यातील २४३ अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली.

नियमांचे उल्लंघन आणि स्वच्छतेतील त्रुटी आढळल्याने १३५ आस्थापनांना सुधारणा नोटीस बजावण्यात आल्या. दहा आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले, तर २९ आस्थापनांविरुद्ध दंडात्मक कारवाई करून दोन लाख २० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

Raigad News: तीन वर्षे काम करूनही पगार नाही! रायगडच्या माध्यमिक शिक्षण विभागाचा कारभार वादात, चौकशीची मागणी

अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ तसेच नियम व नियमन २०११ मधील तरतुदीचे काटेकोर पालन करूनच व्यवसाय करावा, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, निर्भळ आणि सुरक्षित अन्न मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार असून अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्याऱ्यांची गय केली जाणार नाही.- प्रवीण उमप, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Fda cracks down on food adulteration in chandrapur food stock worth rupees 36 lakh seized hj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 01:50 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Nagpur News : आशा, गटप्रवर्तकांचा धडकला ‘दे धडक’ मोर्चा; दिवाळीनंतर बैठकीचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
1

Nagpur News : आशा, गटप्रवर्तकांचा धडकला ‘दे धडक’ मोर्चा; दिवाळीनंतर बैठकीचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Raigad News: तीन वर्षे काम करूनही पगार नाही! रायगडच्या माध्यमिक शिक्षण विभागाचा कारभार वादात, चौकशीची मागणी
2

Raigad News: तीन वर्षे काम करूनही पगार नाही! रायगडच्या माध्यमिक शिक्षण विभागाचा कारभार वादात, चौकशीची मागणी

Diwali Lakshmi Puja 2026: दिवाळीत घरात सुख-समृद्धी नांदावी असं वाटतंय? लक्ष्मीपूजनाचे हे 7 नियम नक्की पाळा!
3

Diwali Lakshmi Puja 2026: दिवाळीत घरात सुख-समृद्धी नांदावी असं वाटतंय? लक्ष्मीपूजनाचे हे 7 नियम नक्की पाळा!

Cotton import duty: कापूस आयातीला 0% शुल्काचा फटका! सरकारच्या निर्णयाविरोधात शेतकरी आक्रमक
4

Cotton import duty: कापूस आयातीला 0% शुल्काचा फटका! सरकारच्या निर्णयाविरोधात शेतकरी आक्रमक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.