Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur : पाच वर्षांतच पुलाची वाट लागली! पिवळी नदीवरील ५० मीटर पूल धोकादायक

Nagpur : उत्तर नागपूरातील वांजरा येथील पिवळी नदीवरील ५० मीटर लांबीच्या पुलाची अवघ्या पाच वर्षांत दुरवस्था झाली असून, पुलावरील रस्ता उखडल्याने लोखंडी सळ्या बाहेर आल्या आहेत.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 03, 2026 | 03:35 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • टायर फुटण्याची शक्यता वाढली
  • २०१३ मध्ये १८ जण वाहून गेले होते
  • पाच वर्षातच दुरावस्था
Nagpur : दररोज या मार्गाने प्रवास करणाऱ्या हजारो वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. वनदेवीनगर आणि विनोबा भावेनगरला जोडणारा हा पूल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नागरिकांना समर्पित करण्यात आला होता. १,२०० मीटर जोडरस्ता आणि २४.९६ कोटी रुपये खर्चुन उभारण्यात आलेला हा पूल जुलै २०२१ मध्ये पूर्ण झाला. मात्र, अवघ्या पाच वर्षांतच पुलावरील डांबरी व काँक्रीटचा थर उखडून लोखंडी सळ्या बाहेर आल्याने वाहनचालकांना मोठा धोका निर्माण झाला आहे.

Nagpur : खुशखबर! दलालांशिवाय घरबसल्या मिळणार भाड्याचे घर; म्हाडाची नवी व्यवस्था नेमकी आहे तरी काय?

टायर फुटण्याची शक्यता वाढली

बाहेर आलेल्या सळ्यांमुळे दुचाकी घसरून अपघात होण्याची तसेच चारचाकी वाहनांचे टायर फुटण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी निकृष्ट दर्जाच्या संबंधित कंत्राटदार, अभियंते आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. तसेच मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणीही करण्यात आली आहे .

Nagpur News : विदर्भ साहित्य संघाच्या इमारतीचा वाद आता हायकोर्टात ! राज्यसरकार सह प्रतिवादींना नोटीस .

२०१३ मध्य १८ जण वाहून गेले होते

२०१३ मध्ये मुसळधार पावसामुळे याच ठिकाणी असलेला जुना मार्ग पाण्याखाली गेल्याने १८ जण वाहून गेले होते. सुदैवाने त्यांची वेळेत सुटका करण्यात आली होती. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी २०१४ मध्ये तत्कालीन आमदार डॉ. मिलिंद माने यांच्याकडे नवीन पुलाची मागणी केली होती. शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर केंद्रीय रस्ता निधीतून या पुलाचे बांधकाम करण्यात आले आणि जुलै २०२१ मध्ये ते पूर्ण झाले. मात्र, आता या पुलाची झालेली दुरवस्था चिंतेचा विषय ठरली आहे.

AIIMS Nagpur : शस्त्रक्रियेसाठी तीन-तीन महिने वाट; रुग्णांच्या वाढल्या फेऱ्या..

Web Title: Nagpur bridge ruined in just five years 50 meter bridge over pivali river is dangerous

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2026 | 03:35 PM

Topics:  

  • construction
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Nagpur Crime : पोलिस पहाऱ्यातून मकोका आरोपी पसार !
1

Nagpur Crime : पोलिस पहाऱ्यातून मकोका आरोपी पसार !

Devendra Fadnavis : ‘अमृत-2’ची सर्व कामं मार्च 2027 पर्यंत पूर्ण करा, कुचराई करणाऱ्यांवर कारवाई,’ मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा आदेश
2

Devendra Fadnavis : ‘अमृत-2’ची सर्व कामं मार्च 2027 पर्यंत पूर्ण करा, कुचराई करणाऱ्यांवर कारवाई,’ मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा आदेश

Nagpur News : व्यापाऱ्यांनी जावे तरी कुठे? रोख व्यवहारांवरील बंदी, वाढते बँकिंग शुल्क, डिजिटल पेमेंटचा खर्च
3

Nagpur News : व्यापाऱ्यांनी जावे तरी कुठे? रोख व्यवहारांवरील बंदी, वाढते बँकिंग शुल्क, डिजिटल पेमेंटचा खर्च

Nagpur News : शुल्कवाढीने विद्यार्थी हैराण! नागपूर विद्यापीठात शिक्षण महागले! शुल्कात 7 टक्के वाढ; नव्या विद्यार्थ्यांच्या खिशाला
4

Nagpur News : शुल्कवाढीने विद्यार्थी हैराण! नागपूर विद्यापीठात शिक्षण महागले! शुल्कात 7 टक्के वाढ; नव्या विद्यार्थ्यांच्या खिशाला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.