Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur Crime : पोलिस पहाऱ्यातून मकोका आरोपी पसार !

Nagpur Crime : नागपूरमध्ये पोलिसांच्या पहाऱ्यात असलेला मकोका आरोपी पसार झाल्याची घटना समोर आली आहे. आरोपीच्या फरारीनंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला असून, सुरक्षाव्यवस्थेबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 20, 2026 | 02:59 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
  • अनेक गंभीर गुन्हे दाखल
  • सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
Nagpur Crime : मकोका प्रकरणात कारागृहात असलेला आरोपी शेख समीर शेख रहीम शनिवारी सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून (मेडिकल) पोलिसांना गुंगारा देत पसार झाला. त्याला दोन दिवसांपूर्वीच उपचारासाठी कारागृहातून मेडिकलमध्ये दाखल केले होते. पहिल्या मजल्यावरील शौचालयाची काचेची खिडकी फोडून त्याने सज्जावर उडी घेतली आणि तेथून खाली येत रुग्णालयातून पलायन केले.

सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. मकोकासारख्या गंभीर प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या पहाऱ्यातून पसार झाल्याने पोलिस विभागात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खापरखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गैंगवार प्रकरणात आरोपी समीरविरुद्ध मकोका अंतर्गत कारवाई केली होती,अन तो कारागृहात होता.

चेहरा आणि पोटात गाठ असल्याने त्याला उपचारासाठी १७ सप्टेंबर रोजी मेडिकलमध्ये दाखल केले होते. तो पहिल्या मजल्यावरील वॉर्ड क्रमांक १० मध्ये उपचार घेत होता. त्याच्या सुरक्षेसाठी पोलिस मुख्यालयातून जवान तैनात करण्यात आले होते. शनिवारी सकाळी सुमारे १०.३० वाजताच्या सुमारास समीर शौचालयात गेला. याचदरम्यान त्याने शौचालयाची काचेची खिडकी फोडली आणि तेथून सज्जावर आणि सज्जावरून खाली उडी घेतली.

Devendra Fadnavis : ‘अमृत-2’ची सर्व कामं मार्च 2027 पर्यंत पूर्ण करा, कुचराई करणाऱ्यांवर कारवाई,’ मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा आदेश

सीसीटीव्ही फुटेजची तपासणी

मेडिकल परिसर तसेच आजूबाजूच्या भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले जात आहेत. समीरच्या रुग्णालयातील हालचाली, त्याला भेटण्यासाठी आलेल्या व्यक्ती तसेच त्याच्या संपर्कातील व्यक्त्तीची माहिती पोलिसांकडून तपासली जाण्याची शक्यता आहे. समीरने पलायनाची पूर्वतयारी केली होती की रुग्णालयातील सुरक्षेतील त्रुटीचा फायदा घेतला, याचाही तपास सुरू आहे.

अनेक गंभीर गुन्हे दाखल

समीरविरुद्ध नवीन कामठी पोलिस ठाण्यात ७. कळमना येथे ४, तर गणेशपेठ, तहसील, नंदनवन आणि खापरखेडा पोलिस ठाण्यात प्रत्येकी १ गुन्हा दाखल असल्याची माहिती आहे. लूटमार, खंडणी, अवैध शस्त्र बाळगणे आणि गैंगवाराशी संबंधित १६ गुन्ह्यांचा त्यात समावेश आहे.

Nagpur News : प्रवासात बाळाला मांडीवर घेतलं तर ३ हजारांचा फटका! नियमाने पालकांना धक्का

सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

समीरने शौचालयाची खिडकी फोडून पहिल्या मजल्यावरील सज्जावरून पलायन केल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा पोलिस तपास सुरू असून, निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर विभागीय कारवाई होण्याची शक्यता आहे.

Web Title: Nagpur crime makoka accused escaped from police guard

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2026 | 02:59 PM

Topics:  

  • Marathi News
  • Nagpur Crime News
  • Nagpur News
  • Nagpur Police

संबंधित बातम्या

Pakistan Crisis : इम्रान खान तुरुंगात,आता बहिणीलाही अटक; २७ सप्टेंबरच्या मोर्च्याआधी खळबळ!
1

Pakistan Crisis : इम्रान खान तुरुंगात,आता बहिणीलाही अटक; २७ सप्टेंबरच्या मोर्च्याआधी खळबळ!

Original or Fake Iphone 18 Pro: तुमचा iPhone खरा आहे की बनावट? ‘या’ सेटिंगमध्ये मिळेल सगळं गुपित!
2

Original or Fake Iphone 18 Pro: तुमचा iPhone खरा आहे की बनावट? ‘या’ सेटिंगमध्ये मिळेल सगळं गुपित!

Gaza War : गाझात पुन्हा रक्तपात! इस्रायली हल्ल्यांत पॅलेस्टिनींचा मृत्यू; युद्धविरामानंतरही हल्ले सुरू
3

Gaza War : गाझात पुन्हा रक्तपात! इस्रायली हल्ल्यांत पॅलेस्टिनींचा मृत्यू; युद्धविरामानंतरही हल्ले सुरू

Syria News : 16 वर्षांनी असालाचा दमास्कसमध्ये जल्लोष! ‘हाऊसफुल्ल’ कॉन्सर्टने पुन्हा गाजला सीरियाचा मंच
4

Syria News : 16 वर्षांनी असालाचा दमास्कसमध्ये जल्लोष! ‘हाऊसफुल्ल’ कॉन्सर्टने पुन्हा गाजला सीरियाचा मंच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.