
फोटो सौजन्य AI
त्यातच जलसंपदा विभागाच्या २८ सप्टेंबरपर्यंतच्या आकडेवारीने चिंता आणखी वाढवली आहे. जिल्ह्यातील पाच प्रमुख धरणांमध्ये त्यांच्या एकूण क्षमतेच्या अवघा ६१.०३ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी याच दिवशी या धरणांमध्ये जवळपास १०० टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे शेतजमिनी कोरड्या पडत असतानाच धरणांमधील पाणीसाठाही झपाट्याने घटत असल्याचे चित्र आहे.
राज्यातील ३५८ तालुक्यांपैकी २६५ तालुके -दुष्काळग्रस्त घोषित केले आहेत. नागपूर जिल्ह्यात नागपूर ग्रामीण, कामठी, सावनेर, पारशिवनी, मौदा, भिवापूर, कळमेश्वर, काटोल, रामटेक, हिंगणा, उमरेड, कुही,नरखेड आणि नागपूर शहर या सर्व तालुक्यांचा त्यात समावेश आहे.
जिल्ह्यातील पाच प्रमुख धरणांची एकत्रित पाणी साठवण क्षमता १,४४९.९९ दशलक्ष घनमीटर (एमसीएम) आहे. सध्या या जलाशयांमध्ये मिळून केवळ ८८४.९७एमसीएम पाणी उपलब्ध आहे. पेंच प्रकल्पाचा प्रमुख आधार आणि जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या तोतलाडोह जलाशयातील पाणीसाठा अवघा ५५.३४ टक्के राहिला आहे.
Nagpur News : तायडे पकडला, मेश्राम निसटला; २० हजारांची लाच गेली कुठे?
धरण सध्याचा साठा मागील वर्षीचा साठा
तोतला डोह ५५.३४ टक्के ९९.९२ टक्के
वडगाव ६०,७६ टक्के १०० टक्के
खिंडसी ७६.६७ टक्के १०० टक्के
नवेगाव खैरी ८१.२२ टक्के ९७.५० टक्के
नाद ८६.३३ टक्के १०० टक्के
खरीप हंगामातील सिंचनासाठी जिल्ह्याला सुमारे ५५० एमसीएम पाण्याची आवश्यकता असते. उपलब्ध ४३६ एमसीएम साठ्याच्या तुलनेत तब्बल ११४ एमसीएमा पाण्याची कमतरता भासू शकते. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ६५ हजार हेक्टर शेती क्षेत्राला आणि संबंधिता शेतकऱ्यांना जलसंकटाचा थेट फटका बसण्याची शक्यता आहे.
Nagpur News : इमारत-उपकरणे सज्ज; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल रखडले, आता ३ महिन्यांची नवी मुदत
पावसाळा संपत असताना जिल्ह्याच्या जलसाठ्याची स्थिती प्रशासनासाठी चिंतेचा विषय बनली आहे. मर्यादित पाणीसाठ्यातून नागरिकांसाठी पिण्याचे पाणी, उद्योगांची गरज आणि शेतीसाठी सिंचन यांचा समतोल साधणे आवश्यक आहे. त्यामुळे आगामी महिन्यांत उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करणे हे प्रशासनासमोरील महत्त्वाचे आव्हान ठरणार आहे.
साठा जलसंपदा विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार तोतलाडोह, नवेगाव खैरी आणि खिंडसी या तीन जलाशयांमध्ये सध्या ७६३.५७ एमसीएम पाणी आहे. त्यापैकी सुमारे १२१ एमसीएम पाणी बाष्पीभवनामुळे कमी होण्याचा अंदाज आहे. नागपूर आणि भंडारा जिल्ह्यांसाठी पिण्याचे पाणी तसेच औद्योगिक वापरासाठी आणखी २१७एमसीएम पाणी राखून ठेवावे लागणार आहे. परिणामी सिंचनासाठी प्रत्यक्षात केवळ ४३६ एमसीएम पाणी उपलब्ध राहणार आहे.