Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News :इमारत-उपकरणे सज्ज; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल रखडले, आता ३ महिन्यांची नवी मुदत

Nagpur News : नागपुरातील सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलची इमारत आणि उपकरणे तयार असूनही रुग्णालयाचे काम रखडले आहे. दीड वर्षांच्या विलंबानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून, रुग्णालय सुरू करण्यासाठी आता तीन महिन्यांची नवी मुदत देण्यात आली आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 29, 2026 | 02:54 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • वैद्यकीय संचालकांकडून पाहणी
  • अधिष्ठांच्या भूमिकेवर प्रश्न
  • विलंबाचा फटका ;पीजीच्या जागाही रखडल्या
Nagpur News : शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयांतर्गत मेडिकल कॉलेज परिसरात उभारण्यात आलेले डेंटल सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर इमारत पूर्ण होऊनही अद्याप सुरू झालेले नाही. पाच मजली इमारतीत आवश्यक असलेल्या सुमारे ८० टक्के उपकरणांची उपलब्धता झाली आहे. मात्र, उपकरणांची उभारणी आणि आवश्यक विद्युत कामे रखडल्याने रुग्णालय सुरू करण्यास विलंब होत आहे.

प्रकल्पाला दीड वर्ष विलंब झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची दखल घेत अधिकाऱ्यांना फटकारले. आता रुग्णालय सुरू करण्यासाठी आणखी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.मेडिकलच्या अधिष्ठाता कार्यालयासमोर ४,७७०.१२ चौरस मीटर जागेवर हे रुग्णालय उभारण्यात आले आहे. या इमारतीचे भूमिपूजन ४ जानेवारी २०१९ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले होते.

रुग्णालयासाठी मंजूर करण्यात आलेल्या एकूण ९१ पदांपैकी ६० पदे भरण्यात आली आहेत. अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) माध्यमातून सुमारे ३ कोटी ८९ लाख रुपयांच्या उपकरण खरेदीला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.

याशिवाय राज्य योजनेतून सुमारे ३ कोटी ४३ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून बहुतांश उपकरणे उपलब्ध झाली असून, उर्वरित सुमारे २० टक्के उपकरणेही लवकरच येणार आहेत.विद्युत कामेही रखडली आहेत .उपकरणे बसविण्याचे काम पूर्ण झाले नसल्याने संबंधित कक्षांमधील विद्युत फिटिंगचे कामही प्रलंबित असल्याची माहिती आहे. आवश्यक विद्युत जोडणीशिवाय आधुनिक उपकरणे सुरु करता येणार नाहीत .

Nagpur News : कापूस उत्पादनात मोठी झेप घेण्याची वेळ! नितीन गडकरींचे आवाहन

वैद्यकीय संचालकांकडून पाहणी

वैद्यकीय संचालक लवकरच रुग्णालयाला भेट देऊन प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याची माहिती आहे. यापूर्वीही वैद्यकीय संचालक मेडिकलमध्ये आले होते, मात्र, त्यावेळी डेंटल सुपरस्पेशालिटी प्रकल्पाकडे अपेक्षित लक्ष दिले गेले नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या विलंबाबाचत अधिष्ठाता कार्यालयापासून वरिष्ठ प्रशासकीय पातळीपर्यंत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

अधिष्ठांच्या भूमिकेवर प्रश्न

सामान्यतः निधीअभावी प्रकल्प रखडतात. मात्र, या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध असूनही प्रशासकीय पातळीवर अपेक्षित गती नसल्याने विलंब होत असल्याचे चित्र आहे. तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अभय दातारकर यांनी प्रकल्पाच्या कामात सक्रिय भूमिका घेतल्याचे सांगितले जाते.

त्यांच्या बदलीनंतर प्रभारी अधिष्ठाता जबाबदारी सांभाळत आहेत. प्रकल्पाच्या कामासाठी बऱ्याच कालावधीत बैठक न झाल्यानेही काम रखडल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रकल्पाबाबत विचारणा झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागासोबत बैठक घेण्यात आल्याचेही सांगण्यात येते.

Nagpur News : देशातील पहिले दंतचिकित्सा केंद्र नागपुरात

विलंबाचा फटका ;पीजीच्या जागाही रखडल्या

विलंबामुळे उपकरणांच्या किमती वाढण्याची शक्यता असून, सुपरस्पेशालिटी उपचाराची प्रतीक्षा करणाऱ्या रुग्णानाही आणखी काही काळ थांबावे लागणार आहे. याशिवाय रुग्णालय सुरू झाल्यानंतर विविध विभागांमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रत्येकी तीन जागा वाढण्याची अपेक्षा होती.

मात्र, प्रकल्प रखडल्याने या प्रक्रियेलाही विलंब झाला आहे. नवीन रुग्णालय सुरू झाल्यानंतर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा सध्याच्या तुलनेत जवळपास दुप्पट होऊन ४४ पर्यंत जाण्याची अपेक्षा आहे. सध्या प्रथम वर्षात २१ विद्यार्थी आहेत.

Web Title: Nagpur news building and equipment ready but super speciality hospital delayed new 3 month deadline set

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 02:54 PM

Topics:  

  • Hospital News
  • Marathi News
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Nagpur Protest : शिक्षकांचे बेमुदत साखळी उपोषण सुरू
1

Nagpur Protest : शिक्षकांचे बेमुदत साखळी उपोषण सुरू

Chandrapur News: ४० फुटांचा रस्ता सायंकाळी १५ फुटांवर; बंगाली कॅम्प चौकातील अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी, अतिक्रमणावर कारवाईची मागणी
2

Chandrapur News: ४० फुटांचा रस्ता सायंकाळी १५ फुटांवर; बंगाली कॅम्प चौकातील अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी, अतिक्रमणावर कारवाईची मागणी

Raigad News: अजेंडा, कर्जमाफी अन् ई-पीक पाहणीवरून शेतकरी आक्रमक;  दुष्काळाच्या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन
3

Raigad News: अजेंडा, कर्जमाफी अन् ई-पीक पाहणीवरून शेतकरी आक्रमक; दुष्काळाच्या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन

KARJAT: कोंढाणेच्या जमिनीवरून थोरवेंवर घारेंचा हल्लाबोल; ED चौकशीची मागणी
4

KARJAT: कोंढाणेच्या जमिनीवरून थोरवेंवर घारेंचा हल्लाबोल; ED चौकशीची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.