Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : विदर्भ साहित्य संघाच्या इमारतीचा वाद आता हायकोर्टात ! राज्यसरकार सह प्रतिवादींना नोटीस .

Nagpur News : नागपूरातील विदर्भ साहित्य संघाच्या इमारतीसंदर्भातील वाद आता उच्च न्यायालयात पोहोचला आहे. या प्रकरणाची दखल घेत न्यायालयाने महाराष्ट्र शासनासह संबंधित प्रतिवादींना नोटीस बजावून उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 02, 2026 | 04:19 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • ट्रस्ट , विकासकांच्या व्यवहाराच्या चौकशीची मागणी
  • २००४ च्या निर्देशाचे पालन नाही
  • ट्रस्ट , विकासकाच्या व्यवहाराची मागणी
Nagpur News : विदर्भ साहित्य संघाच्या इमारतीच्या (धनवटे रंगमंदिर) कथित अनियमितता, अपूर्ण बांधकाम आणि अग्निसुरक्षा नियमांच्या उल्लंघनाचा मुद्दा हायकोर्टात पोहोचला आहे. या जनहित प्रकरणाची प्राथमिक सुनावणी घेत न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्या खंडपीठाने राज्य सरकार, महापालिका आणि अन्य संबंधित प्रतिवादींना नोटीस बजावून उत्तर मागितले. उल्हास केळकर व इतरांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. विदर्भ साहित्य संघ ट्रस्ट आणि शेवाळकर डेव्हलपर यांच्यात झालेल्या सर्व करारांची फॉरेन्सिक निष्पक्ष ऑडिट ,चौकशी,तसेच प्रकल्पाचे मंजूर नकाशा विरोधात झालेल्या बांधकामावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

नागपूरमध्ये उभारण्यात येणार जागतिक दर्जाचे कन्व्हेन्शन सेंटर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

याचिकेत ट्रस्ट आणि डेव्हलपरमधील आर्थिक व्यवहारांची चौकशी, फॉरेन्सिक ऑडिट, मनपाकडून मूळ बांधकाम मंजुरीचे अभिलेख मागवणे, अनधिकृत सुधारित मंजुरी रद्द करणे तसेच इमारतीला वैधानिक आणि अग्निसुरक्षा मंजुरी मिळणे शक्य नसल्यास ती पाडून पारदर्शक पद्धतीने नव्याने विकास करण्याची मागणी केली आहे. तसेच या संकुलात दररोज कोचिंग व ट्युशनसाठी येणारे शेकडो विद्यार्थी आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे निर्देश देण्याची मागणीही याचिकेत केली आहे.

केवळ १ रुपयाची होती वार्षिक लीज

याचिकेनुसार, १९५१ मध्ये सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांसाठी विदर्भ साहित्य संघाला १.१२ एकर जमीन केवळ एक रुपया वार्षिक लीजवर दिली होती. त्यानंतर १९५८ मध्ये या ठिकाणी धनवटे रंगमंदिर उभारले. जुने सभागृह पाडून नवीन थिएटर आणि व्यावसायिक संकुल विकसित करण्यासाठी १९९२ मध्ये शेवाळकर डेव्हलपरसोबत करार केला. याचिकाकर्त्यांचा आरोप आहे की, अनेक वर्षे उलटूनही प्रकल्प अपूर्ण आहे. त्यानंतर केलेल्या पूरक करारांमध्ये मूळ अटींमध्ये बदल केले. मात्र, आवश्यक वैधानिक मंजुरी घेतली नाही.

Nagpur : विदर्भ साहित्य संघ आपली जागा परत करणार !

२००४ च्या निर्देशाचे पालन नाही

२००४ मध्ये उच्च न्यायालयाने डेव्हलपरला १२५० आसन क्षमतेचे वातानुकूलित सभागृह आणि सांस्कृतिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. मात्र, त्याची अंमलबजावणी झाली नसल्याचा दावा याचिकेत केला आहे. फायर एनओसी आणि अधिभोग प्रमाणपत्राशिवाय वापर सुरू असल्याचा दावा संकुलातील इमारतीचा वापर अधिभोग प्रमाणपत्र (ऑक्युपन्सी सर्टिफिकेट) आणि अग्निशमन विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्राशिवाय सुरू असल्याचा आरोप याचिकेत केला आहे. अग्निशमन विभागाने नोटीस बजावल्यानंतरही मनपाने ठोस कारवाई केली नसल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

Web Title: Nagpur news dispute over vidarbha sahitya sangh building now in high court notices issued to the state government and other respondents

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2026 | 02:58 PM

Topics:  

  • Bombay High Court
  • nagpur court
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Nagpur Crime : पोलिस पहाऱ्यातून मकोका आरोपी पसार !
1

Nagpur Crime : पोलिस पहाऱ्यातून मकोका आरोपी पसार !

Devendra Fadnavis : ‘अमृत-2’ची सर्व कामं मार्च 2027 पर्यंत पूर्ण करा, कुचराई करणाऱ्यांवर कारवाई,’ मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा आदेश
2

Devendra Fadnavis : ‘अमृत-2’ची सर्व कामं मार्च 2027 पर्यंत पूर्ण करा, कुचराई करणाऱ्यांवर कारवाई,’ मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा आदेश

Ganeshotsav 2026: अरे देवा! गणेशोत्सवातील DJ, लाऊडस्पीकर अन् ढोल-ताशांचा आवाज हायकोर्टात; नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीची मागणी
3

Ganeshotsav 2026: अरे देवा! गणेशोत्सवातील DJ, लाऊडस्पीकर अन् ढोल-ताशांचा आवाज हायकोर्टात; नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीची मागणी

Nagpur News : व्यापाऱ्यांनी जावे तरी कुठे? रोख व्यवहारांवरील बंदी, वाढते बँकिंग शुल्क, डिजिटल पेमेंटचा खर्च
4

Nagpur News : व्यापाऱ्यांनी जावे तरी कुठे? रोख व्यवहारांवरील बंदी, वाढते बँकिंग शुल्क, डिजिटल पेमेंटचा खर्च

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.