फोटो सौजन्य सोशल मीडिया
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ११.३० ते १२ वाजता मोनू आमदार निवास परिसरात आला. काही वेळ इकडे-तिकडे फिरल्यानंतर तो चौकातील मोबाईल नेटवर्क टॉवरवर चढला. काही वेळात ही बाब नागरिकांच्या लक्षात आली आणि घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली. माहिती मिळताच सीताबडी आणि अंबाझरी पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला.
महापालिकेच्या अग्निशमन विभागालाही पाचारण केले. अग्निशमन दलाचे जवान ‘टर्न टेबल वाहनासह घटनास्थळी पोहोचले. जवानांनी शिडीच्या लायडर’ (टीटीएल) मदतीने टॉवरपर्यंत पोहोचून मोनूला खाली येण्याची विनंती केली. मात्र, मोनू काहीही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. जवान त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसताच तो आणखी वर चढत होता.
जवळपास तासभर समजूत काढूनही तो खाली आला नाही. उलट, त्याने जवानांकडे पाणी आणि खाण्यासाठी मागणी केली. जवानांनी त्याला पाण्याची बाटली आणि समोसे दिले. मात्र, त्याचा हट्ट कायम राहिला. जवानांनी हात पकडून त्याला खाली आणण्याचाही प्रयत्न केला, पण तो निष्फळ ठरला.
Nagpur News : बीपीच्या गोळीवरच प्रश्नचिन्ह! मेयोतील ‘टेल्मिसार्टन’ ‘नॉट ऑफ स्टँडर्ड क्वालिटी’
मोनूची भाषा समजण्यात अडचण येत असल्याने जवानांनी वेगळी शक्कल लढवली. छत्तीसगडी भाषा येणाऱ्या मजुराला जवानांसोबत टॉवरवर पाठवले. त्या मजुराने मोनूला बोलण्यात गुंतवून ठेवले. याच संधीचा फायदा घेत जवानाने टॉवरच्या पाय-यांवरून तर दुसन्याने शिडीच्या मागील बाजूने गुपचूप वर चढत त्याच्याजवळ पोहोचले. मोनू बोलण्यात गुंग असतानाच दोन्ही जवानांनी त्याला पकडले आणि शिडीत बसवले. त्यानंतर शिडीने खाली आणले.
Nagpur News : मनपा, पोलिसांचे ‘ऑपरेशन १०० किमी’
पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत मोनूची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे समोर आले आहे. तो सोमवारी काही मित्रांसोबत नागपुरात आला होता. मात्र, मित्र त्याला सोडून निघून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. नागपुरात आल्यानंतर खाण्यापिण्याचीही अडचण निर्माण झाल्याने त्याने टॉवरवर चढून रोष व्यक्त केला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.






