Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News :नागपूरचे आकाश घेणार एअरोस्पेसची नवी झेप;महिंद्रा-एम्ब्रायरची शहराला पसंती

Nagpur News : नागपूरच्या एअरोस्पेस क्षेत्राला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. महिंद्रा आणि एम्ब्रायर यांच्या संयुक्त विमाननिर्मिती प्रकल्पासाठी नागपूरला पसंती मिळाल्याची माहिती समोर आली असून, या प्रकल्पामुळे शहराच्या औद्योगिक आणि एअरोस्पेस क्षेत्राला नवी दिशा मिळू शकते.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 03, 2026 | 03:26 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • दोन जुन्या विमानांची जागा घेण्याची योजना
  • महिंद्रा-एम्ब्रायर भागीदारीला गती
  • अब्जावधी डॉलरच्या कराराकडे लक्ष
Nagpur News : देशाच्या संरक्षण आणि एअरोस्पेस क्षेत्रात नागपूरचे महत्त्व आणखी वाढण्याची शक्यता आहे.
महिंद्रा समूह आणि ब्राझीलमधील आघाडीची एअरोस्पेस कंपनी एम्ब्रायर यांनी भारतीय हवाई दलासाठी प्रस्तावित मीडियम ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट (एमटीए) कार्यक्रमांतर्गत सी-३९० मिलेनियम लष्करी वाहतूक विमानाच्या निर्मिती व असेंबलीसाठी नागपूरची संभाव्य फायनल असेंबली लाइन (एफएएल) म्हणून निवड केली आहे.

भारतीय हवाई दलाने सी-३९० मिलेनियमची निवड केल्यास शहरात अत्याधुनिक विमान निर्मिती आणि असेंबली केंद्र उभारले जाईल, यासाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून देणे तसेच पायाभूत सुविधांच्या कामांना गती देण्यासाठी महिंद्रा आणि एम्ब्रायर महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने पुढील प्रक्रिया राबवत आहेत.एअरोस्पेस उद्योगाला मिळणार चालना: प्रस्तावित केंद्रात केवळ विमानांची असेंबलीच केली जाणार नाही तर सिस्टीम इंटिग्रेशन, मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंग आणि स्थानिक पुरवठा साखळी उभारण्यावरही भर दिला जाणार आहे.

केंद्र सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’ अभियानाशी सुसंगत असलेल्या प्रकल्पातून संरक्षण उत्पादनासोबतच एमआरओ आणि आफ्टरमार्केट सेवांचे जाळे मजबूत करण्याचे उद्दिष्ट आहे.महाराष्ट्र सरकारकडून सहकार्य महिंद्रा समूहाच्या एक्झिक्युटिव्ह बोर्डचे सदस्य विनोद सहाय आणि एम्ब्रायर डिफेन्स अॅण्ड सिक्युरिटीचे सीईओ बॉस्को दा कोस्टा ज्युनियर यांनी जमीन वाटप आणि इतर आवश्यक बाबींमध्ये सहकार्य केल्याबद्दल महाराष्ट्र सरकारचे आभार मानले आहेत.

सी-३९० मिलेनियम हे बहुउद्देशीय लष्करी वाहतूक विमान आहे.तब्बल २६ टन वजनाचा पेलोड वाहून नेण्याची त्याची क्षमता आहे. कच्च्या धावपट्टीवर उतरण्याची क्षमता असलेल्या विमानाचा वापर आपत्ती निवारण, लष्करी वाहतूक तसेच शोध आणि बचाव मोहिमांसाठीही करता येतो.

Nagpur News : अन्यथा ओबीसींचे चलो दिल्ली ;२५ ऑक्टोबरला जिल्ह्यात मोर्चे

दोन जुन्या विमानांची जागा घेण्याची योजना

प्रस्तावित विमानामुळे भारतीय हवाई दलातील जुन्या सोव्हिएत काळातील एएन-३२ आणि आयएल-७६ विमानांची जागा घेण्याची योजना आहे. सी-३९० मिलेनियमसोबत कराराच्या शर्यतीत एअरबस डिफेन्स अॅण्ड स्पेसचे ए-४००एम आणि लॉकहीड मार्टिनचे सी-१३० जे सुपर हरक्यूलिस ही दोन विमानेही आहेत. भारतीय हवाई दलाकडे सध्या सी-१३० जे सुपर हरक्यूलिसची १२ विमाने कार्यस्त आहेत.

महिंद्रा-एम्ब्रायर भागीदारीला गती

भारतामध्ये संरक्षण उत्पादन, विमान असेंबली आणि एमआरओ सुविध विकसित करण्याच्या उद्देशाने महिंद्र आणि एम्ब्रायर यांच्यातील धोरणात्मक भागीदारीला फेब्रुवारी २०२४ मधील सामंजस्य करारानंतर सुरुवात झाली, त्यानंतर दोन्ही कंपन्य भारतात या क्षेत्रातील पायाभूत सुविध उभारण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. नागपूरची संभाव्य निवड ह त्याच प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्प मानला जात आहे.

Nagpur Sport : व्हीएचएला पुन्हा धक्का; हॉकी मैदानाचा भाडेपट्टा रद्द

अब्जावधी डॉलरच्या कराराकडे लक्ष

भारतीय हवाई दलासाठी सुमारे ८० मध्यम वाहतूक विमाने खरेदी करण्याच्या प्रस्तावाकडे एम्बायर आणि महिंद्रा समूहाचे लक्ष आहे. या करारासाठी सी-३९० मिलेनियमची निवड झाल्यास नागपुरात त्याची असेंबली लाइन उभारली जाऊ शकते. मात्र, हा करार दोन्ही कंपन्यांना मिळाल्यानंतरच प्रत्यक्ष उत्पादन केंद्र उभारणीचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यासाठी भारतात स्थानिक उत्पादन आणि सपोर्ट हब उभारण्याच्या दृष्टीने प्राथमिक तयारी सुरू केली आहे.

Web Title: Nagpur news nagpurs aerospace sector set to soar to new heights mahindra embraer chooses the city cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2026 | 03:26 PM

Topics:  

  • Mahindra
  • Marathi News
  • Nagpur News

संबंधित बातम्या

समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; गेल्या साडेतीन वर्षांत 633 अपघात, 572 जणांचा मृत्यू
1

समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; गेल्या साडेतीन वर्षांत 633 अपघात, 572 जणांचा मृत्यू

Chandrapur News: पावसाने पाठ फिरवली, उभी पिके वाळली;   गोंडपिपरीत दुष्काळाचे सावट, बळीराजाला आर्थिक मदतीची गरज
2

Chandrapur News: पावसाने पाठ फिरवली, उभी पिके वाळली; गोंडपिपरीत दुष्काळाचे सावट, बळीराजाला आर्थिक मदतीची गरज

Nagpur News :अन्यथा ओबीसींचे चलो दिल्ली ;२५ ऑक्टोबरला जिल्ह्यात मोर्चे
3

Nagpur News :अन्यथा ओबीसींचे चलो दिल्ली ;२५ ऑक्टोबरला जिल्ह्यात मोर्चे

Raigad News: उरणमध्ये पाणीटंचाईचे संकट? रानसई धरणाचा पाणीसाठा घटला; नोव्हेंबरपासून कपातीची शक्यता
4

Raigad News: उरणमध्ये पाणीटंचाईचे संकट? रानसई धरणाचा पाणीसाठा घटला; नोव्हेंबरपासून कपातीची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.