
फोटो सौजन्य सोशल मीडिया
त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने संबंधित औषधाची विक्री व वितरण तातडीने थांबवून उपलब्ध संपूर्ण साठा परत मागविण्याचे निर्देश दिले आहेत. काही दिवसांपूर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पॅरासिटामॉलच्या गुणवत्तेबाबत अशाच प्रकारची कारवाई केली होती. त्यानंतर आता मेयोतील टेल्मिसार्टनच्या साठ्यावरही बंदी घालण्यात आल्याने शासकीय रुग्णालयांमधील औषधांच्या गुणवत्ता मेयोच्या मेडिकल स्टोअरकडून जारी तपासणीबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.
करण्यात आलेल्या पत्रात ‘टेल्मिसेव ४०’च्या सीएचपीएलटी४१६ या बॅचचा उल्लेख आहे. या औषधाची निर्मिती जुलै २०२५ मध्ये, तर मुदत जून २०२७पर्यंत आहे. क्यूरेजा हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड, इंदूर (मध्य प्रदेश) या कंपनीने हे औषध तयार केले आहे.
Nagpur News : मनपा, पोलिसांचे ‘ऑपरेशन १०० किमी’
गुणवत्तेबाबत अहवाल आल्यानंतर संबंधित औषधाची विक्री व वितरण चाबविण्याचे तसेच वितरित केलेला साठाही तातडीने परत मागविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. औषधाची खरेदी, वितरण व विक्रीशी संबंधित कागदपत्रांच्या प्रमाणित प्रतीही उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आले आहे. पत्रात ड्रग्स अॅण्ड कॉस्मेटिक्स कायद्यातील संबंधित तरतुदींचाही उल्लेख आहे निर्देशानंतर वाँडाँसह औषधालयातून संबंधित औषधांचा साठा परत घेतला जात आहे.
काही दिवसांपूर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पॅरासिटामॉलच्या गुणवत्तेबाबत कारवाई करण्यात आली होती. आता मेयोतील टेल्मिसार्टनच्या बॅचवरही बंदी घालण्यात आल्याने सरकारी रुग्णालयांमध्ये औषधांची गुणवत्ता तपासणी आणि पुरवठा व्यवस्थेबाबत चर्चा सुरू झाली आहे.
Nagpur News : आता वाळू लिलाव प्रक्रिया अधिक पारदर्शक होणार
तपासणीदरम्यान औषधाच्या बाहा स्वरूपासह विरघळण्याच्या क्षमतेत त्रुटी आढळल्या. अहवालानुसार, तपासलेल्या ४० पैकी जवळपास सर्वच गोळ्यांवर सामान्य प्रकाशात असमान फिकट तपकिरी रंगाचे डाग दिसून आले, तसेच नमुना ‘डिसॉल्यूशन टेस्ट’ अर्थात विरघळण्याच्या चाचणीतही निर्धारित निकष पूर्ण करू शकला नाही. त्यामुळे संबंधित नमुना निर्धारित गुणवत्ता मानकांनुसार नसल्याचे घोषित करण्यात आले.