Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : रुग्णालयापासून विमानतळापर्यंत पोहोचणे कठीण; पदयात्रेने शहर जाम

Nagpur News : नागपुरात गुरुवारी काढण्यात आलेल्या पदयात्रेमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली. वर्धा मार्ग, मेडिकल चौक, धंतोली, दीक्षाभूमी आणि धरमपेठ परिसरात वाहनांच्या लांब रांगा लागल्या. रुग्ण, प्रवासी, नोकरदार आणि व्यापाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. वाहतूक नियोजनावर नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Nov 06, 2026 | 05:08 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • वर्धा मार्गापासून मेडिकल चौकापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा
  • रुग्णालयांकडे जाणाऱ्या रुग्णांची गैरसोय; पोलिसांच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
  • स्वागतासाठी मंच उभारले; मात्र बाजारपेठांमध्ये ग्राहकांची प्रतीक्षा
Nagpur News : सणासुदीच्या दिवसांत नागपुरात काढण्यात आलेल्या पदयात्रेचा मोठा फटका शहराच्या वाहतूक व्यवस्थेला बसला. गुरुवारी सायंकाळी सुरू झालेली वाहतूक कोंडी रात्री उशिरापर्यंत कायम राहिली. प्रमुख चौकांपासून अंतर्गत रस्त्यांपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने नोकरदार, रुग्णांचे नातेवाईक, प्रवासी आणि व्यापारी त्रस्त झाले. वाहतूक पोलिसांच्या नियोजनावरही नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले.

वर्धा मार्गापासून मेडिकल चौकापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा

गुरुवारी सायंकाळी पदयात्रेमुळे शहरातील प्रमुख मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली. वर्धा मार्गावरील कृपलानी चौक ते छत्रपती चौक या दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अजनी रेल्वे स्थानक, मोक्षधाम, घाट रोड, मेडिकल चौक, अशोक चौक, महाल आणि सेंट्रल एव्हेन्यू परिसरातही वाहतुकीचा खोळंबा झाला.

सायंकाळी कार्यालये सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या नोकरदारांना तासन्तास रस्त्यावर अडकून राहावे लागले. रेल्वे स्थानक आणि विमानतळ गाठण्यासाठी निघालेल्या प्रवाशांचीही मोठी धावपळ झाली. पर्यायी मार्गांचा वापर करून कोंडीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणारे वाहनचालकही अडकून पडले.

Nagpur News : आशा, गटप्रवर्तकांचा धडकला ‘दे धडक’ मोर्चा; दिवाळीनंतर बैठकीचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

रुग्णालयांकडे जाणाऱ्या रुग्णांची गैरसोय; पोलिसांच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह

धंतोली परिसरातील रुग्णालयांकडे जाणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांना वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागला. अंतर्गत रस्त्यांवरही वाहनांच्या रांगा लागल्याने रुग्णवाहिकांना मार्ग मिळणे कठीण झाले. दीक्षाभूमी मार्ग, लक्ष्मीनगर चौक, व्हीआयपी रोड, सेमिनरी हिल्स, दीक्षाभूमी चौक आणि आठरस्ता चौक ते गणेशनगर चौकापर्यंत वाहतुकीचा वेग मंदावला होता.

अनेक तास नागरिक कोंडीत अडकून पडले असतानाही परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यंत्रणेला अपेक्षित यश आले नाही, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. काही ठिकाणी वाहतूक पोलीस उपस्थित होते; मात्र वाहनांच्या लांबच लांब रांगा कमी होत नसल्याने पोलिसांच्या पूर्वनियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या जागेवर उभारणार आंतरराष्ट्रीय केंद्र; कृषी केंद्रासाठी 880 कोटी मंजूर

स्वागतासाठी मंच उभारले; मात्र बाजारपेठांमध्ये ग्राहकांची प्रतीक्षा

पदयात्रेच्या स्वागतासाठी काही व्यापारी संघटनांनी विविध ठिकाणी मंच उभारले होते. मात्र, याच पदयात्रेमुळे बाजारपेठांमध्ये ग्राहकांची ये-जा थांबल्याने व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसला. ऐन सणासुदीच्या काळात ग्राहकांना दुकानांपर्यंत पोहोचणेही कठीण झाले. धरमपेठ बाजारपेठेत अनेक तास वाहतुकीचा खोळंबा राहिल्याने व्यापारी आणि दुकानदारांना ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागली.

अशा गर्दीच्या काळात पदयात्रांचे आयोजन टाळायला हवे होते, अशी नाराजी व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. दिल्लीतील आर्थिक नुकसानीची चर्चा करणाऱ्यांनी नागपुरातील व्यापारी आणि सामान्य नागरिकांच्या अडचणींचाही विचार करावा, अशी प्रतिक्रिया उमटली. अनेक वाहनचालकांनी कोंडीत अडकून राहण्यापेक्षा वाहने मागे फिरवून घरी जाणे पसंत केले. त्यामुळे पदयात्रेच्या आयोजनापेक्षा नागरिकांना झालेल्या मनस्तापाचीच शहरात अधिक चर्चा रंगली.

Web Title: Nagpur news rally traffic jam hospital airport travel disruption cp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 05:08 PM

Topics:  

  • Marathi News
  • Nagpur News
  • Traffic News

संबंधित बातम्या

Sanjay Mone : माधुरींच्या कार्यक्रमावर टीका अन् सोशल मीडियावर ट्रोलिंग; संजय मोने यांनी मौन सोडलं!
1

Sanjay Mone : माधुरींच्या कार्यक्रमावर टीका अन् सोशल मीडियावर ट्रोलिंग; संजय मोने यांनी मौन सोडलं!

Rise and Fall 2 Winner: भाजपला रामराम, रिअॅलिटी शोमध्ये धमाका! शहजाद पूनावालाने पटकावले विजेतेपद
2

Rise and Fall 2 Winner: भाजपला रामराम, रिअॅलिटी शोमध्ये धमाका! शहजाद पूनावालाने पटकावले विजेतेपद

Chhatrapati Sakhar Karkhana News: ‘वजन चोख, पैसे रोख’ धोरण; छत्रपती कारखान्याची दोन लाख टन ऊस गाळप यशस्वी
3

Chhatrapati Sakhar Karkhana News: ‘वजन चोख, पैसे रोख’ धोरण; छत्रपती कारखान्याची दोन लाख टन ऊस गाळप यशस्वी

Boondi Ladoo Recipe: दिवाळीचा गोडवा वाढवा! हलवाईसारखे मऊ बुंदीचे लाडू बनवण्याची खास पद्धत
4

Boondi Ladoo Recipe: दिवाळीचा गोडवा वाढवा! हलवाईसारखे मऊ बुंदीचे लाडू बनवण्याची खास पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.