Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sanjay Mone : माधुरींच्या कार्यक्रमावर टीका अन् सोशल मीडियावर ट्रोलिंग; संजय मोने यांनी मौन सोडलं!

Sanjay Mone : ज्येष्ठ मराठी अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक संजय मोने यांनी ‘कोण होणार करोडपती’ कार्यक्रमाच्या सादरीकरणावर उपरोधिक पोस्ट शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री माधुरी दीक्षित करत आहेत.

  • By Riddhi Vanne
Updated On: Nov 06, 2026 | 05:46 PM
Sanjay Mone : (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Sanjay Mone : (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • माधुरी दीक्षितांच्या शोवरील पोस्टमुळे संजय मोने चर्चेत
  • पत्नीच्या लोकप्रियतेवरून ट्रोलर्सना दिलं उत्तर
  • ४२ वर्षांच्या कारकिर्दीचा दाखला देत टीकाकारांना सुनावलं

मराठी सिनेसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक संजय मोने सध्या सोशल मीडियावर जोरात चर्चेत आहेत. कारण आहे ‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम.या नव्या पर्वात माधुरी दीक्षित सूत्रसंचालन करतेय. कार्यक्रम बघितल्यावर संजय मोने यांनी एक उपरोधिक पोस्ट टाकली. आणि मग काय, सोशल मीडियावर वादच सुरू झाला. काहींनी त्यांच्या मताला पाठिंबा दिला, तर काहींनी त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली. आता या सगळ्या टीकेला मोने यांनी चांगलंच उत्तर दिलंय.Sanjay Mone :

नेमकं काय म्हणाले होते मोने?

‘कोण होणार करोडपती’ मध्ये माधुरी सूत्रसंचालन करताना दिसतेय. कार्यक्रम पाहून मोने यांनी अमिताभ बच्चन आणि माधुरी दीक्षित यांच्या संदर्भात एक पोस्ट लिहिली होती. त्यात त्यांनी एक जुनी मराठी म्हण वापरून कार्यक्रमाच्या सादरीकरणावर प्रश्न उपस्थित केला होता.

पण नंतर त्यांनी हे पण स्पष्ट केलं की, माझी टीका माधुरीच्या अभिनयावर किंवा तिच्या व्यक्तिमत्त्वावर नव्हती. मला फक्त कार्यक्रमाचं सादरीकरण कसं होतंय, याबद्दल बोलायचं होतं. कलाकार म्हणून माधुरी किती मोठी आहे, हे मला माहीत आहे.पण सोशल मीडियावर लोकांना निमित्तच लागतं. त्यांची पोस्ट बघून अनेकांनी त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली.

बायकोवरून पण टोमणे मारले

काही नेटकऱ्यांनी तर हद्दच केली. त्यांनी मोने यांच्या वैयक्तिक आयुष्यावर टिप्पणी करायला सुरुवात केली. त्यांच्या पत्नीचा उल्लेख करत, तुमच्या बायको तुमच्यापेक्षा जास्त लोकप्रिय आहे, असं म्हणायला लागले.यावर मोने यांनी फारच शांत आणि रोखठोक उत्तर दिलं. ते म्हणाले, माझी बायको माझ्यापेक्षा जास्त लोकप्रिय आणि गुणी आहे, हे मी 27 वर्षांपूर्वीच मान्य केलंय. त्यामुळे तुम्ही हे सांगून मला राग येईल असं वाटत असेल तर ते चुकीचं आहे.

Rise and Fall 2 Winner: भाजपला रामराम, रिअॅलिटी शोमध्ये धमाका! शहजाद पूनावालाने पटकावले विजेतेपद

खरं तर त्यांच्या या उत्तराने अनेकांची तोंडं बंद झाली. एखाद्याने आपल्या बायकोचं कौतुक इतक्या मनमोकळेपणाने करणं, हे आजच्या काळात क्वचितच बघायला मिळतं.ट्रोलिंगला घाबरत नाहीत मोनेसंजय मोने हे नेहमीच स्पष्टवक्ते म्हणून ओळखले जातात. त्यांना जे वाटतं ते ते थेट बोलतात. त्यामुळे त्यांना ट्रोलिंग नवीन नाही. आधी पण अनेक वेळा त्यांच्या मतांमुळे वाद झाले आहेत.

पण यावेळी त्यांनी ट्रोलर्सना चांगलीच चपराक दिली. ते म्हणाले, तुम्हाला माझं मत पटत नसेल तर तुम्ही तुमचं मत मांडा. पण वैयक्तिक पातळीवर जाऊन बोलणं हे योग्य नाही.सोशल मीडियावर एखाद्याने मत मांडलं की लगेच त्याला ट्रोल करणं, त्याच्या घरच्यांवर जाणं, हे हल्ली खूप वाढलंय. मोने यांच्या बाबतीत पण तेच झालं.

संजय मोनेमध्ये पोस्ट काय लिहिलं?

परवा एक नोंद मी लिहिली त्यात बच्चन साहेब आणि माधुरी बाई साहेब यांच्या बद्दल लिहिलं होतं.मला त्यात दोघांच्याही बद्दल कलाकार म्हणून काहीही गैर लिहायचं नव्हतं .प्रश्न फक्त सादर करण्याबद्दल होता.माधुरी बाईच्या दिसण्यात काहीही उणीव काढताच येत नाही.

त्या उत्तम अभिनेत्री आहेत पडद्यावर सर्वोत्कृष्ट नृत्य सादर करतात .पण ज्या लोकांनी माझ्यावर भरघोस टीका केली त्यात माझ्या एकंदर लायकी बद्दल असंख्य प्रश्न उपस्थित केले त्याबद्दल मला फक्त हसायला आले.काही लोकांनी माझ्या मुलीबद्दल “तिला करायला सांगा हा कार्यक्रम “असाही प्रश्न उपस्थित केला माझ्या पत्नीबद्दल ही काहीबाही लिहिलं …माझी पत्नी माझ्याहून जास्त लोकप्रिय आहे असं ही लिहिलं त्यामुळे मी चिडून काही प्रत्युत्तर करेन असंही त्यांना वाटलं.

Ramayana Movie: २४ कॅरेट सोन्याचं रावणाचं सिंहासन अन् पुष्पक विमानासाठी सहा वर्षांची मेहनत; ‘रामायण’ची भव्य तयारी

पण ती जास्त लोकप्रिय आहे आणि अधिक गुणी आहे हे मी 27 वर्षांपूर्वी मान्य केलं आहे.आणि काही लोकांनी माझ्या मुलीला तिने कार्यक्रम करायला सांगा असा ही प्रश्न उपस्थित केला त्याबद्दल उत्तर ..माझी मुलगी आपल्या सगळ्यांच्या मनातही येणार नाही अश्या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेऊन सध्या ऑस्ट्रेलिया येथे नोकरी करत आहे.त्या आधी ती माननीय प्रकाशबाबा आमटे यांच्याकडे दीड महिना राहून आली आहे.

जिथे no mall ,no macdonald no movie ही परिस्थिती होती.इंग्रजी माध्यमात शिक्षण घेऊनही मराठी बोलतांना तुम्ही ऐकणा-या कुठल्याही कलाकारा सारखं तिच्या वाक्याची सुरुवात so ह्या शब्दांनी होत नाही.तिला हवं ते अधिक शिक्षण घेऊन मायदेशी येण्याची तीव्र इच्छा आहे पण तिच्या शिक्षणाचा उपयोग इथे आजतरी किंवा नजीकच्या भविष्यात नाही.

माझ्या लायकीबद्दल ज्यांनी लिहिले आहे त्यांना एकदाच उत्तर देऊन त्यांची कीव करावी ही ही त्यांची “लायकी”नाही पण ..मी ४२ वर्ष या व्यवसायात आहे.६० नाटकं .४० चित्रपट आणि ३० मालिका ,९ चित्रपट लेखन ७ नाटकांच लेखन केलं आहे.१०० हजार स्तंभ लेखन केलं आहे.मला शिव्या देणा-या लोकांना हेच सांगायचं आहे की समोरच्या माणसाने आपलं मत मांडल तर त्याला प्रतिक्रिया देण्याचा अधिकार अगदीच मान्य आहे पण ..तितकी तुमची लायकी असली पाहिजे.

ज्यांनी ज्यांनी प्रतिक्रिया दिल्या त्यातली एकही व्यक्ती मला तरी नामवंत वाटली नाही.आता राहिला शेवटचा प्रश्न “तुम्ही एकदा KBC सारखा कार्यक्रम करून दाखवा “तर मी मराठीत “कानाला खडा “नावाचा कार्यक्रम करून दाखवला आहे.शिवाय इतरही कार्यक्रमांच सूत्र संचालन केलं आहे.या उप्पर आता हा विषय मी संपवला आहे कारण ज्यांनी ज्यांनी लिहील आणि ते लिहितांना जितके शब्द वापरले तितक्या संख्येची पुस्तक मी वाचलेली आहेत.असंख्य वाहिन्यांनी माझ्या विधानाला खूप प्रसिद्धी दिली त्याचा अर्थ इतकाच आहे की सध्या त्यांच्याकडे काहीही दुसरी प्रसिद्धी सामुग्री नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: संजय मोने सध्या का चर्चेत आहेत?

    Ans: ‘कोण होणार करोडपती’ कार्यक्रमावरील त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे.

  • Que: ‘कोण होणार करोडपती’चे सूत्रसंचालन कोण करत आहे?

    Ans: अभिनेत्री माधुरी दीक्षित या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत.

  • Que: संजय मोने यांनी नेमकी कोणती टीका केली होती?

    Ans: त्यांनी कार्यक्रमाच्या सादरीकरणावर प्रश्न उपस्थित केले होते.

Web Title: Sanjay mone replies to trolls madhuri dixit kaun banega crorepati post rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 05:46 PM

Topics:  

  • Entertainement News
  • madhuri dixit
  • Marathi News

संबंधित बातम्या

Rise and Fall 2 Winner: भाजपला रामराम, रिअॅलिटी शोमध्ये धमाका! शहजाद पूनावालाने पटकावले विजेतेपद
1

Rise and Fall 2 Winner: भाजपला रामराम, रिअॅलिटी शोमध्ये धमाका! शहजाद पूनावालाने पटकावले विजेतेपद

Chhatrapati Sakhar Karkhana News: ‘वजन चोख, पैसे रोख’ धोरण; छत्रपती कारखान्याची दोन लाख टन ऊस गाळप यशस्वी
2

Chhatrapati Sakhar Karkhana News: ‘वजन चोख, पैसे रोख’ धोरण; छत्रपती कारखान्याची दोन लाख टन ऊस गाळप यशस्वी

Nagpur News : रुग्णालयापासून विमानतळापर्यंत पोहोचणे कठीण; पदयात्रेने शहर जाम
3

Nagpur News : रुग्णालयापासून विमानतळापर्यंत पोहोचणे कठीण; पदयात्रेने शहर जाम

Boondi Ladoo Recipe: दिवाळीचा गोडवा वाढवा! हलवाईसारखे मऊ बुंदीचे लाडू बनवण्याची खास पद्धत
4

Boondi Ladoo Recipe: दिवाळीचा गोडवा वाढवा! हलवाईसारखे मऊ बुंदीचे लाडू बनवण्याची खास पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.