
Chhatrapati Sakhar Karkhana Bhavaninagar, Prithviraj Jachak Someshwar Chhatrapati Factory,
कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी जाहीर केलेल्या ‘वजन चोख, पैसे रोख’ या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. ऊस उत्पादकांना त्यांच्या उसाचे योग्य वजन आणि वेळेत पैसे मिळत असल्याने कारखान्यावरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. परिणामी, कारखान्याच्या कार्यक्षेत्राबाहेरील विविध भागांतील ऊस उत्पादकही आपला ऊस गाळपासाठी छत्रपती कारखान्याला प्राधान्य देत आहेत.
Karambhumi Express Fire Breaking: पंजाबमध्ये धावत्या कर्मभूमी एक्सप्रेसला भीषण आग! ४ डब्बे जळून खाक
चालू हंगामासाठी प्रतिटन ३ हजार ५०१ रुपये पहिली उचल देण्याचा निर्णय अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, उपाध्यक्ष शिवाजीराव निंबाळकर आणि संचालक मंडळाने घेतला आहे. विशेष म्हणजे, आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असतानाही कारखान्याने सभासद, कामगार आणि पुरवठादारांची देणी वेळेत अदा करण्याची भूमिका कायम ठेवली आहे. कामगारांना १५ टक्के बोनस देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. त्यामुळे कारखान्याच्या आर्थिक व्यवहारांबाबत विश्वासार्हता निर्माण झाली आहे.
६ नोव्हेंबरच्या तुलनात्मक आकडेवारीनुसार एका दिवसात ८ हजार ६९३ टन उसाचे गाळप झाले. आतापर्यंत १ लाख ८९ हजार १०० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले असून, आजची साखर रिकव्हरी १०.४३ टक्के तर हंगामातील सरासरी रिकव्हरी ९.६५ टक्के नोंदविण्यात आली आहे.
यंदा गळीत हंगामाची सुरुवातही मागील वर्षांच्या तुलनेत लवकर करण्यात आली. योग्य नियोजन, ऊस उत्पादकांना दिलेले प्राधान्य, वेळेवर होणारी बिले आणि कामगारांचे सहकार्य या बाबींमुळे कारखान्याच्या गाळपाला गती मिळाली आहे. दरम्यान छत्रपती कारखान्याच्या मशिनरीची कामे वेळेत व नियोजन पद्धतीने केल्याने कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता दररोज आठ हजार मे. टन पेक्षा अधिक आहे.
दरम्यान छत्रपती कारखान्याच्या सहयोजने निर्मिती प्रकल्पातून या हंगामात आतापर्यंत ८४,५१,८०० युनिट वीज निर्मिती केली असून, यापैकी ५३,३०,००० युनिट विजेची निर्यात केली आहे.
गतवर्षीच्या उजगणित हंगामामध्ये छत्रपती कारखान्याने आज अखेर (दि ६) फक्त २३,५५० मे. टन उसाचे गाळत केले होते. छत्रपती कारखान्याचा सध्याचा ऊस गळफाचा वेग लक्षात घेता, छत्रपती कारखाना यावर्षीच्या उजगळीत हंगामात उच्चांकी ऊस गाळप करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.