Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : तायडे पकडला, मेश्राम निसटला; २० हजारांची लाच गेली कुठे?

Nagpur News : नागपुरात एसीबीच्या कारवाईदरम्यान सचिन तायडे याला पकडण्यात आले, तर मेश्राम निसटल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईनंतर २० हजार रुपयांच्या लाचेच्या रकमेबाबतही प्रश्न उपस्थित झाले असून, ही रक्कम नेमकी कुठे गेली याचा तपास सुरू आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 30, 2026 | 02:51 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • तायडेला सात दिवसांची कोठडी
  • लाचेची रक्कम गेली कुठे
  • तक्रारदाराच्या पाठीशी एसिबी
  • प्रकरण काय आहे
Nagpur News : नागपूर. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबीने) १६ सप्टेंबरला जरिपटका ठाण्यात केलेल्या सापळा कारवाईने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. पथकाने पोलिस हवालदार सचिन माणिकराव तायडे (४८) याला रंगेहात पकडण्याची योजना बनवली होती. यात तायडे सापडला, मात्र रंगेहात नाही. या प्रकरणात आरोपी तायडेला पकडताच सहकारी कॉन्स्टेबल मनीष उत्तम मेश्राम (३०) याला अचानक फिट आली आणि उपचाराच्या बहाण्याने तो पसार झाला. भविष्यात आरोपी पोलिस सेवेत परतल्यास आपल्याला त्रास होण्याची किंवा खोट्या प्रकरणात अडकवले जाण्याची भीती तक्रारदाराने व्यक्त केली आहे. अशात कायदा त्याचे कितपत संरक्षण करू शकते, हे पाहण्यासारखे आहे .

तायडेला सात दिवसांची कोठडी

एसीबीने तायडेला ताब्यात घेतल्यानंतर मेश्रामला अचानक फिटचे झटके आले. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथून तो पसार झाला. एसीबीने तायडेला न्यायालयात हजर केले, न्यायालयाने सुरुवातीला पाच दिवसांची कोठडी दिली. त्यानंतर आणखी दोन दिवसांची कोठडी मिळाली.

तायडेकडून लाचेची रक्कम कुठे गेली, याबाबत माहिती मिळविण्याचा प्रयत्न एसीबीने केला. मात्र, त्याने तपासात सहकार्य केले नसल्याचे एसीबीचे म्हणणे आहे. दुसरीकडे, फरार झालेल्या मेश्रामला न्यायालयातून अंतरिम जामीन मिळाला आहे. ना लाचेची रक्कम मिळाली आणि ना दुसरा आरोपी सापडला.

Nagpur Protest : शिक्षकांचे बेमुदत साखळी उपोषण सुरू

लाचेची रक्कम गेली कुठे

प्रकरणातील सर्वांत महत्त्वाचा प्रश्न लाचेची २० हजारांची रक्कम नेमकी कुठे गेली, हा आहे. तायडेने ती रक्कम घेतल्याचा दावा तक्रारदाराने केला असला तरी कारवाईच्या वेळी ती त्याच्याकडून मिळाली नाही. त्यामुळे एसीबीकडून रकमेचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे. तायडे आणि मेश्राम यांच्यातील भूमिकाही तपासली जात आहे.

तक्रारदाराच्या पाठीशी एसिबी

एसीबीचे पोलिस अधीक्षक दिगंबर प्रधान यांनी प्रकरणाचा तपास गांभीर्याने सुरू असल्याचे सांगितले. लाचेची रक्कम अद्याप कुठे गेली, हे स्पष्ट झालेले नाही. तायडेसंदर्भातील अहवाल शहर पोलिसांना देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. एसीबी तक्रारदाराच्या पाठीशी असल्याचे प्रधान यांनी स्पष्ट केले.

Nagpur News : इमारत-उपकरणे सज्ज; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल रखडले, आता ३ महिन्यांची नवी मुदत

प्रकरण काय आहे

२३ वर्षीय तक्रारदाराविरुद्ध नातेवाइकाने जरिपटका पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. त्याच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला. याचा तपास एनसी तपास पथकातील पोहवा सचिन तायडेकडे सोपवला होता. या प्रकरणात सहकार्य करण्यासाठी तायडे आणि मेश्राम यांनी ४० हजारांची लाच मागितल्याचा आरोप आहे.

अखेर २० हजारांवर तडजोड झाली. तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार केली. एसीबीने सापळा रचला.ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने तायडेच्या टेबलवर रक्कम ठेवली. त्यानंतर तायडेने वर्तमानपत्राच्या कागदाने रक्कम उचलून खिशात ठेवली आणि खाली गेला. तक्रारदाराने इशारा देताच एसीबीचे पथक त्याच्या मागे गेले. मात्र, तायडेला पकडले असता लाचेची रक्कम आढळली नाही.

 

Web Title: Nagpur news tayde caught meshram escapes where did the 20000 bribe go

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 02:51 PM

Topics:  

  • ACB
  • Marathi News
  • Nagpur News
  • Nagpur Police

संबंधित बातम्या

Nagpur District : पावसाने पाठ फिरवली, धरणे आटली; पाच प्रमुख जलाशयांत केवळ ६१% पाणीसाठा
1

Nagpur District : पावसाने पाठ फिरवली, धरणे आटली; पाच प्रमुख जलाशयांत केवळ ६१% पाणीसाठा

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा
2

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा

Chandrapur News: चंद्रपूरच्या 12 तालुक्यांत दुष्काळ; शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला स्थगिती, वीजबिलातही सवलत
3

Chandrapur News: चंद्रपूरच्या 12 तालुक्यांत दुष्काळ; शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीला स्थगिती, वीजबिलातही सवलत

Pune IMD El Nino Warning : राज्यात पावसाची दांडी, खरिपाची पिके करपली!
4

Pune IMD El Nino Warning : राज्यात पावसाची दांडी, खरिपाची पिके करपली!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.