फोटो सौजन्य सोशल मीडिया
नागपूरकरांच्या १४० वर्षांची परंपरा असलेल्या हक्काच्या मारबत उत्सवाला भारतीय जनता पक्षाकडून राजकीय इव्हेंटचे स्वरूप देत जनतेच्या पैशांची उधळपट्टी केली, असा थेट आरोप विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांनी सत्ताधाऱ्यांवर केला आहे.
मारबत महोत्सवासाठी मनपाने स्थायी समितीच्या माध्यमातून केलेल्या दोन कोटींच्या तरतुदीचा नेमका किती आणि कुठे खर्च झाला, याचा लेखी हिशेब तीन दिवसांच्या आत मागितला आहे. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या आमसभेत मारबतच्या खर्चावरून सत्ताधाऱ्यांना विरोधकांच्या भडिमाराला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
Nagpur News : टॉवरवर चढला मोनू, सुरू झाली ‘वीरूगिरी’; नागपुरात ‘शोले’चा थरार!
मारबत उत्सवासाठी मनपाने खास टी-शर्ट आणि रिस्टबैंड तयार केले होते. मात्र, प्रत्यक्ष उत्सवात त्यांचा फारसा वापर झालेला दिसला नाही, असा आरोप विरोधकांनी केला. आम्हाला प्रत्येकी एक टी-शर्ट मिळाला. तोच टी-शर्ट परिधान करून बुधवारी आमसभेत येणार असल्याचे अभिजित झा आणि वसीम खान यानी सांगितले.
त्यामुळे आमसभेत या टी-शर्टमधूनही सत्ताधाऱ्यांची खिल्ली उडण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षात किती टी शर्ट छापले, किती विकले व किती वाटले, याचाही हिशेब त्यांना द्यावा लागेल, असेही नगरसेवक म्हणाले.
Nagpur News : बीपीच्या गोळीवरच प्रश्नचिन्ह! मेयोतील ‘टेल्मिसार्टन’ ‘नॉट ऑफ स्टँडर्ड क्वालिटी’
महोत्सवावर खर्च होणाऱ्या निधीतील काही रक्कम खड्डे बुजवण्यासाठी वापरली असती तर गणेशोत्सवात नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असता. खड्डयांनी व्यापलेल्या रस्त्यांवरून गणेश मंडळांच्या मूर्तींसह घरगुती बाप्पांनाही हेलकावे खातच यावे लागले. आता विसर्जनापूर्वी तरी शहरातील खड्डे बुजवण्याची सुबुद्धी सत्ताधाऱ्यांना बाप्पांनी द्यावी, असा उपरोधिक टोला महाकाळकर यांनी लगावला.






