Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : आजच्या आमसभेत निघणार सत्ताधाऱ्यांची ‘मारबत’ ?

Nagpur News : नागपूर महानगरपालिकेच्या आजच्या आमसभेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. विविध नागरी प्रश्नांवरून सभागृहात चर्चा आणि आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता असून, सत्ताधाऱ्यांना विरोधकांच्या प्रश्नांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे आजची आमसभा चांगलीच गाजण्याची शक्यता आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 16, 2026 | 03:17 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • मारबतच्या दोन कोटींचा हिशोब द्या
  • दिसणार ‘मारबत’ टी-शर्ट
  • इव्हेंट दोन कोटींचा; शहर मात्र खड्यांत
Nagpur News : मंगळवारी आयोजित पत्रपरिषदेत महाकाळकर यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी स्थायी समिती सदस्य अभिजित झा, वसीम खान, नगरसेवक दिनेश यादव, भावना लोणारे उपस्थित होते. मोठमोठे बॅनर्स, जाहिराती, त्यावर नेत्यांचे झळकणारे फोटो आणि पाहुण्यांसाठी उभारलेले भव्य स्टेज यावर जनतेच्या पैशांची उधळपट्टी झाल्याचे सांगितले .

मारबतच्या दोन कोटींचा हिशोब द्या

नागपूरकरांच्या १४० वर्षांची परंपरा असलेल्या हक्काच्या मारबत उत्सवाला भारतीय जनता पक्षाकडून राजकीय इव्हेंटचे स्वरूप देत जनतेच्या पैशांची उधळपट्टी केली, असा थेट आरोप विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांनी सत्ताधाऱ्यांवर केला आहे.

मारबत महोत्सवासाठी मनपाने स्थायी समितीच्या माध्यमातून केलेल्या दोन कोटींच्या तरतुदीचा नेमका किती आणि कुठे खर्च झाला, याचा लेखी हिशेब तीन दिवसांच्या आत मागितला आहे. त्यामुळे बुधवारी होणाऱ्या आमसभेत मारबतच्या खर्चावरून सत्ताधाऱ्यांना विरोधकांच्या भडिमाराला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

Nagpur News : टॉवरवर चढला मोनू, सुरू झाली ‘वीरूगिरी’; नागपुरात ‘शोले’चा थरार!

दिसणार ‘मारबत’ टी-शर्ट

मारबत उत्सवासाठी मनपाने खास टी-शर्ट आणि रिस्टबैंड तयार केले होते. मात्र, प्रत्यक्ष उत्सवात त्यांचा फारसा वापर झालेला दिसला नाही, असा आरोप विरोधकांनी केला. आम्हाला प्रत्येकी एक टी-शर्ट मिळाला. तोच टी-शर्ट परिधान करून बुधवारी आमसभेत येणार असल्याचे अभिजित झा आणि वसीम खान यानी सांगितले.

त्यामुळे आमसभेत या टी-शर्टमधूनही सत्ताधाऱ्यांची खिल्ली उडण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षात किती टी शर्ट छापले, किती विकले व किती वाटले, याचाही हिशेब त्यांना द्यावा लागेल, असेही नगरसेवक म्हणाले.

Nagpur News : बीपीच्या गोळीवरच प्रश्नचिन्ह! मेयोतील ‘टेल्मिसार्टन’ ‘नॉट ऑफ स्टँडर्ड क्वालिटी’

इव्हेंट दोन कोटींचा; शहर मात्र खड्यांत

महोत्सवावर खर्च होणाऱ्या निधीतील काही रक्कम खड्डे बुजवण्यासाठी वापरली असती तर गणेशोत्सवात नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असता. खड्डयांनी व्यापलेल्या रस्त्यांवरून गणेश मंडळांच्या मूर्तींसह घरगुती बाप्पांनाही हेलकावे खातच यावे लागले. आता विसर्जनापूर्वी तरी शहरातील खड्डे बुजवण्याची सुबुद्धी सत्ताधाऱ्यांना बाप्पांनी द्यावी, असा उपरोधिक टोला महाकाळकर यांनी लगावला.

Web Title: Nagpur news will the ruling party face a marbat symbolic ousting at todays general body meeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2026 | 03:17 PM

Topics:  

  • Marathi News
  • Nagpur District
  • Nagpur News

संबंधित बातम्या

AI Threat : बिल गेट्स यांचा गंभीर इशारा; घातक आजार निर्माण करण्यासाठी AIचा गैरवापर होऊ शकतो!
1

AI Threat : बिल गेट्स यांचा गंभीर इशारा; घातक आजार निर्माण करण्यासाठी AIचा गैरवापर होऊ शकतो!

Nagpur News : टॉवरवर चढला मोनू, सुरू झाली ‘वीरूगिरी’; नागपुरात ‘शोले’चा थरार!
2

Nagpur News : टॉवरवर चढला मोनू, सुरू झाली ‘वीरूगिरी’; नागपुरात ‘शोले’चा थरार!

Maharashtra Cabinet Decisions: देवेंद्र फडणवीसांचे मोठे निर्णय! ‘महा-टॅक’ कक्ष स्थापन; साखर कारखान्यांना मिळणार सॉफ्ट लोन
3

Maharashtra Cabinet Decisions: देवेंद्र फडणवीसांचे मोठे निर्णय! ‘महा-टॅक’ कक्ष स्थापन; साखर कारखान्यांना मिळणार सॉफ्ट लोन

Space War : अंतराळात अमेरिकेची शस्त्रं! आता पृथ्वीच्या कक्षेतही युद्धाची तयारी?
4

Space War : अंतराळात अमेरिकेची शस्त्रं! आता पृथ्वीच्या कक्षेतही युद्धाची तयारी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.