फोटो सौजन्य AI
छाप्यात सीबीआयने महत्त्वाची कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे जप्त केले आहेत. जप्त कागदपत्रांच्या आधारे नागपुरातील सट्टा व्यवसायात गुंतवणूक करणारे तसेच या व्यवहारांना आर्थिक मदत पुरविणाऱ्यांची भूमिका तपासली जात आहे. संबंधित पॅनलम ऑपरेटरची बँक खाती, आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीचीही चौकशी होणार आहे. प्राथमिक तपासानुसार, हा ऑपरेटर ग्राहकांकडून सट्टयाची रक्कम स्वीकारण आणि त्यांच्या खात्यांमध्ये सट्टयाचे पॉइंट जमा करण्याचे काम करीत होता.
प्रवर्तकाच्या चौकशीनंतर कारवाईला वेगः सहा हजार कोटींच्या कथित सट्टा घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. तपास यंत्रणेच्या माहितीनुसार, या सट्टा व्यासपीठाचे संचालन परदेशातून केले जात होते. या प्रकरणातील प्रवर्तक सौरभ चंद्राकर याला ओमानमधून भारतात आणल्यानंतर त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सीबीआयने अलीकडेच देशभरात छापेमारी केली.
या कारवाईदरम्यान काही ठिकाणी प्रत्यक्ष सुरू असलेले सट्टा पॅनलही आढळले असून ते बंद केले. रविनगरातील छाप्यानंतर आता तपासाची व्याप्ती नागपुरातील या रॅकेटशी संबंधित इतर व्यक्तीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
Nagpur News : १०० नगरसेवकांनी केली आयुक्तांची कोंडी; सत्तापक्षनेते बाल्या बोरकर संतापले
ईडीच्या ऑगस्ट २०२३ मधील तपासात पॅनल ऑपरेटरला नफ्यातील २० टक्के हिस्सा दिला जात असल्याचे समोर आले होते. उर्वरित ईडीच्या एका तपासात मुख्यालय आणि फ्रँचायझी पॅनल यांच्यात ७० ३० प्रमाणात नफ्याची विभागणी होत असल्याचा उल्लेख केला होता.
ग्राहकांना स्वतःच्या खात्यात पैसे जमा करण्याऐवजी इतर व्यक्तीच्या बैंक खात्यांत रक्कम पाठवण्यास सांगितले जात होते. यातील काही खाती कथितरीत्या बनावट कागदपत्रांच्या आधारे उघडली होती. या खात्यामधून सट्टचाची रक्कम वेगवेगळ्या बैंक खात्यांत फिरवली जात असे.
त्यामुळे पैशाचा मूळ स्रोत आणि व्यवहारांमागील व्यक्ती शोधणे कठीण होत होते. त्यानंतर हवाला माध्यमातूनही पैशांची देवाणघेवाण केली जात असल्याचा संशय आहे. सट्टयातून मिळालेल्या रकमेचा काही भाग परदेशात पाठवण्यासाठीही या यंत्रणेचा वापर झाल्याचा संशय सीबीआयला आहे.
Nagpur News : स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांची १० कोटींची बचत; दिवसा वीज वापरावर प्रति युनिट ८५ पैसे सवलत
महादेव सट्टा रॅकेटचे काम एखाद्या संघटित फ्रँचायझी व्यवस्थेप्रमाणे चालत असल्याचे सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) पूर्वीच्या तपासात समोर आले होते. या व्यासपीठाचे प्रवर्तक त्यांच्या सहकाऱ्यांना छोट्या फ्रँचायझीप्रमाणे सट्टयाचे पॅनल विकत होते.
प्रत्येक पॅनलचा स्वतंत्र मालक असे आणि त्याच्या हाताखाली साधारणतः चार कर्मचारी काम करीत होते. मुख्यालयाकडून पॅनल चालकांना ग्राहकांची माहिती तयार करणे आणि सट्टा खाती हाताळण्याचे अधिकार दिले जात होते. हे ऑपरेटर ग्राहकांकडून पैसे जमा करून घेत त्यांचे वापरकर्ता खाते तयार करीत आणि त्यात सट्ट्याचे पॉइंट जमा करीत. ग्राहक जिंकल्यानंतर त्यांना रक्कम देण्याची जबाबदारीही स्थानिक पॅनल चालकांवर होती.






