
फोटो सौजन्य सोशल मीडिया
खाजगीकरणामुळे सरकारची शिक्षकांना कायमस्वरूपी कामावर ठेवण्याची जबाबदारी संपते . त्यामुळे शिक्षकांसमोर विविध अडचणी निर्माण झाल्या आहेत . सरकारी शाळा बऱ्याचदा बातम्यांमधून आपली कैफियत मांडताना दिसतात . हे असेच सुरु राहिल्यास याची खूप मोठी किंमत आपल्या देशाला चुकवावी लागेल . असे तज्ञांचे मत असल्याचे समजते आहे .
Nagpur News : दत्ता मेघे इन्स्टिट्यूट झाले अदानीचे
नागपूर जिल्ह्यात प्राथमिक शिक्षक आणि केंद्रप्रमुखांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी शिक्षक संघटनांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. विविध सेवाविषयक आणि प्रशासकीय मागण्यांच्या पूर्ततेसाठी सोमवार, २८ सप्टेंबरपासून बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात झाली. मागील दोन वर्षांपासून अनेक प्रश्न प्रलंबित असून प्रशासनाकडून केवळ आश्वासने दिली जात असल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे.
Nagpur News : इमारत-उपकरणे सज्ज; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल रखडले, आता ३ महिन्यांची नवी मुदत
प्राथमिक शिक्षक आणि केंद्रप्रमुखांच्या सेवाविषयक तसेच प्रशासकीय प्रश्नांवर अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. वारंवार आश्वासने देऊनही मागील दोन वर्षांत एकही प्रकरण निकाली निघाले नसल्याचा दावा समन्वय समितीने केला.
जिल्हा परिषद प्रशासनाकडून शिक्षकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित राहिल्याने शिक्षकांच्या मनोबलावर आणि त्याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचेही समितीने म्हटले आहे.
Nagpur News : कापूस उत्पादनात मोठी झेप घेण्याची वेळ! नितीन गडकरींचे आवाहन
लीलाधर ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली धनराज बोडे, प्रवीण फाळके, समीर सुदामे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शेकडो शिक्षकांनी आंदोलनात सहभाग घेतला. खासदार श्यामकुमार बवें यांच्या उपस्थितीत शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेऊन शिक्षकांच्या प्रश्नांवर चर्चा केली.