Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur : स्मार्ट शहराचे पोलीस ठाणे कधी होणार स्मार्ट ?

Nagpur : स्मार्ट शहर म्हणून ओळख निर्माण करण्याच्या दिशेने नागपूरची वाटचाल सुरू असली, तरी शहराच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या अनेक पोलिस ठाण्यांच्या इमारती मात्र आजही जुन्याच अवस्थेत आहेत.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 04, 2026 | 02:43 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • जीर्ण इमारतीतून कारभार
  • कर्मचारी , नागरिकांचा जीव धोक्यात
  • काही ठाण्यांचा कारभार अजूनही भाड्याच्या घरात
  • लकडगंजच्या धर्तीवर आधुनिकरण व्हावे
Nagpur : अजनी पोलिस ठाण्यात छताचे पॅनेल कोसळण्याच्या घटनेने पोलिसांच्या कामाच्या ठिकाणांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. ही घटना केवळ एका पॅनेलच्या कोसळण्यापुरती मर्यादित नसून शहरातील अनेक पोलिस ठाण्यांच्या इमारतींच्या स्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. पावसाळ्यात गळती, जीर्ण इमारती, अपुरी जागा आणि मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे पोलिसांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. जीर्ण इमारती, अपुऱ्या सुविधा आणि धोकादायक संरचनांमध्ये पोलिस कर्मचारी काम करत असून, तक्रारदार नागरिकांनाही याच परिस्थितीचा सामना करावा लागत आहे.

Nagpur : पाच वर्षांतच पुलाची वाट लागली! पिवळी नदीवरील ५० मीटर पूल धोकादायक

नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी घेणारेच असुरक्षित :

पोलिस ठाणे हे नागरिकांसाठी न्याय मिळविण्याचे पहिले ठिकाण असते. मात्र, काही ठिकाणी तक्रारदारांना बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही. अनेकदा नागरिकांना ठाण्याबाहेरील बाकांवर किंवा उघड्या जागेत प्रतीक्षा करावी लागते असे चित्र अनेक ठाण्यांत पाहायला मिळते. दुसरीकडे, पोलिस कर्मचारी अरुंद खोल्यांमध्ये बसून काम करतात. नोंदी ठेवणे, चौकशी करणे, संगणकीय कामकाज आणि नागरिकांशी संवाद साधणे या सर्व बाबी मर्यादित जागेत कराव्या लागतात.

अजनीसह अनेक ठाण्यांच्या इमारती जुन्या अजनी पोलिस ठाण्याप्रमाणेच :

शहरातील धंतोली, पाचपावली, हुडकेश्वर, अंबाझरी, इमामवाडा, एमआयडीसी, नवीन कामठी, सक्करदरा आदी पोलिस ठाण्यांच्या इमारतींच्या स्थितीबाबत यापूर्वीही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या शिवाय सोनेगाव पोलिस ठाण्यात पावसाळ्यामध्ये दरवेळी विमानतळाकडून पुराच्या पाण्याचा लोंढा येतो. त्यामुळे हे पोलिस ठाणे देखील पाण्यात जाण्याची जोखीम असते. त्यामुळे या ठाण्यांमध्ये केवळ तात्पुरती दुरुस्ती न करता वाढती लोकसंख्या, गुन्ह्यांचे बदलते स्वरूप आणि आधुनिक पोलिसिंगची गरज लक्षात घेता नवीन आणि सुसज्ज इमारतींची आवश्यकता आहे.

AIIMS Nagpur : शस्त्रक्रियेसाठी तीन-तीन महिने वाट; रुग्णांच्या वाढल्या फेऱ्या..

काही ठाण्यांचा कारभार अजूनही भाड्याच्या घरात

शहरातील काही पोलिस ठाण्यांना अद्याप स्वतःची इमारत उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे पोलिस विभागाला भाड्याच्या जागेतून कारभार चालवावा लागत आहे. मर्यादित जागा, पार्किंगची समस्या, नागरिकांसाठी अपुऱ्या सुविधा आणि सुरक्षा व्यवस्थेतील अडचणी यामुळे या ठिकाणीही कामकाजावर परिणाम होत आहे. पोलिस ठाणे ही केवळ कार्यालयीन जागा नसून कायदा-सुव्यवस्थेचे केंद्र असते.

लकडगंजच्या धर्तीवर आधुनिकरण व्हावे

शहरातील लकडगंज पोलिस ठाण्याची आधुनिक इमारत उभारल्यानंतर नागरिकाभिमुख पोलिसिंगचा आदर्श निर्माण झाला. त्याच धर्तीवर इतर पोलिस ठाण्यांचेही आधुनिकीकरण करण्याची मागणी होत आहे. प्रशस्त कार्यालये, तक्रारदारांसाठी स्वतंत्र व्यवस्था, डिजिटल सुविधा, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा आणि सुरक्षित बांधकाम असलेली नवीन पोलिस ठाणी उभारण्याची गरज आहे.

स्मार्ट सिटी’ ते ‘स्मार्ट पोलिस ठाण्या ‘पर्यंतचा प्रवास कधी?

नागपूरला स्मार्ट शहराचा दर्जा मिळाला असला, तरी शहराच्या सुरक्षेचा कणा असलेल्या पोलिस ठाण्याची अवस्था सुधारण्याची प्रतीक्षा कायम आहे. सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, विभागाकडून १३ पोलिस ठाण्यांचे नुतनीकरण व अपुऱ्या जागे अभावी इतर ठिकाणी त्यांचे स्थलांतरण करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्यापैकी १०. पोलिस ठाण्यांच्या प्रस्तावाला आधीच मंजुरीही मिळाली आहे.
नागपूर सुधार प्रन्यास, महानगरपालिका यांच्याकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने हे काम रखडलेले आहे. वरिष्ठ पातळीवर दोन्ही स्वायत्त संस्थांशी समन्वय साधून लवकरात लवकर जागा मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Web Title: Nagpur when will the smart citys police station become smart

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 02:43 PM

Topics:  

  • Nagpur News
  • Nagpur Police
  • Smart City

संबंधित बातम्या

Nagpur News : देशातील मोठी सोलर इकोसिस्टीम आता नागपुरात !
1

Nagpur News : देशातील मोठी सोलर इकोसिस्टीम आता नागपुरात !

Nagpur Crime : पोलिस पहाऱ्यातून मकोका आरोपी पसार !
2

Nagpur Crime : पोलिस पहाऱ्यातून मकोका आरोपी पसार !

Devendra Fadnavis : ‘अमृत-2’ची सर्व कामं मार्च 2027 पर्यंत पूर्ण करा, कुचराई करणाऱ्यांवर कारवाई,’ मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा आदेश
3

Devendra Fadnavis : ‘अमृत-2’ची सर्व कामं मार्च 2027 पर्यंत पूर्ण करा, कुचराई करणाऱ्यांवर कारवाई,’ मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा आदेश

Nagpur News : व्यापाऱ्यांनी जावे तरी कुठे? रोख व्यवहारांवरील बंदी, वाढते बँकिंग शुल्क, डिजिटल पेमेंटचा खर्च
4

Nagpur News : व्यापाऱ्यांनी जावे तरी कुठे? रोख व्यवहारांवरील बंदी, वाढते बँकिंग शुल्क, डिजिटल पेमेंटचा खर्च

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.