Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nanded Crime News: ‘मंगल, माझ्याशी लग्न कर!’ नकार मिळताच नात्याला रक्तरंजित वळण; तरुणीचा मृत्यू, प्रियकर फरार!

Nanded Crime News: नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील पाटोदा गावात ४५ वर्षीय मंगल कोंडीबा धुमाळे यांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. मंगल यांचे गावातीलच ३५ वर्षीय कृष्णा जाधव याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती समोर आली आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 11, 2026 | 03:13 PM
Nanded Crime News: ‘मंगल, माझ्याशी लग्न कर!’ ( फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Nanded Crime News: ‘मंगल, माझ्याशी लग्न कर!’ ( फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ४५ वर्षीय मंगल धुमाळे यांचा संशयास्पद मृत्यू
  • ३५ वर्षीय कृष्णा जाधववर हत्येचा आरोप
  • घटनेनंतर संशयित फरार; पोलिसांकडून शोध सुरू
 

Woman Murder Case News: नात्यांमध्ये विश्वास आणि आपुलकी असेल तर वयाचा फरक अनेकदा गौण ठरतो. मात्र त्याच नात्यात संशय, हट्ट आणि वाद वाढत गेले तर परिस्थिती किती गंभीर होऊ शकते, याचा धक्कादायक अनुभव नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात आला आहे. एका ४५ वर्षीय महिलेचा तिच्यापेक्षा दहा वर्षांनी लहान असलेल्या प्रियकराने गळा आवळून जीव घेतल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून निघून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

मंगल कोंडीबा धुमाळे असे मृत महिलेचे नाव आहे. त्या किनवट तालुक्यातील पाटोदा गावात राहत होत्या. मंगल या अविवाहित होत्या आणि गावात त्या एकट्याच राहत असल्याची माहिती समोर आली आहे. गावातीलच ३५ वर्षीय कृष्णा जाधव याच्यासोबत त्यांचे काही काळापासून प्रेमसंबंध होते. कृष्णाचे मंगल यांच्या घरी येणे-जाणे होते. Nanded Crime News:

काही दिवसांपासून मात्र दोघांमधील संबंधांमध्ये तणाव वाढला होता. कृष्णाकडून लग्नासाठी मंगल यांच्यावर दबाव टाकला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. याच विषयावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. नात्यातील हा तणाव पुढे इतका वाढला की त्याचा शेवट एका महिलेच्या मृत्यूत झाला.

त्या रात्री नेमकं काय घडलं?

शनिवारी रात्री कृष्णा मंगल यांच्या घरी गेला होता. घरात दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. बोलाचाली वाढल्यानंतर परिस्थिती हाताबाहेर गेल्याचा आरोप आहे. यावेळी कृष्णाने मंगल यांचा गळा आवळल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला.

घटनेनंतर कृष्णा तेथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी मंगल यांच्या आई घरी गेल्या असता मुलगी घरात निपचित पडलेली दिसली. त्यांनी तत्काळ याबाबत माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात येताच किनवट पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले.

पोलिसांनी घराची पाहणी केली असता तेथे एक चप्पल आढळली. ती आरोपी कृष्णाची असल्याचा संशय पोलिसांना आला. याशिवाय घटना घडल्यानंतर कृष्णाला घरातून बाहेर पडताना मंगल यांच्या बहिणीने पाहिल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे तपासाची दिशा कृष्णाकडे वळली.

भावाने दिली पोलिसांत तक्रार

मृत महिलेचे भाऊ दत्ता कोंडीबा धुमाळे यांनी या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. कृष्णा मंगल यांच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होता. त्यातून त्याने मारहाण करून त्यांचा जीव घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

निलंबित तलाठीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठा ट्विस्ट; पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर

या तक्रारीच्या आधारे किनवट पोलिसांनी कृष्णा जाधव याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध ठिकाणी चौकशी केली जात आहे.

गावात चर्चेला उधाण

या घटनेची माहिती पसरताच पाटोदा गावासह संपूर्ण किनवट तालुक्यात खळबळ उडाली. ओळखीच्या व्यक्तीमध्ये असलेल्या संबंधाचा शेवट इतक्या गंभीर प्रकारे झाल्याने नागरिकांमध्येही चर्चा सुरू झाली आहे.

Baramati Woman Death Case: ‘अथर्व मला गोळी देतोय…’ आईला मुलीचा शेवटचा फोन; काही तासांतच घडलं भयंकर, बारामती हादरलं!

नात्यातील मतभेद सोडवण्याऐवजी ते टोकाला नेल्यास त्याचे परिणाम किती भयंकर असू शकतात, हे या घटनेने पुन्हा दाखवून दिले आहे. सध्या पोलिसांसमोर आरोपीला शोधण्याचे आणि या घटनेमागील संपूर्ण घटनाक्रम स्पष्ट करण्याचे आव्हान आहे. कृष्णा जाधव ताब्यात आल्यानंतरच त्या रात्री नेमके काय घडले, याबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. किनवट पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, आरोपीच्या शोधासाठी पथके कामाला लागली आहेत.

Web Title: Lover kills girlfriend for refusing to marry him incident in nanded

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 03:13 PM

Topics:  

  • crime news
  • Marathi News
  • nanded news

संबंधित बातम्या

भररस्त्यात लूट, महागड्या दुचाकींची चोरी; नांदेडमध्ये सराईत टोळीचा पर्दाफाश
1

भररस्त्यात लूट, महागड्या दुचाकींची चोरी; नांदेडमध्ये सराईत टोळीचा पर्दाफाश

Mira-Bhayandar News : भाषिक वादाच्या पार्श्वभूमीवर दिवाळीत ऐक्याचे दर्शन! शिवरायांचा किल्ला साकारण्यासाठी बहुभाषिक नागरिक एकवटले
2

Mira-Bhayandar News : भाषिक वादाच्या पार्श्वभूमीवर दिवाळीत ऐक्याचे दर्शन! शिवरायांचा किल्ला साकारण्यासाठी बहुभाषिक नागरिक एकवटले

US Aviation Crisis : विमान वाहतूक व्यवस्था कोलमडली; हजारो उड्डाणे रद्द, प्रवाशांचे विमानतळांवर हाल
3

US Aviation Crisis : विमान वाहतूक व्यवस्था कोलमडली; हजारो उड्डाणे रद्द, प्रवाशांचे विमानतळांवर हाल

Satara News : कॉकरोच जनता पार्टीची साताऱ्यात महत्त्वपूर्ण बैठक; दुष्काळ निर्मूलन, शिक्षण सुधारणांसाठी विशेष रणनीती
4

Satara News : कॉकरोच जनता पार्टीची साताऱ्यात महत्त्वपूर्ण बैठक; दुष्काळ निर्मूलन, शिक्षण सुधारणांसाठी विशेष रणनीती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.