Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nanded News: भ्रष्टाचार थांबता थांबेना! केवळ कागदोपत्री कामे दाखवत सरपंच आणि ग्रामसेवकाने गिळले १५ लाख रुपये

नांदेडच्या धर्माबाद तालुक्यातील पांगरी ग्रामपंचायतच्या सरपंच आणि ग्रामसेवकाने फक्त ऑनलाईन कामे दाखवत 15 लाख हडप केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 01, 2025 | 06:27 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:

धर्माबाद तालुक्यातील पांगरी ग्रामपंचायत येथे १५व्या वित्त आयोगांतर्गत मंजूर झालेल्या विकासकामांमध्ये मोठ्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश झाला आहे. सरपंच आणि ग्रामसेवक यांनी प्रत्यक्षात कोणतेही काम न करता, केवळ कागदोपत्री दाखवून सुमारे १५ लाख रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत ही बाब निष्पन्न झाली असून, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प.) याबाबत मौन बाळगत असल्याची चर्चा ग्रामस्थांत रंगली आहे.

ग्रामस्थांनी उघड केला गैरव्यवहार

ग्रामस्थ सुभाष लोखंडे, विठ्ठल जोंधळे, सचिन लोखंडे, मारोती पोशटी, मायावती लोखंडे, ज्योती जाधव आणि मालनबी शेख यांनी या प्रकरणाबाबत वेळोवेळी अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या होत्या. त्यांच्या तक्रारींवर झालेल्या चौकशीत अनेक अनियमितता आढळून आल्या असून, निधीचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

जेव्हा आयुष्यच भयपट बनते! नांदेडचे 5 विद्यार्थी सापडले होते रोहित आर्यच्या तावडीत, पुढे जे घडलं…

अंगणवाडी व नाल्यांची कामे केवळ ऑनलाईन दाखवली

ग्रामपंचायत अधिकारी बलूरकर यांनी गावात प्रत्यक्ष कोणतेही काम न करता, १५व्या वित्त आयोगांतर्गत मंजूर निधीपैकी सुमारे १५ लाख रुपये हडप केल्याचा आरोप ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे.
अंगणवाडी व बंदिस्त नाल्यांची कामे ऑनलाईन दाखवण्यात आली असली तरी, त्यांची मापन पुस्तिका (एम.बी.) उपलब्ध नसल्याचे चौकशीत आढळले आहे.

तसेच, शाळेच्या दुरुस्तीसाठी आलेले अनुदान आणि अंगणवाडीच्या एक लाख रुपयांच्या कामाचा निधी प्रत्यक्षात वापरला गेला नसून, तो ऑनलाईन पेमेंटद्वारे कंत्राटदार मोहम्मद अन्वर मोहम्मद माजिदुल्ला, मोहम्मद सलीम, मारोती यादव कुडकेकर, बुद्धिवंत सीरसे आणि शेख मुश्ताक यांच्या खात्यात वर्ग करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

Kokan News: कोकणातील शेतकऱ्यांसाठी आमदार जाधवांचा पुढाकार; मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी

ग्रामस्थांनी तक्रारपत्रात प्रश्न उपस्थित केला आहे की, या व्यवहारांसाठी आवश्यक डिजिटल सिग्नेचर (DSC) कोणी आणि कशाच्या अधिकारावर दिले?

चौकशीत भ्रष्टाचाराची पुष्टी

ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेत, ६ ऑगस्ट २०२५ रोजी विस्तार अधिकारी एस. एम. नीलमवार यांनी प्रत्यक्ष गाव भेट देऊन अभिलेख, दस्तऐवज आणि खरेदी नोंदींची तपासणी केली. या तपासात पुरवठाधारक मोहम्मद अन्वर मोहम्मद माजिदुल्ला यांच्या नावाने ११ लाख ३३ हजार रुपये आणि मारोती कुडकेकर यांच्या नावाने ७ हजार रुपये पीएफएमएस (PFMS) प्रणालीद्वारे खात्यावर वर्ग झाल्याचे स्पष्ट झाले.

या सर्व प्रकरणावर आता पुढील कारवाईची प्रतीक्षा आहे, तर ग्रामस्थांनी संपूर्ण चौकशी न्यायालयीन समितीमार्फत करण्याची मागणी केली आहे.

Web Title: Nanded news pangari village sarpanch and gram sevak corruption earn 15 lakh rupees by showing online paper work

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2025 | 06:27 PM

Topics:  

  • corruption news
  • Nanded

संबंधित बातम्या

Nanded Election : शहराचा विकास झालाच नाही, तत्कालीन सत्ताधा-यांनी विकासाच्या नावाखाली मलिदा लाटला
1

Nanded Election : शहराचा विकास झालाच नाही, तत्कालीन सत्ताधा-यांनी विकासाच्या नावाखाली मलिदा लाटला

Nanded:  भाजपच्या जाहीरनाम्यात शिवसेनेची विकासकामे- आ. बालाजी कल्याणकरांनी केला दावा
2

Nanded: भाजपच्या जाहीरनाम्यात शिवसेनेची विकासकामे- आ. बालाजी कल्याणकरांनी केला दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.