Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नांदेडमध्ये ‘वाहे गुरू .. वाहे गुरू’ चा जयघोष! अनेक ठिकाणी उत्साहपूर्ण वातावरणात लंगर सेवा,

श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या महान शहीदी समागम सोहळ्यानिमित्त नांदेडमध्ये खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच जागोजागी लंगर देखील ठेवण्यात आला होता.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 25, 2026 | 07:10 PM
Program in Nanded on the occasion of the 350th Great Martyrdom Anniversary of Guru Tegh Bahadur Sahibji

Program in Nanded on the occasion of the 350th Great Martyrdom Anniversary of Guru Tegh Bahadur Sahibji

Follow Us
Close
Follow Us:

नांदेड : ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या महान शहीदी समागम सोहळ्यानिमित्त आज नांदेड नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. शीख धर्मातील महान त्याग आणि बलिदानाची आठवण जागवणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्यासाठी शहरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती.

मोदी मैदान येथे आयोजित भव्य समारंभात ‘बोले सो निहाल सत श्री अकाल’च्या गगनभेदी जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. ‘वाहे गुरू वाहे गुरू’च्या अखंड नामस्मरणाने कार्यक्रमस्थळाचे वातावरण अत्यंत पवित्र व मंगलमय झाले होते. शीख बांधवांसह विविध धर्म व समाजातील नागरिकांनी मोठ्या श्रद्धेने या शहीदी समागमात सहभाग नोंदवला. या सोहळ्याच्या मुख्य व्यासपीठावर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच खासदार अजित गोपछडे, आमदार बाबुसिंह महाराज, आमदार तुषार राठोड, माजी आ. अमरनाथ राजूरकर, आमदार जितेश अंतापूरकर, आमदार श्रीजया चव्हाण, आ. आनंदराव बोंढारकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

हे देखील वाचा : देशातील 45 मान्यवरांना पद्म पुरस्कार जाहीर; महाराष्ट्रातील चार भूमिपुत्रांचा समावेश, वाचा संपूर्ण यादी

५२ एकर जागेत होतोय भव्य सोहळा

यावेळी अनेक संत, महंत, साध्वी यांची उपस्थिती होती. मोदी मैदान येथे ५२ एकर जागेत भव्य सोहळा पार पडत आहे. रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री, मान्यवर नेते या सोहळ्यास हजेरी लावणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मान्यवरांनी आपल्या भाषणांतून श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या धर्म स्वातंत्र्यासाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाला अभिवादन केले. सत्य, न्याय आणि मानवतेसाठी त्यांनी दिलेला लढा आजही समाजाला दिशा देणारा असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. सर्वधर्मसमभाव, बंधुता आणि सामाजिक एकोपा जपण्यासाठी गुरुजींच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन करण्यात आले. या शहीदी समागमाच्या निमित्ताने नांदेड शहरात धार्मिक सलोखा आणि सांस्कृतिक एकात्मतेचे प्रभावी दर्शन घडले. कीर्तन, अरदास आणि लंगर सेवेच्या माध्यमातून सेवाभाव व समतेचा संदेश देण्यात आला. श्रद्धा, इतिहास आणि एकतेचा संगम ठरलेला हा सोहळा नांदेडकरांच्या स्मरणात दीर्घकाळ राहणारा ठरला.

गर्दीने परिसर फुलला
हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या शहीदी समागमाच्या निमित्ताने नांदेडमध्ये ठिकठिकाणी लंगर सेवेचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांसाठी पिण्याचे पाणी, केळी, थंड सरबत यांचे मोफत वाटप केले जात असून वैद्यकीय सेवेचीही उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. मोदी मैदानावर भव्य शामियाने उभारण्यात आले असून देश-विदेशातून आलेल्या भाविकांच्या गर्दीने संपूर्ण परिसर अक्षरशः फुलून गेला आहे. शीख बांधवांच्या सेवाभावी परंपरेचे दर्शन या ठिकाणी अनुभवायला मिळत आहे. प्रशासनाच्या वतीने सुरळीत वाहतूक, स्वच्छता आणि सुरक्षेची प्रभावी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशासनाने केलेल्या उत्तम नियोजनाबद्दल अनेक भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे.

हे देखील वाचा : निवडणूक आयोगाला आली जाग! महापालिकेतील गोंधळाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जि. प. निवडणुकांसाठी १४ हजार EVM

श्री गुरुग्रंथ साहिबजी विराजमान
असर्जन परिसरीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या मुख्य मंडपात आज श्री गुरुग्रंथ साहिबांचे अत्यंत भक्तीमय व मंगल वातावरणात विधीवत विराजमान झाले. श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आयोजित भव्य कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा पार पडला.
विराजमान प्रसंगी गुरुबाणीचे मंगल पठण, अरदास व कीर्तन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. गुरुवाणीच्या मधुर स्वरांनी संपूर्ण परिसर आध्यात्मिकतेने भारावून गेला. भाविकांनी सर्व मर्यादांचे पालन करीत शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेत गुरुग्रंथ साहिबांना नमन केले. 

सहिष्णुतेचा संदेश देणारा सोहळा

या कार्यक्रमाच्या निमित्ताने नांदेड शहर व परिसरात – उत्साहाचे वातावरण असून, देश-विदेशातून – येणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी प्रशासन व विविध सामाजिक संघटनांनी आवश्यक ती तयारी – पूर्ण केली आहे. भाविकांच्या सोयीसाठी दर्शन, स्वच्छता, पाणी व सुरक्षा यासह सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या बलिदानाचे स्मरण करून धर्म, मानवता व सहिष्णुतेचा संदेश देणारा हा समागम समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून, या कार्यक्रमाचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Web Title: Program in nanded on the occasion of the 350th great martyrdom anniversary of guru tegh bahadur sahibji

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2026 | 07:10 PM

Topics:  

  • nanded news
  • Nanded Politics

संबंधित बातम्या

महापालिका निवडणुकीनंतर नांदेडमध्ये महायुती पुन्हा एकत्र; शिवसेनेचा बिनशर्त पाठींबा जाहीर
1

महापालिका निवडणुकीनंतर नांदेडमध्ये महायुती पुन्हा एकत्र; शिवसेनेचा बिनशर्त पाठींबा जाहीर

अर्जाच्या झुंबडीने पाथरीचे राजकारण तापले; २१ जानेवारी अखेर १५५ नामनिर्देशन झाले दाखल
2

अर्जाच्या झुंबडीने पाथरीचे राजकारण तापले; २१ जानेवारी अखेर १५५ नामनिर्देशन झाले दाखल

नांदेड महापालिकेवर महिला राज; नवा महापौर कोण होणार? या नगरसेविकांची नावे चर्चेत
3

नांदेड महापालिकेवर महिला राज; नवा महापौर कोण होणार? या नगरसेविकांची नावे चर्चेत

Nanded मध्ये ‘हिंद-दी-चादर’ शताब्दी कार्यक्रम; आरोग्य यंत्रणा सज्ज, १० लाखांहून अधिक भाविकांसाठी…
4

Nanded मध्ये ‘हिंद-दी-चादर’ शताब्दी कार्यक्रम; आरोग्य यंत्रणा सज्ज, १० लाखांहून अधिक भाविकांसाठी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.