फोटो सौजन्य- प्रतिनिधी
वडील खासदार, दोन्ही मुलं आमदार आणि त्यातला एक मंत्री हे ईश्वराच्या कृपेमुळेच घडले.आमच्या दृष्टीने आजचा दिवस अविस्मरणीय आहे. आज जे घडले ते ईश्वराच्या कृपेने झाले . सोनं जळत तेव्हाचं ते उजळत, तसंच आमच्या बाबतीत झालं आहे.योग्य लोकप्रतिनिधीला निवडून दिल्यास कसा परिवर्तन होते हे सिंधुदुर्ग जिल्हा हे पाहतो आहे. त्यामुळे या पुढच्या काळात तुमच्या जीवनात निश्चितपणे विकासात्मक परिवर्तन होईल याची खात्री बाळगा. आम्ही व्यवसाय करून राजकारण करतो. लोकांच्या पैशावर राजकारण करीत नाही. योग्य लोकप्रतिनिधी निवडून दिल्यावर परिवर्तन होते. म्हणूनच जनसेवेचे काम करणाऱ्या नितेश राणे यांना मंत्रिपदाची संधी मिळाली भविष्यात निलेश राणे हेही मंत्री होतील असा विश्वास खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केला. सुखी, समृद्ध जिल्हा बणविल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही. जिल्हावासीयांना आनंदी ठेवण्यासाठी सदैव कार्यरत राहणार .असे माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे म्हणाले.
राज्याच्या मत्स्य व्यवसाय बंदर विकास मंत्रीपदी नितेश राणे यांची निवड झाल्यानंतर त्यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आगमन झाले या निमित्ताने कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयासमोरील पटांगणावर भाजपच्यावतीने नितेश राणे यांचा नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.यावेळी खासदार नारायण राणे बोलत होते.यावेळी आमदार निलेश राणे, नीलमताई राणे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजप महिला आघाडी जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर आदी उपस्थित होते.
मी या दोघांचा मुर्तीकार आहे- नारायण राणे
यावेळी बोलताना खास.नारायण राणे म्हणाले,कोणाला आयुष्यभर मी पुरणार नाही.मात्र,मी कार्यरुपी शिल्लक आहे आणि यापुढेही राहीन. राणेंविरोधात जे उभे राहिले ते पडले . आता एक मंत्री झाला भविष्यात दुसराही मंत्री होईल . मी या दोघांचा मुर्तीकार आहे.मूर्ती बनविणाऱ्याला माहिती असते त्याच्या मूर्तीचे पुढे काय होणार? त्यामुळे मला विश्वास आहे निलेश राणेंही मंत्री होतील . तुमचे आभार कसे मानू हे समजत नाही.तुमच्या ऋणाची मी परतफेड करु शकेन की नाही माहीत नाही.मात्र,सुखी, समृद्ध जिल्हा बनविल्याशिवाय राहणार नाही. नितेश राणे यांनी गेली दहा वर्षे मतदारसंघात घेतलेली मेहनत आणि जनसेवेची केलेली कामे यामुळेच ते मंत्री पदाचे दावेदार ठरले आहेत तर कुडाळ मालवण मतदारसंघात निलेश राणे हे गेली चार वर्षे मतदारसंघ पिंजून काढून जनतेच्या सेवेत असल्याने त्यांना आमदार किती संधी मिळाली.
नितेश राणे सारखा आमदार मिळाला हे येथील जनतेचे भाग्य – निलेश राणे
यावेळी बोलताना कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे म्हणाले,आम्हा कुटुंबांसाठी हा क्षण समाधानाचा आहे.आज आम्हा राणे कुटुंबीयांसाठी आनंदाचा दिवस आहे. नितेश राणेंना मंत्री पद मिळाले. राणे कुटुंबीय ३९ वर्षे जनतेच्या सेवेत आहेत. हे जनतेच्या प्रेमामुळेच आहे. नितेश राणे यांनी जो विषय घेतला तो मार्गी लावला आहे. या मतदारसंघाला नितेश राणे सारखा आमदार मिळाला हे येथील जनतेचे भाग्य आहे.त्यांनी हिंदूत्वासाठी लढा निर्माण केला . यासाठी जिद्द लागते . ती नितेश राणेंकडे आहे. मुळात ते राजकारणी नाही. सकारात्मक बदलामुळे हे नेतृत्व घडले आहे असा विश्वास व्यक्त करताना नितेश राणे यांना त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.
जे राणेंना संपावायला निघाले तेच संपले- नितेश राणे
या सत्काराप्रसंगी मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे म्हणाले, संकटकाळात सोबत राहीलेल्यांमुळेच आजचा दिवस उगवला आहे.आज माझा जो सत्कार केला त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. दहा वर्षांत ज्या कार्यकर्त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला त्यांचं आभार मानावे तेवढे थोडे आहेत. संकटंकाळात जे सहकारी सोबत राहीले त्यांच्यामुळेच आजचा दिवस दिसत आहे. जे राणेंना संपावायला निघाले तेच संपले आहेत. जनतेने विरोधकांना २०२४ मध्ये मतपेटीतून उत्तर दिले आहे . विरोधकांनी आमचे आजचे व्हिडिओ जरूर पहावेत. ज्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी सावंतवाडीत राणेंवर टिका केली त्यांची आजची अवस्था काय आहे ? कणकवली तालुक्याने राणेंवर प्रेम केले. तसेच प्रेम माझ्यावर केले. मी एकटा मंत्री नाही,या व्यासपीठावरील सर्व मंडळी मंत्री आहेत.सर्वांनी एकत्र येऊन या जिल्ह्याचा विकास करूया.ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत त्रास दिला त्यांनाही विकास कामाच्या माध्यमातून उत्तर दिले जाईल.