
रत्नागिरी : नगर परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. याचपार्श्वभूमीवर चिपळूण नगरपरिषदेत भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी पदांचे राजीनामे दिल्याने खळबळ उडाले आहे. त्यामध्ये शिवसेनेचे युवा नेते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे माजी नगरसेवक भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष परिमल भोसले यांनी आपल्या पदाचा भाजपाचा राजीनामा दिला नाही मोठी खळबळ उडाली आहे.
ऐन निवडणुकीच्या तोंडावरच परिमल भोसले यांनीही राजीनामा दिला आहे. तसंच भाजपाच्या नगरसेविका नुपूर बाचीम यांनीही आपल्याला उमेदवारी न देण्यात आल्याने राजीनामा दिला आहे. चिपळूणमध्ये शिवसेना भाजपा राष्ट्रवादी अशी महायुती निश्चित झाली आहे. भाजपाकडून राष्ट्रवादीकडून आठ नगरसेवकांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. माधव शिवसेनेकडून अद्याप कोणाचीही उमेदवारी अधिकृतरित्या जाहीर झालेली नाही. तरी मला भोसले यांनी तडका वडकी राजीनामा दिला आहे ते आज रविवारी आपली अधिकृत भूमिका मांडण्याची शक्यता आहे.
परिमल भोसले हे निलेश राणे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. राणेंच्या निकटवर्तीयांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिल्याने आता परिमल भोसले कोणती भूमिका घेणार? याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. परिमल भोसले यांच्या राजीनामा नंतर आता पक्षश्रेष्ठींकडून त्यांची समजूत घातली जाते किंवा कसे हे आता पहावे लागणार आहे.
भाजपच्या आठ उमेदवारांना चिपळूण नगरपरिषदेत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे त्यांच्याकडून निवडणुकीची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. चिपळूण नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपाने पहिल्या यादीत तुल्यबळ व तगडे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत या सगळ्यांचे आज भरले जाणार आहेत.
प्रभाग क्र.३ अ रुपाली रुपेश दांडेकर, प्रभाग क्र.४ अ मकरंद उर्फ आशिष चंद्रकांत खातू,प्रभाग क्र.५ ब रुही धीरज खेडेकर,प्रभाग क्र.९ अ अंजली सतीश कदम,प्रभाग क्र.१ ब शशिकांत श्रीकांत मोदी,प्रभाग क्र.१० अ रसिका रत्नदीप देवळेकर, प्रभाग क्र.१२ ब शुभम दयानंद पिसे, प्रभाग क्र.१४ अ शीतल स्वानंद रानडे पहिल्या यादीत नाव जाहीर करत मानाचे स्थान देण्यात आल आहे.
Ans: भाजपाने एकूण 8 उमेदवार पहिल्या यादीत जाहीर केले आहेत.
Ans: चिपळूण नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी (NCP) अशी महायुती निश्चित झाली आहे.
Ans: भाजपचे काही पदाधिकारी – विशेषतः परिमल भोसले (जिल्हा उपाध्यक्ष व माजी नगरसेवक) आणि नगरसेविका नुपूर बाचीम यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. त्यामुळे चिपळूणच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.