Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News: साधूग्रामचा ले-आऊट बदलण्याची तयारी; वृक्षतोडीच्या विरोधामुळे प्रशासन दोन पावले मागे

तपोवनातील झाडांवर लाल रंगाच्या मारलेल्या फुल्या म्हणजे वृक्षतोड नव्हे तर झाडांची मोजणी करताना झाड मोजले गेल्याची ती खूण असल्याचा निर्वाळा उद्यान अधिक्षक विवेक भदाणे यांनी दिला.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 28, 2025 | 05:37 PM
Nashik News: साधूग्रामचा ले-आऊट बदलण्याची तयारी; वृक्षतोडीच्या विरोधामुळे प्रशासन दोन पावले मागे
Follow Us
Close
Follow Us:
  • तपोवनातील ५४ एकर जागेवरील सुमारे १८०० झाडे तोडीवरून गदारोळ
  • पर्यावरण व वृक्षप्रेमीची दर्शविलेला विरोध
  • साधुग्रामच्या नियोजीत ले-आऊट मध्येच बदल करण्याच्या दृष्टीने पावले
Nashik News:  तपोवनातील ५४ एकर जागेवरील सुमारे १८०० झाडे तोडीवरून निर्माण झालेला गदारोळ व या प्रश्नावरून राज्यपातळीवर होत असलेल्या आंदोलने पाहता, सिंहस्थापुर्वी प्रशासनाची प्रतिमा मलीन होऊ नये यासाठी तपोवनातील नियोजीत साधुग्रामचा ले-आऊट बदलण्याची तयारी प्रशासनाने चालविली आहे. ज्या भागात दाट झाडी आहेत तेथे दुचाकी पार्किंग तर मोकळ्या जागी आखाड्यांसाठी तंबू उभारून जागेचे प्लॉट पाडण्यात येणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.
तपोवनातील वृक्षतोडीवरून पर्यावरण व वृक्षप्रेमीची दर्शविलेला विरोध व वृक्षतोडीवर दाखल झालेल्या हरकतींची संख्या पाहता, राज्यातील पर्यावरण प्रेमींनीही या आंदोलनात उतरण्याची तयारी दाखविली आहे. (Nashik News) 

Vande Bharat Express : वंदे भारत, नमो भारत, अमृत भारत… या तीन गाड्या भारतीय रेल्वेच्या त्रिवेणी, काय आहेत वैशिष्ट्ये?

प्रशासनाकडून दाखल हरकतींची सुनावणी घेण्याचा प्रयत्न केला परंतु उपस्थितांच्या भाडीमारामुळे ही सुनावणीही कायदेशीररित्या पुर्ण होऊ शकलेली नाही. त्यामुळे उद्यान अधिक्षकांची या संदर्भातील अंतीम निर्णयाचा चेंडू आयुक्तांच्या कोर्टात ढकलला आहे. अशा परिस्थतीत या प्रश्नांचे राजकारण होण्याची शक्यता अधिक असल्याने ते टाळण्यासाठी अधिकाधिक झाडे कशी वाचवू शकतील त्यादृष्टीने साधुग्रामच्या नियोजीत ले-आऊट मध्येच बदल करण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. विशेष करून दाट झाडांच्या ठिकाणी दुचाकी पार्किंग वा तत्सम सुविधा उभ्या करून झाडांना इजा न पोहोचविण्याचा तसेच मोकळ्या व पडीक जमीनीवर तंबू उभारून ते आखाडे, खालशांना वापरण्यासाठी देण्याच्या दृष्टीने आराखडा तयार केला जात आहे. त्यातील एक ले-आऊट बदलण्यातही आला आहे.

स्थानिक निवडणुकीच्या भविष्याचा फैसला आज; सर्वोच्च न्यायालयाच्या

मार्किंग म्हणजे वृक्षतोड नव्हे

दरम्यान, तपोवनातील झाडांवर लाल रंगाच्या मारलेल्या फुल्या म्हणजे वृक्षतोड नव्हे तर झाडांची मोजणी करताना झाड मोजले गेल्याची ती खूण असल्याचा निर्वाळा उद्यान अधिक्षक विवेक भदाणे यांनी दिला. अजून या प्रश्नी बरीच कायदेशीर प्रक्रीया केली जाणार आहे. (Nashik Tapovan Tree Cutting Issue)

फक्त झाडांच्या संख्येची मोजणी झाली. या ठिकाणी काय कामे केली जाणार, त्यामुळे किती झाडे बाधित होणार, त्यातील किती वाचविता येवून कामे करता येतील याचा अभ्यास करणे बाकी असून, सध्या तपोवनात या दृष्टीने दुसरे सव्र्व्हेक्षण केले जात आहे. त्यात महत्वाच्या झाडांना संरक्षण व तोडण्यायोग्य झाडांची संख्या निश्चित केली जाईल, तसा प्रस्ताव तयार करून तो अतिरीक्त आयुक्तांमार्फत आयुक्तांकडे व आयुक्तांकडून तो वृक्ष प्राधिकरण समितीकडे पाठविण्यात येणार असल्याचेही भदाणे यांनी सांगितले. जो पर्यंत सर्व्हेक्षण व बाधित होणाऱ्या झाडांची संख्या स्पष्ट होत नाही तो पर्यंत हरकतीची सुनावणी पुर्ण होणार नाही. असेही ते म्हणाले.

Web Title: Nashik news administration takes two steps back due to opposition to tree felling in sadhugram

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2025 | 05:37 PM

Topics:  

  • Nashik News

संबंधित बातम्या

दोन मुलांसह वडिलाची आत्महत्या; चांदवड तालुक्यातील धक्कादायक घटना
1

दोन मुलांसह वडिलाची आत्महत्या; चांदवड तालुक्यातील धक्कादायक घटना

Nashik News: प्रभाग ३१ मध्ये साडेसात हजार मतदार गायब; प्रारूप यादीवरून संतापाची लाट
2

Nashik News: प्रभाग ३१ मध्ये साडेसात हजार मतदार गायब; प्रारूप यादीवरून संतापाची लाट

नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा मतदारसंघातच तळ; दादा भुसेंसह गिरीश महाजनही राजकीय मैदानात…
3

नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा मतदारसंघातच तळ; दादा भुसेंसह गिरीश महाजनही राजकीय मैदानात…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.