सिन्नर नगराध्यक्षपदाची लढत : ५ उमेदवारांमध्ये सर्वाधिक श्रीमंत हेमंत वाजे, किती आहे संपत्ती?
सिन्नर नगरपरिषद निवडणुकीत पाचही उमेदवारांनी थेट नगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करताना मालमत्तेच्या विवरण पत्रात आपली मालमत्ता, शिक्षण गुन्हेगारी पार्श्वभूमी यासंदर्भात माहिती दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार विठ्ठल अशोक उगले हे सर्वांत तरुण ४६ वर्षे वयाचे उमेदवार आहेत. तर भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हेमंत वाजे हे सर्वाधिक ६५ वर्ष, खालोखाल उबाठा गटाचे प्रमोद चोथवे हे ५९ तर शिवसेना शिंदे गटाचे गटाचे नामदेव लोंढे ५७ आणि अपक्ष उमेदवार किशोर देशमुख ४८ वर्षे वयाचे आहेत. पाच पैकी चार उमेदवारांवर कुठल्याही प्रकारचे गुन्हे दाखल नाहीत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार प्रमोद चोथवे यांच्यावर दोन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षा होईल, अशा प्रकाराच्या एक गुहा दाखल आहे. मात्र शिक्षेचा निर्णय प्रलंबित आहे.
यंदा नगराध्यक्ष पदाची निवडणूक थेट जनतेमधून केली जाणार आहे. सिन्नर मध्ये व्यक्ती केंद्रित राजकारण महत्त्वाचे असले तरी भाजप (BJP), राष्ट्रवादी (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे गट) आणि महाविकास आघाडीकडून शिवसेना (ठाकरे गट) ने उमेदवार दिल्यामुळे चार प्रमुख पक्षांचे उमेदवार या निवडणुकीत मतदारांना सामोरे जाणार आहेत. तर एक अपक्ष उमेदवार देखील नशीब आजमावत आहे.
हेमंत वाजे (६५)
शिक्षण: पदवी, व्यवसाय शेती, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १४ लाख ९२ हजार २६० रुपये, जंगम मालमता: ७ कोटी २५ लाख ७५ हजार १५१ रुपये, स्थावर मालमत्ता : ३५ कोटी ७२ लाख ९८ हजार ७२५ रुपये, एकूण ४२ कोटी ९८ लाख ४३ हजार ८७६ रुपये, कर्ज आणि इतर सरकारी देणे ९ कोटी ८७ लाख ९४ हजार २६० रुपये
नामदेव लोंढे (५७)
शिक्षण अभियांत्रिकी, व्यवसाय शेती. कुटुंबाचे उत्पन्न: ५ लाख ४९ हजार ९१० कृपये, जंगम मालमत्ता ९८ लाख ३३ हजार ३५० रुपये, स्थावर मालमत्ता ३ कोटी ६० लाख ४७ हजार ५५० रुपये, एकूण मालमत्ता ४ कोटी ५८ लाख ८० हजार ९०० रूपये, कर्ज व इतर देणे ८ लाख ७० हजार ५६
Nashik News: प्रभाग ३१ मध्ये साडेसात हजार मतदार गायब; प्रारूप यादीवरून संतापाची लाट
प्रमोद चोथवे (५९)
शिक्षण: पदवी, व्यवसाय व्यापार, कुटुंचाचे वार्षिक उत्पन्न: ४४ लाख ५८ हजार ४६१ रुपये, जंगम मालमता १ कोटी ९१ लाख ९८ हजार ३८८ रुपये, स्थावर मालमत्ता : १३ कोटी १० लाख ८० हजार रुपये, एकूण मालमत्ता १५ कोटी २ लाख ७८ हजार ३८८ रुपये, कर्ज व इतर देणे: १ कोटी ३२ लाख रुपये
विठ्ठल उगले (४६)
शिक्षण: पाचवी, व्यवसाय व्यापार, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १० लाख १८ हजार ४० रुपये, जंगम मालमत्ता १ कोटी ८२ लाख ७२ हजार २४५ रुपये, स्थावर मालमत्ता ८२ लाख ६२ हजार ९९४ रुपये, एकूष्ण मालमत्ता २ कोटी ६५ लाख ३५ हजार २३९ रुपये, कर्ज व देणे: १४ लाख ५० हजार
किशोर देशमुख (४८)
वार्षिक उत्पन्न: १० लाख ११ हजार ९७० रुपये, जंगम मालमत्ता ४० लाख ४९ हजार रुपये, स्थावर मालमता : १ कोटी ५० लाख रुपये, एकूण मालमत्ता १ कोटी ९० लाख ४९ हजार रुपये, कर्ज व देणे ७ लाख रुपये. ही मालमता निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात नमूद करण्यात आली आहे.






