Nashik News: प्रभाग ३१ मध्ये साडेसात हजार मतदार गायब; प्रारूप यादीवरून संतापाची लाट
सिडकोतील सहा प्रभागांत एकूण ३ लाख ६ हजार ५६ मतदार आहेत. मात्र प्रभाग ३१ साठी जाहीर केलेल्या प्रारूप यादीत सहा मतदान केंद्रांवरील सुमारे ७५०० मतदारांची नावे आढळून न आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे, लोकसभा व विधानसभा निवडणुकीत या केंद्रांवरील मतदारांची नावे नियमितपणे नोंदवलेली होती. तरीही या वेळीच केवळ प्रारूप महापालिका मतदार यादीतून त्यांच्या नोंदी गायब झाल्याने प्रशासनाच्या निष्काळजीपणावर ताशेरे ओढले जात आहेत.
या प्रकारात मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागातही स्थलांतरित झालेली नाहीत, तर यादीतूनच नामशेष झालेली आहेत. यामुळे पाथर्डी व पिंपळगाव खांब परिसरातील स्थानिक शेतकरी जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी मदन डेमसे, रवींद्र गामणे, धनंजय गवळी, प्रमोद जाचक, धनंजय डेमसे, विशाल दोंदे, रोशन गवळी यांनी सिडको विभागीय अधिकारी नानासाहेब साळवे यांना निवेदन देत हे सर्व मतदार पुन्हा यादीत समाविष्ट करण्याची मागणी केली आहे.
विधानसभा मतदारसंघ १२६ मधील मतदान केंद्र क्रमांक १०८, १०९, ११०, १११, ११२ (पाथर्डी गाव), मतदान केंद्र क्रमांक १८७ (पिपळगाव खांब) या सहा केंद्रांवरील अंदाजे ७५०० मतदारांची नाचे प्रारूप यादीतून वगळण्यात आली आहेत.
प्रारूप यादीत असून अनेक मतदारांची नायें कट करण्यात आली आहेत. काही नावे तर चुकीच्या प्रभागांत दिसत भाहेत, पाथर्डी व पिपळगाव जांब येथील स्थानिक गितकरी मतदारांच्याही नावे वगळण्यात आली आहेत. कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, म्हणून सातडीने सुधारित प्रारूप यादी जाहीर करावी
– राणी गवळी, पाथर्डी गाव






