Bangladesh Election 2026 : बांगलादेशमध्ये रंगला संसदीय निवडणुकीचा रणसंग्राम; 'या' नेत्याची प्रतिष्ठा लागली पणाला (फोटो सौजन्य: सोशळ मीडिया)
शेख हसीना (Sheikh Hasina) यांच्या पक्ष अवामी लीगवर सध्या बंदी घालण्यात आली आहे. यामुळे सर्वांचे लक्ष बीएनपीचे अध्यक्ष तारिक रहमान यांच्याकडे आहे. आपल्या आईप्रमाणे सत्ते येऊन तारिक इतिहास रचणार का अशी चर्चा सध्या सुरु आहे. तारिक रहमान बांगलादेशच्या माजी महिला पंतप्रधान खालिदा जिया (Kahleda Zia) यांचे सुपूत्र आहेत. खालिदा जिया यांच्या निधनानंतर बीएनपीची सुत्रे रहमान यांच्याकडे आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष आघाडीवर आला आहे. तारिक रहमान हे धोरणात्कम विचारसरणीचे आणि तळागाळातील नेटवर्क मजबूत करणारे नेते म्हणून ओळखले जातात






