Nashik Rahud Ghat vehicles collide, 17 injured in horrific accident
नाशिक : नाशिक तालुक्यातील राहुड घाटात शुक्रवारी (दि. २१) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास सात ते आठ वाहनांमध्ये झालेल्या विचित्र भीषण अपघातात एक महिला ठार तर १७ जण जखमी झाले आहेत. त्यातील पाच गंभीर जखमींना नाशिक येथे हलविण्यात आले आहे. अपघातानंतर राहुड घाटात वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.
चांदवड तालुक्यातील राहुड घाटात मुंबई-आग्रा महामार्गावर शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास कंटेनर, दोन ट्रक, दोन ते तीन कार अशा एकूण सहा ते सात वाहने एकमेकांवर आदळून अपघात झाला. या अपघातात उषा मोहन देवरे (४५, रा. भारतीनगर, मालेगाव) या महिलेचा मृत्यू झाला. तर अभिमान त्रंबक देवरे (४३, भारतीनगर, मालेगाव), मीराबाई महादू पवार (५०, मालेगाव) सार्थक योगेश पाटील (७, मालेगाव), शितल सुरज चव्हाण (१५, मालेगाव), रोशनी बापू महाले (६५, सटाणा), ज्योत्स्ना तेजस महाले (३०, रा. श्रीकुरवाडे, सटाणा), बापू मानसिंग महाले (७०, सटाणा), जिजाबाई भिला देवरे (७०, मालेगाव) हे गंभीर जखमी झाले. तर तेजस बापू महाले (३८, सटाणा), तनवीर आणि शेख (३२, मुंबई), अफ्रिन तनवीर शेख (३२, मुंबई), सोनाली योगेश पाटील (३५, मालेगाव), बळीराम त्र्यंबक देवरे (५०, मालेगाव), यांना तन्वीर शेख (७, मुंबई), रोमेहा तनवीर शेख (५, मुंबई), आरवा तनवीर शेख (दीड महिना), रेणुका योगेश पाटील (दीड वर्ष, मालेगाव) हे जखमी झाले आहेत.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अपघाताची माहिती मिळताच चांदवड टोल नाक्यावरील अपघात विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून चांदवड उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून गंभीर जखमींना नाशिक येथे पाठविण्यात आले आहेत. अपघातानंतर चांदवड उपजिल्हा रुग्णालयात नातलगांची एकच गर्दी झाली होती होती.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नाशिक – पुणे रोडवरील काठे गल्ली परिसरातील एक धार्मिक स्थळ 25 वर्ष पाठपुरावा करून ही महापालिका हटवित नसल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. हिंदूत्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेऊन पालिकेला आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे हा मुद्दा नाशिकमध्ये जोरदार तापण्याची शक्यता आहे. पालिकेने हे अनधिकृत धार्मिक स्थळावर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर राघोजी भांगरे चौक ते साहिल लॉन्सकडे जाणारा- येणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. त्याचबरोबर नागजी चौक ते काठे गल्ली सिग्नल ते नागजी जाणारा-येणारा मार्ग, उस्मानिया चौक ते मुरादबाबा दर्गा जाणारा-येणारा मार्ग, पुणे हायवेने नाशिक रोडकडून द्वारकाकडे येणारा- जाणारा मार्ग, पंचवटीकडील महामार्गावरील संतोष टी पॉइंटकडून द्वारकाकडे येणारी वाहने, इंदिरानगर जॉगिंग ट्रॅककडून सव्र्व्हिस रोडने मुंबई नाक्याकडे येणारी वाहने, सारडा सर्कलकडून द्वारका सर्कलकडे येणारी सर्व वाहने आणि मुंबई नाक्याकडून द्वारका सर्कलकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.