शरद पवार यांनी अटल बिहारी वाजपेयी यांचेम 1999 मध्ये एका मताने पाडलेल्या सरकारचा किस्सा सांगितला (फोटो - एक्स)
नवी दिल्ली : जेष्ठ नेते शरद पवार हे त्यांच्या राजकीय चालीसाठी ओळखले जातात. केंद्रापासून राज्यपर्यंत शरद पवार यांच्या राजकीय विधानांवर आणि चालीवर सर्वाचे लक्ष असते. शरद पवार यांची राजकीय हालचालीचे कोणीच भाकित करु शकत नाही असे मानले जाते. आता पुन्हा एकदा शरद पवार यांनी स्वतः वाजपेयी सरकार पाडल्याच्या एका घटनेचा उल्लेख केला आहे. 1999 साली अटलबिहारी वाजपेयी सरकार लोकसभेत केवळ एका मताने पडले होते. शरद पवार यांनी या आठवणींना उजाळा देत खास राजकीय किस्सा सांगितला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रमुख शरद पवार यांनी गुरुवारी खुलासा केला की, 1999 मध्ये जेव्हा अटलबिहारी वाजपेयी सरकार लोकसभेत केवळ एका मताने अविश्वास प्रस्ताव हरले, तेव्हा त्यांनी (पवार) केवळ एका नेत्यासोबत 8 चे 10 मिनिटे चाललेल्या चर्चेनंतर “सत्ताधारी आघाडी (एनडीए) विरोधी पक्षाच्या बाजूने मतदान” केले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
गुरुवारी (दि.20) दिल्लीतील महाराष्ट्र सदनात नीलेश कुमार कुलकर्णी लिखित ‘संसद भवन ते सेंट्रल व्हिस्टा’ या मराठी पुस्तकाच्या प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी जेष्ठ नेते शरद पवार यांनी उपस्थित लोकांशी संवाद साधला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला आयोजित कार्यक्रमाला शिवसेना (यूबीटी) राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनीही उपस्थिती लावली. या कार्यक्रमामध्ये शरद पवार यांनी अटलबिहारी वाजपेयी यांचे केवळ एका मताने पडलेल्या सरकारबद्दल किस्सा सांगितला आहे.
जुन्या संसद भवनाबद्दलच्या आठवणीबद्दल सांगताना, शरद पवार यांनी 1999 मध्ये वाजपेयी सरकारच्या काळात विरोधी पक्षनेते असतानाचा एक प्रसंग सांगितला. शरद पवार म्हणाले, “खूप कमी लोकांना आठवत असेल की 1999 मध्ये मी विरोधी पक्षनेता होतो. आम्ही वाजपेयी सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणला होता आणि त्यावर संसदेत बरीच चर्चा झाली होती. अविश्वास प्रस्तावावर मतदान होण्यापूर्वी, मी ‘चर्चेसाठी’ सभागृहाबाहेर पडलो तेव्हा आमच्याकडे आठ ते दहा मिनिटे होती. त्यानंतर, मतदान झाले तेव्हा सरकारच्या बाजूने एका सदस्याने विरोधी पक्षाच्या बाजूने मतदान केले. वाजपेयी सरकार फक्त एका मताने बरखास्त झाले. मी विरोधी पक्षाच्या बाजूने ते एक मत मिळवले, पण मी ते कसे केले हे मी उघड करणार नाही.” असा राजकीय किस्सा शरद पवार यांनी सांगितला.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
सेंट्रल व्हिस्टाबद्दल भाष्य करताना जेष्ठ नेते शरद पवार म्हणाले की, नवीन संसद भवनाबद्दल अद्याप आसक्ती निर्माण झालेली नाही. देशातील अनेक प्रतिष्ठित राजकारणी ज्या जुन्या संसद भवनात राहिले आहेत त्याबद्दल मला अजूनही प्रेम आहे.” पवार यांनी १९६२-६३ मध्ये काँग्रेसच्या बैठकीसाठी दिल्लीला आलेल्या त्यांच्या पहिल्या भेटीची आठवण करून दिली आणि जवाहरलाल नेहरूंना पहिल्यांदा पाहून ते आणि त्यांचे काही पक्षातील सहकारी कसे आश्चर्यचकित झाले होते ते सांगितले.