Nashik Simhastha Kumbh Mela Amrit Snan Date 2026 declared by cm devendra fadnavis
नाशिक : नाशिकमध्ये लवकरच सिंहस्थ कुंभमेळा पार पडणार आहे. याबाबत मागील अनेक दिवसांपासून आढावा बैठक पार पडत होत्या. आज (दि.01) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यामध्ये 13 आखाड्याचे प्रमुख साधू आणि कॅबिनेटमधील मंत्र्यांचा समावेश होता. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात याविषयीची बैठक झाली. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमृत स्नानाची तारीख जाहीर केली आहे.
नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा पार पडणार आहे. यासाठी सर्व 13 आखाड्यांच्या प्रमुखांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली. यावेळी मंत्री गिरीश महाजन आणि दादा भुसे सुद्धा उपस्थित होते. त्यामध्ये शाही स्नानाच्या संभाव्य तारखा जाहीर करण्यात आल्या. उत्तर प्रदेशमध्ये पार पडलेल्या महाकुंभमेळ्यानंतर आता नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. यंदाच्या कुंभमेळ्यामध्ये भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासनाकडून पूर्ण तयारी केली जात आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
तारखा झाल्या जाहीर
मीडिया रिपोर्टनुसार, येत्या 31 ऑक्टोबर 2026 रोजीपासून सिंहस्थ कुंभमेळा सुरुवात होणार आहे. 31 ऑक्टोबर या दिवशी ध्वजारोहण शुभारंभ होईल. दुपारी 12 वाजता रामकुंडावर हा सोहळा पार पडेल. तर साधुग्राममध्ये 24 जुलै 2027 रोजी आखाडा ध्वजारोहण होईल. तर 24 जुलै 2028 रोजीपर्यंत कुंभमेळा पूर्व सुरू राहणार आहे. तर सिंहस्थ कुंभमेळ्यातील शाही स्नानाच्या संभाव्य तारखा सुद्धा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, 2 ऑगस्ट 2027 रोजी पहिले शाही स्नान होणार आहे. 31 ऑगस्ट 2027 ला महाकुंभस्नान होणार आहे. कुंभमेळ्यामध्ये 42 चे 45 पर्वस्नान असणार आहे. 11 सप्टेंबर 2027 ला अमृत स्नान होणार आहे. तसेच 29 जुलै 2027 ला नगर प्रदक्षिणा होणार आहे. त्यामुळे 24 जुलै 2028 पर्यंत कुंभमेळा सुरु राहणार आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळा होणार असून यामध्ये शाही स्नानाला विशेष महत्त्व असते. शाही स्नानाचा मुहूर्त असलेल्या दिवशी साधूंची नदीकाठी मोठी गर्दी होत असते. या स्नानाला शाही स्नान बोलले जात होते. मात्र याबाबत महंत महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. शाही स्नानला यापुढे अमृत स्नान म्हणण्यात यावे अशी मागणी महंतांनी केली आहे. शाही हा शब्द मुघलांशी संबंधित असल्यामुळे अमृत स्नान म्हणण्यात यावे अशी मागणी केली जात आहे.