तेज प्रताप यादव यांची लालू प्रसाद यादवांसाठी भावनिक सोशल मीडिया पोस्ट केली आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
बिहार : काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय जनता दल (RJD)चे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी मोठा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या मोठ्या मुलाला म्हणजे, तेज प्रताप यादव यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. तेज प्रताप यादव यांनी सोशल मीडियावर गर्लफ्रेंडचा फोटो शेअर केल्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. त्यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले असून त्यांना कुटुंबातूनही बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यानंतर राजकीय वर्तुळामध्ये अनेक घडामोडी घडल्या आहेत. पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर तेज प्रताप यादव यांनी सोशल मीडिया पोस्ट केली आहे.
पक्ष आणि कुटुंबातून बेदखल केल्यानंतर लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेज प्रताप यादव यांनी पहिल्यांदाच सोशल मीडिया पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी आई वडिलांना भावनिक साद घातली असल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळामध्ये तेज प्रताप यादव यांच्या पोस्टची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यांनी आपल्या आई वडिलांना आपले जग असल्याचे सांगितले. यामुळे लालू प्रताप यादव यांची नाराजी कमी होणार का याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
तेज प्रताप यादव यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे की, “माझे प्रिय आई बाबा…तुम्ही दोघे माझे संपूर्ण जग आहात. तुम्ही आणि तुमचा कोणताही आदेश मला देवापेक्षाही मोठा आहे. तुम्हा आहात तर माझ्यासाठी सर्व काही आहे. मला फक्त तुमचा विश्वास आणि प्रेम पाहिजे. बाकी काही नको, बाबा तुम्ही नसता तर ना पक्ष असता, ना माझ्यासोबत राजकारण करणारी काही लालची लोकं. आई आणि बाबा तुम्ही दोघेही निरोगी रहा आणि आनंदी रहा,” अशी भावनिक सादर घालणारी एक्स पोस्ट तेज प्रताप यादव यांनी केली आहे. यामुळे आता लालू प्रसाद यादव यांचा राग शांत होणार का याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
मेरे प्यारे मम्मी पापा….
मेरी सारी दुनिया बस आपदोनों में ही समाई है।भगवान से बढ़कर है आप और आपका दिया कोई भी आदेश।आप है तो सबकुछ है मेरे पास।मुझे सिर्फ आपका विश्वास और प्यार चाहिए ना कि कुछ और।पापा आप नही होते तो ना ये पार्टी होती और ना मेरे साथ राजनीति करने वाले कुछ जयचंद जैसे…— Tej Pratap Yadav (@TejYadav14) May 31, 2025
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
लालू प्रसाद यादव यांनी समाजमाध्यम ‘एक्स’वर (पूर्वीचे ट्विटर) पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी लिहिले आहे की, “खाजगी आयुष्यातील नैतिक मूल्यांकडे दुर्लक्ष केल्याने सामाजिक न्यायासाठी चाललेल्या आपल्या सामूहिक संघर्षाला कमजोर करता येते. माझ्या मोठ्या मुलाच्या वर्तनामुळे, सार्वजनिक वागणुकीमुळे आणि गैरजबाबदार वागणुकीमुळे कुटुंबाचे मूल्य आणि परंपरा धुळीस मिळाल्या आहेत. त्यामुळे वरील परिस्थिती लक्षात घेता मी त्याला पक्षातून तसेच कुटुंबातूनही बाहेर काढले आहे.” अशा शब्दांत पोस्ट करत लालू प्रसाद यादव यांनी तेज प्रताप यादवबाबत निर्णय जाहीर केला होता.