Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाशिकमध्ये ‘मनमर्जी’ अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींचा दणका! महासभेत नव्या-जुन्या सदस्यांनी अधिकाऱ्याला प्रश्नांत घेरलं…

नाशिक महापालिकेच्या पहिल्या महासभेत प्रशासकीय कार्यकाळातील मनमानी कारभारावर सर्वपक्षीय नगरसेवकांनी जोरदार प्रश्न उपस्थित करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. कोट्यवधींच्या खर्चाबाबत समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने हा प्रकार घडला

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 22, 2026 | 03:10 PM
general body meeting nashik

general body meeting nashik

Follow Us
Close
Follow Us:
  • महापालिकेच्या महासभेत लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांना जाब विचारला
  • नाशिककरांना गृहीत धरू नका पहिल्याच सभेत संदेश
  • मंत्री झिरवाळांचा ‘सुपारी’ बाज कोण ?
नाशिक/ श्याम बागूल: सामान्य जनतेला कस्पटासमान लेखणाऱ्या व स्वतःला असामान्य समजून गेल्या साडेतीन वर्षापासून प्रशासकीय कामकाज करणाऱ्या नाशिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पहिल्या महासभेतच लोकशाही व लोकप्रतिनिधींच्या हक्क, अधिकाराची जाणीव झाली असं म्हणता येईल. प्रशासकीय कारकिर्दीत जनतेला गृहीत धरून आपली मनमानी कारभाराचा उच्छाद मांडतांना जी कोट्यवधी रूपयांची उधळपट्टी करण्यात आली त्याचा जाब आता विचारण्यास जुने जाणते नगरसेवकांबरोबरच नवीन सदस्यांनीही महासभेत आपली चुणूक दाखवून दिली आहे. त्यातून प्रशासनातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. आपल्याच अखत्यारितील प्रश्नांना मुद्देसूद आणि समाधानकारक उत्तरे अधिकारी देवू शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्या कारकिर्दीत काय दिवे लागले असतील हे सांगणे नको.

Nashik News:पालखेड कालव्याला गुरूवारी पाणी, निवेदनावर कार्यकारी अभियंत्यांचं शिवसेनेच्या शिष्टमंडळाला आश्वासन

आता प्रत्येक कृतीची जबाबदारी निश्चित होईल?

दिनकर पाटील म्हटले तसे प्रशासकीय कार्यकाळात ‘आंधळे दळते कुत्रे पीठ खाते’ अशी परिस्थिती असावी यावर शिक्कामोर्तब होताना दिसतो. देशसेवेसाठी आपले सर्वस्व अर्पण करण्याची तयारी ठेवणाऱ्या माजी सैनिकांना चक्क रस्त्यावर अस्वच्छता करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा अधिकार देवून त्यांची अवहेलना करण्याचा प्रयत्न मनपाने केला. त्यानंतर जितक्या तत्परतेने त्यांना सेवेतून कमी करण्याचा निर्णय दिला गेला तो देखील अन्याय्यकारकच म्हणावा लागेल. अर्थात ही सुरूवात आहे. यापेक्षा अधिक काय काय झाले असेल ते यथावकाश समोर येईलच पण सुरूवात तर चांगली झाली.सभागृहाचे सार्वभौमत्व, लोकशाही प्रणालीत जनप्रतिनिधींची गरज यातून विषद झाली आणि नाशिककरांना गृहीत धरू नका असा संदेश देण्यात सर्वपक्षीय सदस्य पहिल्याच सभेत यशस्वी झाले आहेत. शहराची संस्कृती, भौगोलिक, सामाजिक परिस्थितीची कोणतीही माहिती, शहरवासियांची जाणीव नसलेल्या अनेक परसेवेतील अधिकाऱ्यांची या काळातील भूमिका फक्त ‘नोकरी’ बजावण्यापुरतील मर्यादित राहिली आहे. पण आता मात्र त्यांच्या प्रत्येक कृतीची जबाबदारी निश्चित होईल. त्यामुळे येणाऱ्या काळात परसेवेतील किती अधिकारी आपल्या बदल्या करून घेतील हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

मंत्री झिरवाळांचा ‘सुपारी’ बाज कोण ?

अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयातील लिपीकाला लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आले. राजेंद्र ढेरिंगे नामर हा लिपीक नाशिकचाच रहिवाशी निघाला हा योगायोग की आणखी काही ? झिरवाळ यांच्याबाबतीत हा प्रकार घडला म्हणून जिल्ह्यासाठी हे धक्कादायकच म्हणावं लागेल. एरव्ही मंत्रालयात कोणतेच काम पैशांशिवाय होत नाही असं जाहीरपणे म्हटलं जातं. त्यामुळे झिरवाळ यांच्या कार्यालयात ते घडावे या विषयी सामान्यांना काही विशेष वाटणार नाही. परंतु जिल्ह्याच्या वाट्याला आलेल्या चार मंत्रीपदापैकी एक अगोदरच खालसा झालेले असतांना आता त्यात झिरवाळ यांचा बळी जातो की काय अशी चिंता वाटणे स्वाभाविक आहे. तसेही मंत्री झिरवाळ म्हणतात तसे कोणीतरी त्यांच्या पदावर डोळा ठेवून आहे हे म्हणण्यात काही अंशी तथ्य वाटू लागते. काही महिन्यांपूर्वी झिरवाळ यांच्या नावाने दमदाटी करून ‘सुपारी’ चे दोन ट्रक नाशिकच्या अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयापुढे कोणी आगंतुकाने लावून पोबारा केला. दोन दिवस बेवारस उभ्या असलेल्या या ट्रकबाबत अन्न व नागरी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवला. त्यानंतर मात्र गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव आल्यानंतर हे ट्रक ज्या पद्धतीने मध्यरात्री आणले गेले तसेच रात्रीच्या अंधारात गायब करण्यातही आले. मंत्र्यांच्या जिल्ह्यातच हा प्रकार घडावा यावरून झिरवाळ टिकेची धनी झाले. आता पुन्हा हा नवीन प्रकार पाहता राजकीय वैमनस्यातून नव्हे तर त्यांच्याच समर्थकांमधील चढाओढीतून झिरवाळ यांची ‘सुपारी’ वाजविण्याचा तर प्रयत्न नसावा ? असा प्रश्न उपस्थित राहतो.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना वाहतूक विभागाचा दणका; आता ‘ई-कुंडली’ आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षात

Web Title: Nashik municipal corporation general body meeting officers vs corporators

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 03:10 PM

Topics:  

  • Nashik News

संबंधित बातम्या

धक्कादायक ! आयटी कंपनीतच धर्मांतरण; अत्याचाराचा गुन्हाही दाखल, पोलिसांकडून तपास सुरु
1

धक्कादायक ! आयटी कंपनीतच धर्मांतरण; अत्याचाराचा गुन्हाही दाखल, पोलिसांकडून तपास सुरु

Nashik News : फोर्टिफाईड राईसबाबत गैरसमज दूर करा; प्लास्टिक तांदूळ नसून पोषक धान्य, सिन्नर तहसीलदारांचे आवाहन
2

Nashik News : फोर्टिफाईड राईसबाबत गैरसमज दूर करा; प्लास्टिक तांदूळ नसून पोषक धान्य, सिन्नर तहसीलदारांचे आवाहन

Ashok Kharat News : अशोक खरात विरोधात महिलाशक्ती एकवटली: तक्रारांचा आकडा वाचून बसेल धक्का
3

Ashok Kharat News : अशोक खरात विरोधात महिलाशक्ती एकवटली: तक्रारांचा आकडा वाचून बसेल धक्का

Nashik Accident : दिंडोरीत भीषण अपघात: रस्ता बांधमाकामाविरुद्ध स्थानिकांचा संताप
4

Nashik Accident : दिंडोरीत भीषण अपघात: रस्ता बांधमाकामाविरुद्ध स्थानिकांचा संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.