Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News: अंत्यसंस्कार ‘इव्हेंट’ नव्हे, परंपरेचा सन्मान: राजस्थानात तरुणांकडून जागृती

अंत्यसंस्कार हा हिंदू धर्मातील अत्यंत संवेदनशील आणि पारंपरिक विधी असून, तो सन्मानाने पार पाडला जाणे आवश्यक आहे. मात्र अलीकडे काही ठिकाणी या विधींना ‘इव्हेंट’चे स्वरूप येताना दिसत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 21, 2026 | 12:02 PM
अंत्यसंस्कार ‘इव्हेंट’ नव्हे, परंपरेचा सन्मान: राजस्थानात तरुणांकडून जागृती

अंत्यसंस्कार ‘इव्हेंट’ नव्हे, परंपरेचा सन्मान: राजस्थानात तरुणांकडून जागृती

Follow Us
Follow Us:
  • तरुण घेताहेत अंत्यसंस्कारच्या विधीसाठीचे प्रशिक्षण, इव्हेंट कंपन्यांना रोखण्यासाठी पाऊल
  • सकारात्मक सामाजिक परिवर्तनाचे प्रतिबिंब : इव्हेंट कंपन्यांना रोखण्यासाठी पाऊल
  • अंत्यसंस्कार ‘इव्हेंट’ नव्हे, परंपरेचा सन्मान: राजस्थानात तरुणांकडून जागृती
नाशिक : हिंदू धर्मात अंत्यसंस्कार हा एक महत्त्वपूर्ण विधी मानले जातो, ज्याद्वारे दिवंगत आत्म्याला शांततापूर्ण निरोप दिला जातो. परंतु मागील काही वर्षांत हा दुखःद प्रसंग ‘इव्हेंट’ होताना दिसत आहे. मोठे राजकीय नेते, सेलेब्रिटी यांच्या निधनानंतर होणाऱ्या विधीला सोहळ्याचे रूप येत आहे. वास्तविक ही परंपरा सन्मानाने जपणे आवश्यक आहे. हा प्रसंग ‘इव्हेंट कंपन्या’च्या हातात जाऊ नये यासाठी तरुण पिढी यासाठी पुढाकार घेताना दिसत आहे. राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यात यासाठी गावोगाव अंतिम संस्कार विधीबाबत जागृती निर्माण केली जात आहे. अंत्ययात्रेदरम्यान आवश्यक असणारे विधी, पार्थिवाचे अत्यंत आदराने केले जाणारे अंतिम संस्कार आणि अग्नीसंस्काराच्या अचूक पद्धती या सर्व बाबींचे प्रशिक्षण तरुणवर्ग घेताना दिसत आहे. याकडे एक सकारात्मक सामाजिक परिवर्तनाचे प्रतिबिंब म्हणून पाहिले जात आहे.

‘इव्हेंट’ कंपन्यांचा सहभाग नको

आजच्या पिढीला हे विधीवत संस्कार अवगत नाहीत, त्यामुळे काही इव्हेंट कंपन्या पुढे येऊ लागल्या आहेत.

त्यातून अंत्यविधी हिंदू अंत्यसंस्कार विधीशी संबंधित परंपरा आणि चालीरीतीचे पालन तेवढ्या भावनिक पद्धतीने होताना दिसत नाही. त्यामुळे तरुण जागृत होताना दिसत आहे, अंत्यसंस्कार हा एक पवित्र धार्मिक विची आहे.

तो एखादा व्यावसायिक उपक्रम किवा ‘इव्हेंट मैनेजमेंट’ कंपन्यानी व्यवस्थापित करावी अशी एखादी उत्सवी घटना नव्हे. या धारेणेतून आजचा तरुण पुढे येऊन याचे प्रशिक्षण घेत आहे.

या पावित्र्याचे जतन करण्यासाठी ते या संपूर्ण प्रक्रियेची वैयक्तिक जबाबदारी स्वीकारत आहेत.

सोळा संस्कारांपैकी अखेरचा संस्कार

हिंदू धर्मात मृत्यूपश्चात होणारा अंत्तासंस्कार हा सोळा संस्कारांपैकी अखेरचा संस्कार मानला जाती, हा विधी मृतदेहाचे अग्नी, जल, पृथ्वी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांमध्ये विलीनीकरण करण्यासाठी तसेब आल्ल्याच्या मुक्तीचा मार्ग सुलभ करण्यासाठी केला जातो. अंत्यविधी साधारणपणे मृत्यूनंतर २४ तासांच्या आत मृतदेहाचे दहन (अग्निदाह) करून पार पाडला जातो. तिथे मंत्रोच्चारांच्या गजरात मृत व्यक्तीच्या थोरल्या मुलाच्या हस्ते वितेला अग्नी दिला जातो. त्यानंतर अरवीचे पाण्यात विसर्जन केले जाते आणि पुढील तेरा दिवस शोक पाळला जातो, तसेच शुद्धीकरण विधींचे आचरण केले जाते.

प्रशिक्षण आणि उपक्रमांचे मुख्य मुद्दे

अनेक तरुण आता अंत्यसंस्कार पारंपरिक आणि सन्मानपूर्वक पद्धतीने पार पाडण्याचे प्रशिक्षण घेत आहेत, जेणेकरून एखाद्या प्रिय व्यक्तीच्या निधनानंतर हे सबंधित कुटुंबाना भावनिक आणि प्रक्रियात्मक आधार देऊ शकतील.

युवक-युवतींना अंत्ययात्रेशी संबंधित आवश्यक विधी, पार्थिवाचे आदरपूर्वक अंत्यसंस्कारासाठी सिद्धीकरण आणि दहनविधीच्या योग्य कार्यपद्धतींबाबत प्रशिक्षण दिले जात आहे. या उपक्रमाचा उद्देश असा आहे की, शोककुल कुटुंबाना केवळ तांत्रिक मदतच नव्हे, तर भावनिक आधारही उपलब्ध करून द्यावा.

अनेक स्वयंसेवी संस्थाही या तरुणाना है प्रशिक्षण देत आहेत, या तरुणानी अत्ययात्रेदरम्यान आवश्यक असलेल्या लहान असो वा मोठी प्रत्येक सेवेमध्ये साहाय्य करावे हा त्यामागील उद्देश आहे.

Web Title: Antyasanskar parampara jagruti rajasthan yuva initiative news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 12:02 PM

Topics:  

  • Hindu tradition
  • Nashik News

संबंधित बातम्या

बोटांचे ठसे जुळत नसल्याने ज्येष्ठांना मिळेना एसटीचे NCMC कार्ड; पर्यायी व्यवस्थाही नसल्याने अडचणींत वाढ
1

बोटांचे ठसे जुळत नसल्याने ज्येष्ठांना मिळेना एसटीचे NCMC कार्ड; पर्यायी व्यवस्थाही नसल्याने अडचणींत वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.