Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Simhastha Kumbh Mela: “…याची दक्षता घेत रस्ते, साधूग्रामच्या भूसंपादन प्रक्रिया सुरू करावी; एकनाथ शिंदेंचे निर्देश

प्रयागराज येथील कुंभमेळ्यातील नियोजनासाठी अधिकाऱ्यांनी पाहणी दौरा करून तेथे केलेल्या उपाययोजनांची माहिती करून घ्यावी. जेणेकरून त्याचा कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी उपयोग होऊ शकेल, असे शिंदे म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 15, 2025 | 09:14 PM
Simhastha Kumbh Mela: "...याची दक्षता घेत रस्ते, साधूग्रामच्या भूसंपादन प्रक्रिया सुरू करावी; एकनाथ शिंदेंचे निर्देश

Simhastha Kumbh Mela: "...याची दक्षता घेत रस्ते, साधूग्रामच्या भूसंपादन प्रक्रिया सुरू करावी; एकनाथ शिंदेंचे निर्देश

Follow Us
Follow Us:

नाशिक:  नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे आगामी काळात होणारा सिंहस्थ कुंभमेळा सुरक्षित होईल, असे नियोजन करावे. भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घेत रस्ते, साधूग्रामच्या भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने सुरू करीत कामांना गती द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज सायंकाळी नाशिक महानगरपालिका, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, कुंभमेळा व अन्य अनुषंगिक विषयांबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  त्यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, आमदार किशोर दराडे, आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार सुहास कांदे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. माणिकराव गुरसळ, पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, माजी खासदार हेमंत गोडसे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, कुंभमेळ्यासाठीच्या कामांना प्राधान्य देण्यात येईल. त्यानुसार देशभरातून होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता वाहतुकीचे नियोजन करताना रस्त्यांचा आवश्यक तेथे विस्तार करावा. गोदावरी नदी पात्रात स्वच्छता राहील याची दक्षता घेताना जल प्रदूषण टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. मल:निस्सारण, जलशुद्धीकरणाचे प्रस्ताव तातडीने राज्य शासनाला सादर करावेत. त्यासाठी आवश्यक निधीच्या तरतुदीसाठी प्रयत्न केले जातील. कुंभमेळा कालावधीत होणारी भाविकांची गर्दी पाहता सीसीटीव्ही, ध्वनिक्षेपक यंत्रणेचे बळकटीकरण करावे. त्यासाठी नाशिक शहर व ग्रामीण पोलिसांनी समन्वयाने नियोजन करावे.

हेही वाचा: Simhastha Kumbh Mela : आता सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी…; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सादर केला आराखडा

प्रयागराज येथील कुंभमेळ्यातील नियोजनासाठी अधिकाऱ्यांनी पाहणी दौरा करून तेथे केलेल्या उपाययोजनांची माहिती करून घ्यावी. जेणेकरून त्याचा कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी उपयोग होऊ शकेल. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामकालपथ, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मोनोरेलचाही आढावा घेतला.

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे म्हणाले की, गोदावरी नदी पात्रात दूषित सांडपाणी सोडले जाणार नाही याची दक्षता घ्यावी, असे सांगितले. आयुक्त डॉ. गेडाम यांनी सादरीकरणाद्वारे नाशिक- त्र्यंबकेश्वर येथे होणारा कुंभमेळा शून्य अपघात, सुखद आणि अध्यात्मिक होण्यासाठी तसेच नाशिक शहराला जागतिक पातळीवर आणून अर्थव्यवस्थेस चालना देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले. तसेच कुंभमेळ्यासाठीच्या कामांचा नियमितपणे आढावा घेतला जात आहे. प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्याच्या पाहणीसाठी अधिकारी प्रयागराजचा दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार श्रीमती फरांदे यांनीही विविध सूचना केल्या, तर महानगरपालिका आयुक्त श्रीमती खत्री यांनी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली.

Web Title: Dcm eknath shinde take meeting fot simhastha kumbh mela nashik marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2025 | 09:14 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Mahakumbh Mela
  • Nashik

संबंधित बातम्या

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा
1

‘मुंबई इन मिनिट्स’! ५९ मिनिटांचा प्रवास, ३५ लाख घरे अन् नव्या रोजगार केंद्रांचा आराखडा; उपमुख्यमंत्र्यांनी मांडली रूपरेषा

Nashik News: दणका! ३६ गणेश मंडळांवर कारवाईचे संकट ; आता न्यायालयात होणार भवितव्याचा फैसला
2

Nashik News: दणका! ३६ गणेश मंडळांवर कारवाईचे संकट ; आता न्यायालयात होणार भवितव्याचा फैसला

Nashik Kumbh Mela 2027: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थासाठी मोठी तयारी; 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण, अमृत स्नानाच्या तारखाही ठरल्या
3

Nashik Kumbh Mela 2027: नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थासाठी मोठी तयारी; 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण, अमृत स्नानाच्या तारखाही ठरल्या

Palghar News: शेतात गवत कापताना विषारी सापाचा दंश; मोखाड्यात 108 रुग्णवाहिका ठरली आदिवासी महिलेसाठी जीवनदायिनी
4

Palghar News: शेतात गवत कापताना विषारी सापाचा दंश; मोखाड्यात 108 रुग्णवाहिका ठरली आदिवासी महिलेसाठी जीवनदायिनी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.