त्र्यंबकेश्वर नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सीएम देवेंद्र फडणवीसांनी आराखडा जाहीर केला (फोटो - सोशल मीडिया)
नाशिक : देशामध्ये सध्या प्रयागराज येथे महाकुंभमेळ्याचा मोठा उत्साह दिसून येत आहे. जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये करोडो हिंदू साधूंच्या साक्षीने हा महाकुंभमेळा पार पडत आहे. यानंतर महाराष्ट्रामध्ये सिंहस्थ कुंभमेळा पार पडणार आहे. यासाठी राज्य सरकारने तयारी सुरु केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2027 साली होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी सुरु केली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आराखडा सादर केला आहे.
पुढील सिंहस्थ कुंभमेळा हा महाराष्ट्रामध्ये होणार आहे. महाराष्ट्रामधील नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे हा मेळावा होणार आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तयार केलेला सुमारे 14 हजार कोटींचा प्रारुप आराखडा यावेळी सादर होणार आहे. सिंहस्थ मेळाव्यासाठी अद्याप दोन वर्षांच्या अवधी बाकी आहे. मात्र सुसज्जता आणि नियोजनासाठी आत्तापासून महायुती सरकारने तयारी सुरु केली आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देशभरातून भाविक येत असतात. नियोजनाला विलंब होत असल्याने त्यास गती देण्याकरिता सिंहस्थाची विस्तृत स्वरुपाची बैठक घेण्याचे सुतोवाच कुंभमेळ्याची जबाबदारी सांभाळणारे मंत्री गिरीश महाजन यांनी नुकतेच नाशिक दौऱ्यात केले होते. त्यानंतर लगोलग ही बैठक होत आहे. या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी निधी आणि आराखडा जाहीर केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचा एका क्लिकवर
सिंहस्थासाठी जिल्हा, विभाग व राज्यस्तरीय समित्या कार्यरत आहेत. 2015 मधील कुंभमेळ्याचा आराखडा सुमारे 2300 कोटींचा होता. आगामी कुंभमेळ्यात त्यामध्ये चार ते पाच वाढ होण्याची चिन्हे आहेत. महापालिकेने यंदा 6978 कोटींचा आराखडा सादर केला आहे. आगामी सिंहस्थासाठी तपोवनमध्ये 400 एकर क्षेत्रात साधुग्रामचे नियोजन असून तीन आखाड्यांचे सुमारे चार लाख साधू-महंत या ठिकाणी वास्तव्यास येण्याचा अंदाज आहे. एका पर्वणीत 80 लाख भाविक शहरात येतील. त्या अनुषंगाने नाशिक महानगरपालिकेबरोबर त्र्यंबकेश्वर नगरपालिका व अन्य विभागांनी कामांचे नियोजन केले आहे. आगामी कुंभमेळ्यात सुरक्षितेला सर्वाधिक प्राधान्य राहणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिली आहे.