नाशिक – राज्याचे पर्यावरणमंत्री आणि युवा नेते आदित्य ठाकरे हे संपूर्ण महाराष्ट्रात फिरून युवकांना प्रेरणा देत असतात. त्यांच्या प्रेरणेतूनच विकासकामांना चालना मिळते. याच माध्यमातून मनपा प्रभाग क्रमांक २८ मधील शिवसेनेचे तिघे व एक भाजपाचे नगरसेवक एकत्र येणे खरोखर विकास गंगा आणण्याचे काम करीत आहेत. कोट्यवधी रुपयांचा निधी सत्ता नसतांना आणून जनतेचे स्वप्न फक्त शिवसेनाच करू शकते, असे प्रतिपादन खासदार हेमंत गोडसे यांनी केले. महापािलका प्रभाग क्रमांक २८ मध्ये विविध विकासकामांचे लोकार्पण व परिसरातील महिलांसाठी पहिल्या जलतरण तलाव भूमिपुजन सोहळ्याप्रसंगी खासदार गोडसे बोलत होते.
मतदारांना दिलेला शब्द पाळला
दत्ता गायकवाड यांनीही शिवसेनेचे नगरसेवक मनपात सत्ता नसतांनाही किती कामे करतात. ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे विकासकामांवरून दिसत असल्याचे स्पष्ट केले. तर नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी यांनी प्रास्तविकात सांगितले की, गेल्या साडेचार वर्षात सर्वांना सोबत घेत प्रशासन दरबारी पंधरा ते वीस वर्षे प्रलंबित असलेल्या विकासकामांना मार्गी लावले. रस्ते, पुल, ड्रेनेज यासारखी अनेकविध कामे झाली. अन् काही सुरु आहेत. नागरिकांना शब्द दिला तो पाळण्याचे काम केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मतदारही आपल्या प्रतिनिधींबाबत समाधानी आहेत.
[read_also content=”स बिलातून थकीत वीजबिल वसूल करणे हे अत्यंत चुकीचं : देवेंद्र फडणवीस https://www.navarashtra.com/latest-news/it-is-very-wrong-to-collect-overdue-electricity-bill-from-sugarcane-bill-devendra-fadnavis-nrdm-229391.html”]
यावेळी माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड, नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, प्रभाग सभापती सुवर्णा मटाले, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख दीपक दातीर, हर्षदा गायकर, किरण दराडे, प्रतिभा पवार, दीपक मटाले आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी खासदार गोडसे व मान्यवरांच्या हस्ते माऊली लॉन्स ते प्रणय स्टॅम्पिंग रस्ता, शुभम पार्क, उमापार्क ते फडोळ मळा रस्ता, बुरकुले हॉल, एकदंत नगर या रस्त्यांचे लोकार्पण करण्यात आले. तर कृष्णा साडी ते स्वामी नगर मुरारी नगर रस्ते तसेच गजपुष्प कॉलनी ते मिनाताई ठाकरे शाळा रेटेनिंग वॉल अशा साडेतेरा कोटी रुपयांच्या विकासकामांबरोबरच जलतरण तलावाचे भूमिपूजन करण्यात आले.
विकासकामांना चालना
युवासेनेचे जिल्हाधिकारी दीपक दातीर यांनी सांगितले की, नवीन नाशिक परिसरात एकमेव जलतरण तलाव होता. पण महिलांसाठी स्वतंत्र तलाव नसल्याचे काही महिलांनी बाेलून दाखविले होते. तेच वाक्य मनात ठेवून लवकरच याठिकाणी जलतरण तलाव उभा राहणार असुन, एवढेच नव्हे तर माऊली लॉन्स ते प्रणय स्टॅम्पिंग रस्त्यासाठी सहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून भव्य दिव्य असा रस्ता साकारला आहे. यासोबत विविध विकासकामे मार्गी लावल्याचे त्यांनी सांगितले.
[read_also content=”हातपाय मोडून टाकीन’; पीएसआयची ‘त्या’ महिलेच्या पतीला धमकी https://www.navarashtra.com/pune/paschim-maharashtra/pune/psi-gives-threaten-to-beaten-to-a-person-in-baramati-nrka-229389.html”]